मुंबई : डिजीटल ट्रॅजॅक्शनचा आता जमाना आला आहे. कोरोना काळानंतर तर प्रत्येक व्यक्ती ऑनलाईल बँकिंगकडे वळला आहे. यामुळे लोकांचा बँकेत हेलपाटे मारावे लागत नाहीत, यामुळे तुम्ही घरबसल्या काही सेकंदात आपलं काम करू शकता. ऑनलाईन बँकिंगमुळे लोकं आता गुगल पे, फोन पे, ऍमेझोन पे, पेटीएम सारख्या ऍप्सचा वापर करु लागले आहेत. यामुळे आता तुम्हाला पैसे जवळ ठेवण्याची कटकट देखील संपली आहे. तुम्ही तुमच्या फोनने स्कॅन करुन कुठे ही, केव्हाही आणि कोणालाही पैसे देऊ शकता. तसेच याचा आणखी एक फायदा असा होतो की, यामुळे तुम्हाला अनेक अशा ऑफर्स मिळतात, ज्यामुळे तुमचा खर्च देखील कमी होईल. तर काही वेळेला तुम्हाला कॅशबॅक देखील मिळते.
गुगल पे, फोन पे, पेटीएम हे सगळ्यात लोकप्रिय असे ऑनलाईन ट्रॅन्झॅक्शन ऍप आहे. त्यांपैकी पेटीएम हे सगळ्या जुने ऍप आहे. पेटीएम कंपनी आल्या ग्राहकांना 100 रुपयांचं कॅशबँक देत आहे. ही पेटीएम ग्राहकांसाठी पैसे कमावण्याची उत्तम संधी आहे.
परंतु आता हे पैसे कसे आणि केव्हा मिळणार असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर काळजी करु नका, तुम्हाला सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला या लेखात मिळणार आहे.
खरं तर कंपनीने पेटीएम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज एकदिवसीय आणि टी20 सामन्यांदरम्यान 20 फेब्रुवारी 2022 पर्यंत UPI मनी ट्रान्सफरवर कॅशबॅक आणि इतर भेटवस्तू जाहीर केल्या आहेत.
सामन्याच्या दिवशी वापरकर्ते ‘4 का 100 कॅशबॅक ऑफर’चा लाभ घेऊ शकतात. ज्यामध्ये ग्राहकांना खात्रीशीर कॅशबॅक मिळणार आहे. तुम्हाला Paytm UPI द्वारे मनी ट्रान्सफर केल्यावर 100 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल.
या कालावधीत ग्राहकांच्या ४ रूपयांपासूनच्या पैसे ट्रान्सफर्सवर 100 रुपयांपर्यंत मनीबॅक मिळवता येईल आणि ऑफरचा लाभ घेता येईल.
याशिवाय, वापरकर्ते रेफरल प्रोग्राममध्ये सहभागी होऊन अतिरिक्त कॅशबॅक जिंकू शकतात. जेव्हा जेव्हा वापरकर्ता मित्र आणि कुटुंबीयांना UPI मनी ट्रान्सफरसाठी Paytm वापरण्यासाठी आमंत्रित करेल, तेव्हा रेफरर आणि समोरील व्यक्ती दोघांनाही ₹100 चा कॅशबॅक मिळेल.
ऑफरल लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पेटीएमने भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल, हरभजन सिंग आणि वेस्ट इंडिजचा खेळाडू ख्रिस गेल यांच्यासोबत ऑनलाइन मोहीम सुरू केली.
वापरकर्ते त्यांचे पेटीएम अॅप वापरून काही मिनिटांत पेटीएम यूपीआयसाठी नोंदणी करू शकतात. हे त्यांना त्यांच्या बँक खात्यातून अखंड आणि सुरक्षित ऑनलाइन पेमेंट करण्यास सक्षम करते. यामुळे त्यांना लिंक केलेल्या खात्यातील शिल्लक त्वरित तपासता येते आणि कोणताही UPI QR कोड स्कॅन करून पेमेंट करता येते.