Sarkari Naukri 2023 : 12वी पास विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची संधी; आजच करा अर्ज

EPFO Recruitment 2023: अनेक विद्यार्थी असे फिल्ड निवडता की ज्यामुळे लगेच सरकारी नोकरी (Sarkari Naukri 2023) मिळू शकेल. बारावीनंतर सरकारी नोकरी करण्यासाठी विद्यार्थी आधीच तयारी करत असतात. तुम्हीपण बारावी पास (12th pass) झाल्यानंतर नोकरीच्या शोधात असार तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण सरकारी नोकऱ्यांच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी EPFO ​​ने 2859 पदांची भरती आणली आहे. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून म्हणजेच 27 मार्चपासून सुरू होत आहे. तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल किंवा तुमचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले असेल तर तुम्हीही या नोकरीसाठी अर्ज करू शकता. या भरतीची अधिसूचना यापूर्वीच जारी करण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेद्वारे EPFO ​​मध्ये एकूण 2,859 पदे भरली जाणार आहेत. यामध्ये सामाजिक सुरक्षा सहाय्यकाच्या 2674 पदे आणि स्टेनोग्राफरच्या 185 पदांचा समावेश असणार आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया अधिकृत वेबसाइट epfindia.gov.in द्वारे ऑनलाइन पद्धतीने केली जाईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 एप्रिल 2023 निश्चित करण्यात आली आहे.

वाचा: सोन्याचे दर ‘जैसे थे’, तर चांदी किचिंत महाग, पाहा तुमच्या शहरातील आजचे दर 

हेही वाचा :  डोंबिवली स्थानकात जोडप्याचा किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल; नेटिझन्सने व्यक्त केली नाराजी | couple spotted kissing at dombivli and csmt platform commuters approach police

आवश्यक पात्रता

सामाजिक सुरक्षा सहाय्यक पदांसाठी, उमेदवारास इंग्रजीमध्ये 35 शब्द प्रति मिनिट आणि हिंदीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट टायपिंग गतीसह पदवीधर असणे आवश्यक आहे. दुसरीकडे स्टेनोग्राफर पदांसाठी उमेदवार 80 शब्द प्रति मिनिट श्रुतलेखन आणि इतर टायपिंग क्षमतेसह 12 वी पास असावा.

वयोमर्यादा

EPFO मध्ये एकूण 2,859 पदांसाठी अर्ज करण्यासाठी किमान वय 18 वर्षे असावे. तर कमाल 27 वर्षांचे उमेदवार अर्ज करू शकतात. यासोबतच राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयात सूट देण्याची तरतूद आहे.

निवड प्रक्रिया

संगणक आधारित लेखी चाचणी आणि संगणक टायपिंग चाचणीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. स्टेनोग्राफर पदांसाठी टायपिंग टेस्टऐवजी स्टेनो स्किल टेस्ट असेल.

पगार

लेव्हल 5 अंतर्गत सामाजिक सुरक्षा सहाय्यकांसाठी 29200 ते 92,300 रुपये आणि लेव्हल 4 अंतर्गत स्टेनोग्राफरसाठी 25,500 ते 81,100 रुपये पगाराची तरतूद करण्यात आली आहे. 



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पावसाबाबत महत्त्वाची अपडेट्स, तीन राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट; येथे मुसळधार कोसळणार

Weather Update in India, Heavy Rainfall : पावसाबाबत महत्त्वाची अपडेट्स हाती आली आहे. देशात उष्णतेच्या …

नव्या संसद भवनाचे आज मोदी यांच्या हस्ते उदघाटन, 19 विरोधी पक्षांचा बहिष्कार

New Parliament building inaugurated : नव्या संसद भवनाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन …