सखी गोखलेच्या ग्लॅम लुकने इंटरनेटवर लागली आग, बदललेला अवतार

सखी गोखलेने ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतून घराघरातील मनांमध्ये आपली जागा पक्की केली. मालिका संपल्यानंतर इतर जास्त प्रोजेक्टमध्ये न दिसणारी सखी पुढच्या शिक्षणासाठी परदेशात गेली होती. अभिनेता सुव्रत जोशीसह लग्न करून आता सखी पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय दिसून येत आहे.

सखी नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी फोटो शेअर करत असते. तिच्या या नव्या फोटोशूटची चर्चा सुरू झालीये. सखीने ब्लॅक अँड व्हाईट कपड्यातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून तिचा हा ग्लॅक लुक खूपच आकर्षक आणि सुंदर आहे. (फोटो सौजन्य – @sakheeg Instagram)

ब्लॅक अँड व्हाईट लुक

ब्लॅक अँड व्हाईट लुक

साधा आणि सिंपल लुक सखीने केला असला तरीही तिच्या या लुकमध्ये ग्लॅमरसता दिसून येतेय. ब्लॅक ब्लेझर, आत मध्ये व्हाईट टी-शर्ट आणि खाली ब्लॅक ट्राऊझर असा हा लुक सखीच्या सौंदर्यात भर घालतोय. त्यात तिने दिलेल्या पोझमुळे अधिक आकर्षक दिसत आहे.

मोकळे केस आणि समुद्रावरील वारा

मोकळे केस आणि समुद्रावरील वारा

समुद्रावरील वाऱ्यासह भुरभुरणारे मोकळे केस आणि हातात काढून घेतलेले ब्लेझर यामध्ये सखी अधिक बिनधास्त वाटत आहे. त्यातही तिच्या लुकमध्ये कुठेही अश्लिलता नाही तर आकर्षकपणा अधिक दिसून येतोय. व्हाईर रंगाच्या या टॉपमध्ये सखीचा लुक अधिक छान दिसतोय.

हेही वाचा :  Vegetable Price Hike : कोथिंबीरीची जुडी शंभरीपार; वाढलेल्या दरांनी गृहिणींचं बजेट कडाडलं

(वाचा – Exclusive: ‘अहिल्याबाई’ एतशा संझगिरीचा गुढीपाडवा लुक आहे कमाल, पारंपरिक वेषातील नाजूक नार)

डायमंड कानातले

डायमंड कानातले

या लुकसह तिने केवळ डायमंड कानातले घातले आहेत. तिच्या या ब्लॅक अँड व्हाईट कपड्यांवर हे कानातले अत्यंत सुंदर आणि नाजूक दिसत आहेत. त्यात वेव्ही हेअरस्टाईलमुळे लुकला अधिक शोभा आली आहे. तर हातात तिने अंगठी घातली आहे.

(वाचा – महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतील ‘फुलराणी’चा वेगळाच स्वॅग, फॅशनेबल प्रियदर्शिनीवरून नजरच हटेना )

मॅट नॅचरल मेकअप

मॅट नॅचरल मेकअप

तिने या लुकसह मॅट नॅचरल मेकअपचा आधार घेतला आहे. स्मोकी आईज, काजळ आणि चॉकलेटी शेडमधील लिपस्टिक लावत तिने लुक पूर्ण केला आहे. तर तिच्या मानेखाली असणारा टॅटू तिच्या सौंदर्यात भर घालत आहे.

(वाचा – ‘परी म्हणू की सुंदरा’, साडीत खुलले मानसी नाईकचे सौंदर्य, गुढीपाडव्याला करा असा लुक)

साध्या आणि ग्लॅम लुकचे समीकरण

साध्या आणि ग्लॅम लुकचे समीकरण

सखीचा हा लुक साध्या आणि ग्लॅमचा एकत्र तडका म्हणावा लागेल. सखीने असे फोटोशूट अधिक करावे असेही तिच्या चाहत्यांना वाटत आहे. सखी पारंपरिक आणि आधुनिक दोन्ही कपड्यांमध्ये अत्यंत सुंदर दिसते आणि तितकीच ग्लॅमही वाटू शकते हे तिने दाखवून दिले आहे.

हेही वाचा :  WhatsApp वर स्पॅम कॉल्सचा तुम्हालाही होतोय त्रास? कशी मिळवाल सुटका? कंपनीने स्वत: सांगितल्या सोप्या स्टेप्स



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …