टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्समध्ये भरती, मुंबईत मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

TISS Recruitment: मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आहे. कारण मुंबईतील टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्स (Tata Institute of Social Science) मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन (Tiss Recruitment) प्रसिद्ध करण्यात आले असून उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.  उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. 

टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये  रिसर्च असोसिएट-I (Reaserch Associate),  प्रोग्राम ऑफिसर (Program Officer) आणि सोशल वर्कर (social Worker) ही पदे भरली जाणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार पगार दिला जाणार आहे. 

रिसर्च असोसिएट

रिसर्च असोसिएटचे 1 पद भरण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून पीएचडी/एमडी/एमएस/एमडीएस किंवा समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे. किंवा मास्टर डिग्रीसोबत एससीआय जर्नलमध्ये किमान एक शोधनिबंध येणे गरजेचे आहे. पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 47 हजार रुपये पगार दिला जाणार आहे. 

प्रोग्राम कॉर्डिनेटर

प्रोग्राम कॉर्डिनेटरचे 1 पद भरले जाणार असून या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून पीएचडी पूर्ण करणे आवश्यक आहे.  टीसच्या माध्यमातून 2017 मध्ये स्कूल इनिशिएटीव्ह फॉर मेंटल हेल्थ अ‍ॅडव्होकसी (SIMHA) ची सुरुवात करण्यात आली. या प्रकल्पात प्रोग्राम कॉर्डिनेटरला काम करावे लागेल. या पदासाठी निवडल्या जाणाऱ्या उमेदवाराला दरमहा 63 हजार रुपये पगार दिला जाणार आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील उमेदवारांना यामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. ऑगस्ट 2023 ते मार्च 2024 या कालावधीसाठी हे पद असणार आहे.  

हेही वाचा :  एका चहावालीमुळे पकडला गेला 'हातोडा' सीरियल किलर! चित्रपटाला लाजवेल असा थरार

सोशल वर्कर

सोशल वर्करचे 1 पद भरले जाणार असून या पदसाठी निवड झालेल्या उमेदवाराला नागाव, शिवसागर, धुब्री आणि कब्री या ठिकाणी काम करावे लागणार आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 28 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. 

2 ऑगस्ट 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी टीसच्या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन फॉर्म भरायचा आहे. दिलेल्या मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्या. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘हे वैचारिक दारिद्रयच, पंतप्रधान हिंदू-मुस्लिमांमध्ये द्वेष निर्माण करणारी भाषणे..’; ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Group On PM Modi Speechs: देशवासीयांना एकसंध ठेवण्याऐवजी केवळ मतांसाठी देशातील हिंदू व मुस्लिम …

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …