SBI Recruitment 2023 : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! हजारो पदांसाठी भरती, असा करा अर्ज?

SBI Recruitment 2023 :  बँकेत नोकरी करायला कोणाला आवडणार नाही? बँकीग क्षेत्रात करियर करायचे आहे. नोकरी मिळवण्यासाठी काय करावे? असे अनेक प्रश्न पडत असतात. गेल्या काही वर्षात बँकांनी आपली कामगिरी टिकवून आणि आपला व्यवसाय वाढवला. त्यामुळे या बँकामध्ये सध्या नोकऱ्यांच्या उत्तम संधी निर्माण झाल्या आहेत. दरवर्षी विविध बँकेच्या रिक्त पदांसाठी भरती जाहीर होत असते. याचपार्श्वभूमीवर यंदाही ज्यांना बँकेत (Bank Job) नोकरी करणाऱ्यांची इच्छा असेल अशांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण सरकारी बॅंक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 1031 पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे? शैक्षणिक पात्रता किती? जाणून घ्या सविस्तर माहिती…

बँकेत नोकरी करुन करिअर करु इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) 1031 पदांसाठी भरती करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज प्रक्रियेत सामील होण्यासाठी 30 एप्रिल 2023 पर्यंच रजिस्ट्रेशन करु शकतात. या संदर्भात स्टेट बँक ऑफ इंडियाने 1 एप्रिल रोजी जाहिरात जारी केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर, चॅनल मॅनेजर सुपरवायझर आणि सपोर्ट ऑफिसर या पदांसाठी भरती करणार आहे. SBI किंवा इतर कोणत्याही सरकारी बँकेचे कर्मचारी या भरतीसाठी अर्ज करू शकतात. 

हेही वाचा :  कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा वाढ, पाहा तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर

वाचा : ऐन लग्नसराईत ‘इतक्या’ रुपयांनी सोने महाग; जाणून घ्या आजचे दर  

इच्छुक उमेदवार अर्ज करण्यासाठी sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकता. दरम्यान ही भरती स्टेट बँक ऑफ इंडियाद्वारे Anytime चॅनेल अंतर्गत कराराच्या आधारावर केली जाणार आहे. 

कोणत्या पदासाठी जागा

चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर पदासाठी 821 रिक्त जागा आहेत. तर चॅनल मॅनेजर पर्यवेक्षक पदासाठी 172 आणि सहाय्यक अधिकारी पदासाठी 38 जागा रिक्त आहेत.

किती पगार मिळेल

चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर – 36000 रु

चॅनल मॅनेजर पर्यवेक्षक – 41000 रु

सपोर्ट ऑफिसर – 41000 रु

निवड कशी होईल

SBI मधील भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. प्राप्त झालेल्या अर्जांपैकी उमेदवारांना मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल. मुलाखत 100 गुणांची असेल. मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे अंतिम यादी तयार केली जाईल. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …