ओमिक्रॉन शरीरातील हे महत्त्वाचे अवयव करतोय कायमचे निकामी, सुरू करा ही 5 कामे

कोरोना व्हायरसचा (Corona Omicron Pandemic) प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. गेल्या एक वर्षापासून शांत असणारा कोरोना पुन्हा जीवघेण्या रुपात परतला आहे. यावेळी कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंट ग्रुपमधील सबव्हेरिएंट BF.7 (Omicron BF.7 व्हेरिएंट) हाहाकार माजवत आहे. या सबव्हेरिएंटने चीनमध्ये कहर केला असून चीनमध्ये या विषाणूमुळे संक्रमित झालेले दररोज लाखो नवीन रुग्ण समोर येत आहेत आणि हजारो लोकांचा मृत्यू होत असल्याचे देखील सांगितले जात आहे. आता तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल की Omicron BF.7 म्हणजे नक्की काय?

तर मंडळी, कोरोनाच्या सुरुवातीपासून त्याचे डेल्टा, अल्फा, बीटा आणि ओमिक्रॉन इत्यादी अनेक प्रकार आले आहेत. BF.7 हा ओमिक्रॉनचा सबव्हेरिएंट आहे. तुम्हाला देखील आठवत असेल की ओमिक्रॉनमुळे तिसरी लाट आली होती. या सबव्हेरियंटमुळे अजून एक लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सबव्हेरियंटबद्दल चिंताजनक गोष्ट म्हणजे त्याची वेगाने पसरण्याची क्षमता होय. हा विषाणू एकाच वेळी किमान 18 लोकांना संक्रमित करू शकतो.

शरीराच्या या भागावर करतोय हल्ला

कोरोना विषाणूचे अभ्यासक आणि कोविड जागरूकता तज्ज्ञ डॉ. पवित्रा वेंकटगोपालन यांनी TIO ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, हा विषाणू अप्पर रेस्पिरेटरी इन्फेक्शनला (Upper respiratory infection) कारणीभूत आहे. याचा अर्थ असा की हा विषाणू नाक, सायनस, घशाची पोकळी (घसा), स्वरयंत्र (वॉईस बॉक्स), श्वसननलिका आणि ब्रांकाई यांसारख्या वरच्या श्वसनमार्गातील अवयवांना लक्ष्य करतो. जेव्हा या अवयवांवर परिणाम होतो तेव्हा तुम्हाला सर्दी, टॉन्सिलिटिस, सायनस, घसा खवखवणे, नाक वाहणे, शिंका येणे, डोकेदुखी, स्नायू दुखणे इत्यादी. अशी सौम्य लक्षणे दिसू शकतात. जर विषाणूचा शरीरातील प्रभाव वाढला तर तो कधीही खालच्या श्वसनमार्गाच्या संसर्गामध्ये बदलू शकतो. असे झाल्यास तो तुमच्या फुफ्फुसांना संक्रमित करू शकतो ज्यामुळे ब्राँकायटिस, न्यूमोनिया, ब्राँकायटिस, क्षयरोग आणि कधीकधी फ्लू देखील होऊ शकतो.

हेही वाचा :  थंडीच्या दिवसात Dry Scalp आणि Dandruff पासून वाचण्यासाठी पुरुषांनो या 8 सोप्या घरगुती उपायांचा वापर करा

(वाचा :- Food For Strong Bones : हाडांचा संपूर्ण भुगा होईपर्यंत बघू नका वाट, ताबडतोब घरी आणा या 6 गोष्टी आणि बघा कमाल.!)

द्रव पदार्थांचे सेवन जास्त करा

मेयो क्लिनिकने दिलेल्या माहितीनुसार, वरच्या श्वसनमार्गाच्या संसर्गाला रोखण्यासाठी तुम्ही भरपूर द्रवपदार्थ प्यावे, जसे की पाणी, ज्यूस, सूप, कोमट लिंबूपाणी इत्यादी. याशिवाय चिकन सूप हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. कॅफिन आणि अल्कोहोल टाळा कारण यामुळे तुम्हाला डिहायड्रेशन होऊ शकते. या स्थितीमध्ये शरीरात पाण्याची कमतरता होणे खूप घातक ठरू शकते. त्यामुळे शक्य तितके पाणी पिऊन तुमच्या शरीराला हायड्रेटेड ठेवण्याचा प्रयत्न करा.

(वाचा :- Weight Loss: मेणासारखी वितळेल पोटाची चरबी, या वेळात गाढ झोपी गेलात तर जिम व डाएटची गरज नाही – एक्सपर्टचा सल्ला)

जास्तीत जास्त आराम करा

तुम्हाला ताप किंवा खोकला असल्यास पुरेशी विश्रांती घ्या. विश्रांती घेतल्याने तुम्हाला लवकर बरे होण्यास मदत होऊ शकते. यामुळे इतरांना संसर्ग होण्याची शक्यता देखील कमी होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला थोडे जरी बरे वाटत नसेल तर स्वत:साठी आणि आपल्या जवळच्या लोकांसाठी त्वरित जाऊन उपचार घ्या आणि शक्य तितका आराम करून कावकर रिकव्हर होण्याचा प्रयत्न करा. वेळीच जर तुम्ही वैद्यकीय तपासणी करून उपचार घेतले तर हा विषाणू निष्प्रभ ठरू शकेल.

हेही वाचा :  अरे बापरे, करोनाचा भयंकर प्रकोप, वॅक्सिन घेतलेल्यांमध्ये दिसतायत ही 5 लक्षणं

(वाचा :- किडनी स्टोन, मुतखडा, गुडघेदुखी, हाडांचा चुरा होणं या समस्या झटक्यात होतील दूर,हा पदार्थ ठरेल चमत्कार)

रूमचे तापमान नियंत्रित ठेवा

तुमची खोली उबदार ठेवा पण जास्त गरम देखील करू नका. जर हवा कोरडी असेल, तर एक कोल्ड-मिस्ट ह्युमिडिफायर किंवा व्हेपोरायझर जेवेत आर्द्रता निर्माण करू शकतात आणि अस्वस्थ खोकला कमी करण्यास मदत करतात. बॅक्टेरिया आणि बुरशीची वाढ रोखण्यासाठी ह्युमिडिफायर स्वच्छ ठेवा. ह्या अशा काही साध्या पण खूप महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सध्याच्या स्थितीत सुरक्षित ठेवू शकता. याबाबत लोकांमध्ये जागरुकता नसल्यानेच लोक आजाराला बळी पडत आहेत.

(वाचा :- Omicron Symptom: जगभरात कहर माजवलेल्या ओमिक्रॉन BF.7 चं मुख्य लक्षण Hyposmia, नाकात होते वाढ, कसे ओळखावे संकेत)

घसा साफ ठेवा

तुम्ही तुमचा घसा सुद्धा या परिस्थितीमध्ये साफ ठेवला पाहिजे. यासाठी तुम्ही मिठाच्या पाण्याने गुळण्या करू शकता. एका ग्लासमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात एक चतुर्थांश ते दीड चमचे मीठ घालून चांगले मिक्स करा. यामुळे घसा खवखवण्यापासून तुम्हाला तात्पुरता आराम मिळू शकतो.

(वाचा :- पोट साफ होण्यासाठी व इम्युनिटी वाढवण्यासाठी औषधासमान आहेत या 5 भाज्या, रोज खाल्लं तर करोना स्पर्शही करणार नाही)

हेही वाचा :  चीनमध्ये परिस्थिती हाताबाहेर! कोरोनाच्या भीतीने तरुणाची इमारतीवरुन उडी, धक्कादायक Video

नेझल ड्रॉपचा वापर करा

यासाठी अनेक प्रकारचे नेझल ड्रोप उपलब्ध आहेत. हे तुम्हाला लक्षणांपासून मुक्त होण्यास मदत करू शकतात, अगदी लहान मुलांना सुद्धा यचा खूप फयदा होतो.. याशिवाय गरज भासल्यास खोकल्याचे औषध घ्यायला विसरू नका.

(वाचा :- रिसर्चमध्ये दावा, 3 दिवसांत मुळापासून संपतात Cancer च्या 65% घातक-जीवघेण्या पेशी, जीवनदान ठरतोय हा ग्रीन ज्यूस)

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …