काश्मीरमधून लष्कर जवान अचानक बेपत्ता, कारमध्ये आढळले रक्ताचे डाग; सर्च ऑपरेशन सुरु

Kashmir Soldier Missing: जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराचा जवान बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. रायफलन जावेद अहमद वानीचं (Javed Ahmad Wani) अज्ञातांनी अपहरण केल्याची शक्यता व्यक्त होत आहे. कुलगामचा (Kulgam) रहिवासी असणारा जावेद सुट्टीनिमित्त घरी आला होता. शनिवारी आपल्या कारने तो घराबाहेर पडला होता, पण परत आलाच नाही. यानंतर कुटुंबाने पोलिसांत तक्रार दाखल केली असून लष्करालाही माहिती दिली. लष्कर आणि पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरु केलं असून जावेदचा शोध घेण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. 

जावेदच्या कुटुंबाने त्याचं अपहरण झाल्याचा दावा केला आहे. दरम्यान जावेदच्या गाडीत रक्ताचे डाग सापडले आहेत. यानंतर लष्कर आणि पोलिसांनी संयुक्तपणे शोध घेण्यास सुरुवात केली आहे. मोठं सर्च ऑपरेशन राबवलं जात असून प्रत्येक संशयित ठिकाणाची झडती घेतली जात आहे. रायफलमन जावेद अहमद जम्मू-काश्मीर लाईट इन्फंट्री रेजिमेंटमध्ये कार्यरत असून काही दिवसांपूर्वी रजेवर घरी आला होता.

कारमध्ये सापडली चप्पल आणि रक्ताचे डाग

भारतीय लष्कराचा जवान जावेद अहमद वानी रजा घेऊन घरी आला होता. संध्याकाळी 6.30 वाजता खरेदी करण्यासाठी तो मार्केटमध्ये गेला होता. यावेळी आपली अल्टो कार घेऊन तो गेला होता. मात्र रात्री 9 नंतरही घरी परतला नसल्याने कुटुंबीयांनी शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी मार्केटजवळ कार सापडली. कार लॉक नव्हती आणि आतमध्ये रक्ताचे डाग होते. तसंच त्याची चप्पलही पडलेली होती. यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस आणि लष्कराला याची माहिती दिली. यानंतर सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. 

हेही वाचा :  Crime News : पत्नीच्या उपस्थितीत विद्यार्थिनीवर प्राध्यापकाचा अत्याचार

25 वर्षीय जावेद लेहमध्ये कार्यरत होता. काश्मीर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, काही संशयितांना अटक केली आहे. दरम्यान, गाडीत रक्ताचे डाग आढळल्याने कुटुंबीय चिंतेत आहेत. कुटुंबीयांना दहशतवाद्यांनी अपहरण केल्याचा संसय असून त्यांनी व्हिडीओ जारी करत जावेदची सुटका करण्याची विनंती केली आहे. 

“कृपया आम्हाला माफ करा. आमच्या मुलाला सोडून द्या, माझ्या जावेदला सोडा. मी त्याला पुन्हा लष्करात काम करु देणार नाही, पण त्याला सोडून द्या,” अशी विनंती त्याच्या आईने केली आहे. 

दुसरीकडे लष्कराने संपूर्ण परिसराला घेराव घातला असून, वेगवेगळ्या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. पण अद्याप कोणीही या अपहऱणाची जबाबदारी घेतलेली नाही किंवा कोणतंही स्टेटमेंट दिलेलं नाही. काश्मीरमध्ये गेल्या काही वर्षात दहशतवादी जवानांचं अपहरण करत असून त्यांची हत्या केली आहे. 

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘पत्नीसोबत अनैसर्गिक शरीर संबंध गुन्हा नाही’, कोणत्या प्रकरणात हायकोर्टाने दिला निर्णय?

Unnatural Intercourse: पती पत्नीमध्ये अनेक कारणांवरुन वाद होत असतात. हे वाद टोकाला गेले की कोर्टाची …

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …