…तर रामलल्लाही खूश होणार नाही, सावित्रीच्या लेकींना नकोय प्राण प्रतिष्ठेची शालेय सुट्टी

Ram Lalla Pran Pratishtha: 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. हा सोहळा देशभरात उत्साहात साजरा करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे. यानंतर केंद्रासह राज्य सरकारने सुट्टी जाहीर केली. सोहळा सर्वांना पाहाता यावा यासाठी 22 जानेवारीाल महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान 1 शाळा याला अपवाद ठरली आहे. आमचा अभ्यास बुडाला तर रामलल्ला खूश होणार नाही, असे या विद्यार्थीनींचे म्हणणे आहे. काय आहे ही घटना? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

राज्यातील शाळा तसेच इतर आस्थापनांना 22 जानेवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यानंतर सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. अनेकांनी तर सलग सुट्टी आल्याने प्लानही बनवले आहेत. या पार्श्वभूमीवर एका शाळेने प्रवाहाविरुद्ध निर्णय घेतलाय.  प्रख्यात नृत्यांगना आणि ‘स्मितालय’च्या अध्यक्षा झेलम परांजपे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर एक  पोस्ट शेअर केली. अयोध्येतील राम मंदिरात प्रभु राम प्राणप्रतिष्ठा काही दिवसांवर आली असताना या पोस्टवर चर्चा रंगू लागली आहे. 

काय आहे पोस्टमध्ये?

राज्य सरकारने 22 जानेवारीला शालेय सुट्टी जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांना आनंद झाला. पण   झेलम परांजपे अध्यक्षा असलेल्या शाळेतील विद्यार्थीनींनी याला नम्रपणे नकार दिलाय. आम्ही सावित्रीच्या लेकी आणि आमचे बांधव जोतिबांची लेकरं…..सरकारी GR शेवटच्या क्षणी येवो की खूप आधी येवो, आम्हाला राम प्राण प्रतिष्ठेची सुट्टी नको. रामलल्ला सुध्दा खूश नाही होणार आमचा अभ्यास बुडला तर…. आमच्या अध्यक्षा झेलम ताईंनी निर्णय घेतला आहे की शाळा चालू राहणार….अशी पोस्ट झेलम परांजपे यांनी लिहिली आहे. या पोस्टवर झेलम यांचे कौतुक केले जात आहे. साने गुरुजी शाळेची प्रथा सदैव चालू राहील, अस एकाने म्हटले आहे. धाडसी आणि योग्य निर्णय. प्रभू रामचंद्र हे आपल्या हृदयात आहेत. आपण सर्व त्यांचे भक्त आहोत.एक दिवस कशाला आपण तर दरदिवशी त्यांची पूजा करतो, अशी कमेंट दुसऱ्या एका युजरने केलीय. तर कारण नसताना प्रसिद्ध होण्यासाठी बाईंचा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका काहीजण करत आहेत. 

हेही वाचा :  पीएम मोदींच्या पाठिवर थाप, मविआच्या डोक्याला ताप... विरोधानंतरही एकाच व्यासपीठावर

मुख्यमंत्र्यांकडे सुट्टीची मागणी 

केंद्र सरकारने 22 जानेवारीला केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सु्ट्टी जाहीर केली. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारनेही (Maharashtra Government) सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. सोमवारी म्हणजे 22 जानेवारीला सरकारी आणि खाजगी कार्यालयं, शाळा-कॉलेजला सुट्टी असेल. अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे राज्यात सु्टटी जाहीर करण्याची मागणी केली होती. 

अनेक नेत्यांकडून मागणी

आमदार सत्यजीत तांबे, आमदार राम कदम यांच्यासह अनेक नेत्यांनी 22 जानेवारीला रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली होती.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना पत्रही लिहिण्यात आलं होतं. सर्व शासकीय, निम-शासकीय कार्यालयं; शाळा, कॉलेज यांना सुट्टी जाहीर करावी अशी विनंती यात करण्यात आली होती. 22 जानेवारीला अनेक लोक रस्त्यावर उरतलील, ज्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होऊ शकते. महाराष्ट्र सरकारने यासंबंधी निर्णय घेतला नव्हता. पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नागरिकांना सणाप्रमाणे हा दिवस साजरा करा असं आवाहन केलं आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

दगड फोडून मिळायची 10 रुपये रोजंदारी, UPSC क्रॅक करुन राम ‘असे’ बनले अधिकारी

Ram Bhajan UPSC Success Story: यूपीएससी ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी मानली जाते. त्यामुळे यूपीएससी …

बारामतीमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट, मतदान सुरु असतानाच सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी

Loksabha 2024 Baramati : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडतंय. राज्यातील अकरा मतदारसंघात …