सर्दी झाली आहे की Omicron BF.7, जाणून घ्या २ मिनिट्समध्ये

पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढले आहे. चीनमध्ये सध्या Omicron BF.7 या कोरोनाच्या व्हेरिएंटने पुन्हा एकदा त्रास द्यायला सुरूवात केली आहे. तर भारतातही याबाबत आता जागरूकता होऊ लागली आहे. बुस्टर डोस योग्य आहे की नाही अशी शंका मनात असतानाही आता बुस्टर डोस घेण्यासाठी पुन्हा एकदा लाईन दिसू लागली आहे. मात्र सर्दी आणि खोकला यांची लक्षणे आणि Omicron BF.7 ची लक्षणे ही अत्यंत सामाईक आहेत. मग असे असताना नक्की आपल्याला साधा सर्दी खोकल्याने ग्रासलेले नाही तर Omicron BF.7 ने ग्रस्त आहोत हे कसे ओळखावे असा प्रश्न मनात येणे साहजिकच आहे. पण तुम्ही हे ओळखू शकता. ते कसे हे जाणून घ्या.

लक्षणांमधील समानता

वास्तविक भारतामध्ये Omicron BF.7 मुळे आतापर्यंत एकही जीव दगावलेला नाही. मात्र याचे संक्रमण सध्या परसत आहे. तसंच सध्या थंडीचा हंगाम सुरू आहे. या हंगामात सर्दी आणि खोकला होणं हे कॉमन आहे. पण नक्की सर्दी खोकला आहे की Omicron BF.7 ची बाधा झाली आहे हे कसे ओळखावे यामध्ये अनेक जणांचा गोंधळ उडालेला दिसून येत आहे. Omicron BF.7 हा सबव्हेरिएंट असून सर्दी, खोकला, नाक गळणे, ताप येणे आणि घशात खवखव होणे ही याची लक्षणे आहेत. हीच लक्षणे सामान्य सर्दी खोकल्याची असल्यामुळे गोंधळ उडणे साहजिकच आहे.

हेही वाचा :  ‘परी म्हणू की सुंदरा' प्रियाचे परफेक्ट साडी लुक्स, पारंपरिक आणि मॉडर्न तडका

Omicron BF.7 ची लक्षणे

omicron-bf-7-

Omicron BF.7 च्या लक्षणांच्या बाबतीत जाणून घ्यायचे झाले तर घसा खराब होणे, ताप, वाहते नाक, खोकला, थकवा, डोके दुखणे, श्वास न घेता येणे, शरीरात दुखणे हे आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ताप आणि खोकल्याची लक्षणे साधारण पाच दिवस तशीच राहिली तर Omicron BF.7 ची अर्थात कोविड टेस्ट करून घेणे गरजेचे आहे. कारण कॉमन लक्षणांमुळे गोंधळ उडतो आणि आपल्याला केवळ सर्दी खोकला झाला आहे असं गृहीत धरले जाते.

(वाचा – Omicron ला घेऊ नका अजिबात हलक्यात, शरीरातील हे महत्त्वाचे अवयव करतोय कायमचे निकामी, ताबडतोब सुरू करा ही 5 कामे)

कोल्ड की कोविड कसे ओळखावे?

‘टाइम्स ऑफ इंडिया’ मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, कोल्ड अथवा कोविडदरम्यान उडणारा हा गोंधळ मेदांता हॉस्पिटलचे वरीष्ठ संचालक इंटरनल मेडिसिन डॉक्टर सुशीला कटारिया यांनी सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, भारतामध्ये २०२२ ऑगस्टपासून हा व्हेरिएंट आहे. त्यामुळे देशातील कोरोना रूग्णांची संख्या वाढू शकते. कटारिया यांच्या म्हणण्यानुसार, हे संक्रमण लवकर पसरू शकते. मात्र भारतातील आरोग्य व्यवस्थेनुसार, याचा अधिक परिणाम होणार नाही. याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. सर्दी आणि खोकला असेल तर तुमचे अंग जास्त प्रमाणात दुखत नाही. त्यामुळे याकडे अधिक लक्ष द्यावे. तसंच वेळीच सर्वांपासून दूर राहावे आणि दोन ते चार दिवस योग्य औषधोपचार करावा.

हेही वाचा :  शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध करण्यासाठी वापरलेली वाघनखं मायभूमीत परतणार, इंग्लंडने दर्शवली तयारी

(वाचा – Omicron Symptoms in India : भारतात ओमिक्रॉनच्या या ७ लक्षणांचा कहर, अनेक लोकांमध्ये दिसतायत दुसरे लक्षण)

कोविड असल्यास लक्षणे

  • डोके दुखणे
  • तोंडाची चव निघून जाणे
  • वास येणे बंद होणे
  • श्वास घेण्यास त्रास होणे
  • छातीत दुखणे
  • बोलताही न येणे

ही लक्षणे केवळ सर्दी आणि खोकला असेल तर दिसून येत नाहीत. त्यामुळे तुम्हाला या साध्या लक्षणांवरून लगेच अंदाज येऊ शकतो. मात्र त्यानंतर पॅनिक न होणे योग्य आहे. तरीही तुम्हाला सर्दी, ताप आहे की कोविड – १९ आहे याचा अंदाज येत नसेल तर तुम्ही वेळीच तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेणे उत्तम आहे.

(फोटो क्रेडिटः Canva, Freepik.com)

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratime.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर …

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …