Rajouri Encounter : ‘पप्पा प्लीज परत या’, शहीद जवानाच्या मुलीचा टाहो, पत्नीचा आक्रोश पाहून पाणावतील डोळे

Rajouri Encounter : देशाच्या सुरक्षेसाठी आपल्या प्राण्याची आहुती देणाऱ्या त्या पाच जवानांचे पार्थिव जेव्हा गावा पोहोचताच…कुटुंबासोबत संपूर्ण गावावर शोककळा पसरते. शुक्रवारी 6 मे 2023 मध्ये झालेल्या भारतीय सैनिक (Indian Army) आणि दहशतवाद्यांमधील  (Terrorists) चकमकीत पाच जवान शहीद झाले. जम्मू-काश्मिरमधल्या (Jammu-Kashmir) राजौरी भागात ही घटना घडली. 

हे देशाचे शूरवीर जवान कोणाचा तरी मुलगा होता, कोणाचा नवरा तर कोणाचा बाप होता…देशासाठी लढताना त्यांनी आपले प्राण दिले. पण कुटुंबातील सदस्यांवर  दु:खाचं डोंगर कोसळलं. कुटुंबाला त्यांचावर अभिमान आहे, प्रत्येक देशवासियांनादेखील…पण जेव्हा त्यांचे पार्थिव घरी आणलं जातं. जो व्यक्ती घरातून जाताना मी लवकर परत येईल असं हसत देशाच्या सुरक्षेसाठी निघून जातो. त्याचं असं निर्जीव शरीर पाहून कुटुंबातील सदस्यांचा पायाखालची जमीनच सरकरते. 

पप्पा प्लीज परत या…!

‘तुम्ही उठत का नाही? मला काही नको पप्पा प्लीज तुम्ही परत या’…दहा वर्षांच्या पवना चिबने वडिलांच्या चेहऱ्यावर हात फिरवताच टाहो फोडला. तिची आई आपला नवरा आता नाही यावर विश्वास ठेवायला तयार नव्हती. तर सात वर्षांचा मुलगा अंकितला तर काय सुरु आहे हेच कळत नव्हतं. त्याचे डोळे भीरभीर सगळीकडे फिरत होते. नीलम सिंग या शहीर जवानाच्या कुटुंबाची ही अवस्था पाहून प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. (rajouri blast jammu kashmir encounter with terrorists neelam singh martyred latest news)

हेही वाचा :  'जम्मू-काश्मीर-लद्दाख आमचा आहे आणि आमचाच राहणार, भारताचं चीन-पाकला चोख प्रत्युत्तर

neelamsinghzee24tass

नीलम सिंग हे कृपालपूर गावातील होते. त्याची पार्थिवाची शवपेटी तिरंग्याने लपटलेली गावात पोहोचताच प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होते. हजारोंच्या संख्येने गावकऱ्यांनी शहीदाला अखेरचा निरोप देण्यासाठी आले होते.  ‘नीलम सिंह अमर रहे’ या घोषणेही अख्खं गाव दुमदुमलं होतं. 

जेव्हा नीलम घरी आला होता तेव्हा तो फक्त चहा घेऊन निघून गेला…तेव्हाच त्याला शेवटचं पाहिलं…त्यानंतर मुलगा आला तोही तिरंग्यात लपटलेला…

मुलाची शेवटची आठवण सांगताना वडील हुरदेव सिंग चिब यांना गहिवरून आलं. 

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

अंधश्रद्धेचा कळस! अपघातात व्यक्तीचा मृत्यू, 20 वर्षांनी नातेवाईकांची रुग्णालयच्या गेटवर पूजा, कारण काय तर..

Superstition : देश 21 व्या शतकात वावरत आहे, पण अजूनही अंधश्रद्धा मूळापासून नष्ट करण्यात आपण …

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …