रशियाला इशाऱ्या देणारी नाटो बॅकफूटवर, ही जबरदस्त मोठी खेळी

मास्को : Russia Ukraine Conflict : रशिया युक्रेन युद्धात (Russia-Ukraine war) एक मोठा ट्वीस्ट आला आहे. हा ट्विस्ट संपूर्ण युरोपसह अमेरिकेची चिंता वाढवणारा आहे. युक्रेनमधील चेर्नोबिल अणुभट्टी रशियाने ताब्यात घेतली आहे. काय होतील याचे परिणाम?, नाटोला बॅकफूटवर लोटणारी ही खेळी आहे का? (NATO on the backfoot)

दरम्यान, रशियाने युद्धातून माघार घ्यावी, असे आवाहन नाटोकडून करण्यात येत आहे. आमच्याकडेही बॉम्ब आहेत, हे रशियाने लक्षात घ्यावे, असा इशारा नाटोने दिला आहे. मात्र, रशिया मागे हटणार नाही, हे स्पष्ट केले आहे. युक्रेनची राजधानी कीवमध्ये रशियाच्या सैन्याने धडक मारली आहे. (Russia Ukraine crisis) 130 किमी अंतर काबीज करत रशियन फौजांच्या विविध तुकड्यांनी युक्रेनमध्ये आगेकूच सुरू केल्यावर रशियन टँक युनिटची एक तुकडी आणि आर्मीची एक मोठी फौज कीव या राजधानीच्या शहराकडे न जाता थेट निघाली किवपासून 130 किमी दूर असलेल्या एका शहराकडे. 

रशियाने युक्रेनमध्ये शिरकाव केल्यावर एक महत्त्वाची चाल

रशियाने युक्रेनमध्ये शिरकाव केल्यावर एक महत्त्वाची चाल खेळली. हे शहर तसं जगप्रसिद्ध. सोव्हिएत युनियनच्या काळातलं रशियाचे जुनं प्रेम. चर्नोबिल. या चर्नोबिलमध्ये उभी होती अणुभट्टी. रशियन फौजांनी ही अणुभट्टीच ताब्यात घेतली आहे. चेर्नोबिल अणुभट्टी हे नाव घेतलं की सगळ्या जगाला आठवतो तो 1986 साली झालेला भीषण स्फोट. सोव्हिएतचं विघटन होण्यास जी अनेक कारणे होती त्यातलं हे एक महत्त्वाचं कारण. रशियाची ठसठसणारी जखमच आणि आता युद्धातलं एक प्रमुख हत्यारही. 

हेही वाचा :  Ukraine Russia युद्धात NATO ची एन्ट्री, 30 देशांच्या रिस्पॉन्स फोर्सला केलं अॅक्टिव्ह

1986 मध्ये चेर्नोबिल अणूभट्टीत भीषण स्फोट झाला होता. सदोष डिझाईन आणि अननुभवी स्टाफ यांमुळे इथे स्फोट झाला. अणूभट्टीच्या रिअॅक्टर नंबर 4 मध्ये हा स्फोट झाला होता. या स्फोटामुळे इथून रेडिएशन झालं होतं. भट्टीच्या 20 मैलांच्या परिघात इथे मानवी वस्ती करण्यास आजही परवानगी नाही. अजूनही इथल्या इंधन टाकीत आण्विक इंधन आहे. त्यामुळे रेडिएशन मोठ्या प्रमाणात होण्याची भीती आहे. ज्या भट्टीत स्फोट झाला त्यावर संरक्षक कव्हर तयार करून रेडिएशन रोखण्यात आले आहे. 

नाटो आणि अमेरिकेला दहा वेळा विचार करण्याची वेळ

रशियाने या चेर्नोबिल अणूभट्टीच्या परिसरात रणगाडे आणि सैन्य पाठवून ही अणूभट्टी ताब्यात घेतली आहे. इथलं कव्हर रशियन फौजांनी दूर केले तर पुन्हा रेडिएशन होऊन भला मोठा रेडिएशन ढग संपूर्ण युरोपवर तयार होऊ शकतो. रशियाची ही आगळीक संपूर्ण युरोपला मोठी हानी पोहोचवेल, त्यामुळे रशियाविरोधात मोठी लष्करी कारवाई करण्याआधी नाटो आणि अमेरिकेला दहा वेळा विचार करण्याची वेळ आली आहे. रशियाने खेळलेली ही खेळी नाटोला बॅकफूटवर ढकलण्यास कारणीभूत ठरल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Sharad Pawar: नरेंद्र मोदींना पुन्हा संधी देणं धोकादायक…; सांगोल्यातील सभेत शरद पवारांची टीका

Sharad Pawar: शुक्रवारी लोकसभेच्या निवडणूकीचा दुसरा टप्पा पार पडला. तर दुसरीकडे उर्वरित टप्प्यांसाठी प्रत्येक पक्षाकडून …

Maharashtra Weather: राज्यातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा; पाहा मुंबईत कसं असेल हवामान?

Maharashtra Weather : सध्या देशभरात नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागतोय. याशिवाय राज्यात उन्हाचा चटका …