अर्धा नर आणि अर्धा मादा… अजब पक्षी पाहून शास्त्रज्ञ अचंबित; 100 वर्षात दुसऱ्यांदा दिसला

Rare half-female, half-male bird : पृथ्वीतलावर लाखो जीव अस्तित्वात आहेत. यात लाखो प्राणी आणि पक्षांचा समावेश आहे. प्रत्येक जीव हा वेगळा आहे. प्रत्येकाची वैशिष्ट्ये आणि रचना ही एकमेकां पेक्षा वेगळी असते. प्रत्येक जीवांमध्ये नर आणि मादा असते. मात्र, एक असा पक्षी आहे जो अर्धा नर आणि अर्धा मादा आहे. या पक्षाला पाहून  शास्त्रज्ञही अचंबित झाले आहेत. अत्यंत दुर्मिळ असा हा पक्षी आहे.  मागील 100 वर्षात दुसऱ्यांदा या पक्षाचे दर्शन झाले आहे.
या पक्षाचे गाएंड्रोमॉरफिज्म (gynandromorph) असे आहे. 

याआधी चार ते पाच वर्षांपूर्वी संशोधकांना पक्षी निरीक्षणादरम्यान सापडला होता. हा पक्षी अर्धा नर आणि अर्धा मादी आहे. गाएंड्रोमॉरफिज्म या पक्षाच्या एका बाजुला नराप्रमाणे काळे आणि मोठे पंख आहेत. तर दुसऱ्या बाजुला मादाप्रमाणे ब्राउन आणि पिवळ्या रंगाचे पंख आहेत. या पक्षाच्या चेस्टवर कोणताच स्पॉट नाही, हे मादा असल्याचे लक्षण आहे. विशेष म्हणजे या पक्षामध्ये मादाप्रमाणे अंडाशय देखील आहे

जेव्हा नर पक्षाचे दोन स्पर्म एकत्र आल्याने होतो अशा पक्षाचा जन्म

अशा प्रकारचे पक्षी हे अत्यंत दुर्मिळ बाब आहे. जेव्हा नर पक्षाचे दोन स्पर्म मादाच्या अशा अंडाशयात जातात तेव्हा त्यात दोन न्यूक्लियस तयार होतात तेव्हा अशा पक्षाचा जन्म होतो. नर पक्षाचे दोन स्पर्म एकत्र आल्यावर भ्रूणात नर आणि मादा, दोघांचे क्रोमोजोम येतात. ही अत्यंत दुर्मीळ प्रजनन प्रक्रिया आहे. 64 वर्षांपूर्वी अमेरिकेच्या पाउडरमिल एविएशन रिसर्च सेंटरमध्ये अशाच प्रकारचा पक्षी सापडला होता.
पक्षी पिलांना जन्म देतो 

हेही वाचा :  फुफ्फुसे आतून पोखरून निकामी करतात या 3 गोष्टी, कॅन्सरपासून बचावासाठी लगेच करा हे 5 उपाय

या पक्षामध्ये मादाप्रमाणे अंडाशय आहे. यामुळे हा पक्षी अंडी घालून पिलांना देखील जन्म देऊ शकतो. हा प्राणी अत्यंत दुर्मिळ आहे. कारण क्वचितच प्राणी किंवा पक्षांमध्ये अशा प्रकारची वैशिष्ट्य अढळतात.या पक्षाच्या अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.  

पालघरच्या समुद्रकिनाऱ्यावर दिसला अमेरिकन पक्षी

पालघरच्या समुद्रकिनाऱ्यावर सध्या रेड नेक फॅलेरॉप हा दुर्मिळ पक्षी दिसला होता. या पक्षाचं मूळ उत्तर अमेरिकेत आढळतं. विणीच्या हंगामात हे परदेशी पाहुणे पालघरच्या समुद्र किनाऱ्यांवर येतात . ऐरवी काळया आणि पांढर्‍या रंगाचा असलेला हा पक्षी विणीच्या हंगामात मात्र या पक्षाच्या गळ्याजवळील पिसांना लालसर रंग येतो. यापूर्वी ऑक्टोबर 2016 मध्ये रेड फॅलरोप दिसला होता

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची…’, CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या निधनानंतर मी उद्धव ठाकरेंना …

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …