पूजा हेगडेचा सुपर क्युट आणि ग्लॅमरस लुक, चाहते घायाळ

पूजा हेगडेच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. Girl Next Door असा पूजाचा लुक मराठी मुलांमध्येही अधिक प्रसिद्ध आहेत. बॉलीवूडमध्ये पूजाने हिट चित्रपट जरी दिले नसले तरीही पूजा तिच्या लुक आणि चर्चेसाठी नेहमीच चर्चेत असते. याशिवाय सलमान खानसह सध्या पूजाचे नाव जोडले जात असल्याने पूजा हेगडेची मोठ्या प्रमाणातच चर्चा होताना दिसतेय.

नुकतीच पूजाने इंटरनॅशनल फॅशन डिझाईनर गौरव गुप्ताच्या स्टोअर लाँचदरम्यान हजेरी लावली आणि तिच्या फॅशन स्टाईलने सर्वांचेच मन जिंकून घेतले. स्टायलिश, क्युट आणि ग्लॅमरस असे डेडली कॉम्बिनेशन असल्याचा भास पूजाकडे पाहून होतोय. पाहूया पूजाचा लुक (फोटो सौजन्य – योगेन शाह)

​शिमरी व्हाईट थाई हाय स्लिट ड्रेस​

​शिमरी व्हाईट थाई हाय स्लिट ड्रेस​

पूजाने या स्टोअर लाँचदरम्यान घातलेल्या ड्रेसने सर्वांच्या नजरा वळवून घेतल्या आहेत. अत्यंत आकर्षक आणि सुंदर अशा शिमरी व्हाईट थाई हाय स्लिट ड्रेसमध्ये पूजा खूपच सुंदर दिसत होती. परफेक्ट फिगर फ्लाँट करणारा हा ड्रेस पाहतच राहण्यासारखा आहे. क्युट आणि ग्लॅमरस असे कॉम्बिनेशन पूजाकडे पाहताच मनात येत आहे.

हेही वाचा :  Weather News : मुंबईत उन्हाचा लपंडाव; विदर्भ- मराठवाड्यासाठी मात्र हवामानाचा चिंता वाढवणारा अंदाज

बॅकलेस ऑफशोल्डर टॉप

बॅकलेस ऑफशोल्डर टॉप

थाई हाय स्कर्ट आणि त्यासह बॅकलेस ऑफशोल्डर टॉप पूजाने घातला होता. याच्या हातावर पूर्ण पायापर्यंत फ्रील देण्यात आले आहे. हे नेटचे फ्रील या ड्रेसची शोभा अधिक वाढवत आहे. तर टॉप आणि स्कर्टवर शिमरी डिझाईन अधिक आकर्षक दिसत आहे.

(वाचा – विदुलाच्या निरागस सौंदर्यात ‘जीव झाला येडापिसा’, बिनधास्त लुकने करतेय घायाळ)

​स्टेटमेंट रिंग​

​स्टेटमेंट रिंग​

पूजाने यासह कोणत्याही प्रकारचे दागिने घातलेले नाहीत. केवळ स्टेटमेंट रिंग घालून तिने लुक पूर्ण केला आहे. शिमरी ड्रेस घातल्यामुळे तिने कोणत्याही प्रकारच्या दागिन्यांचा आधार घेतलेला नाही. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरून आणि ड्रेसवरून नजरच हटत नाहीये.

(वाचा – राहा कपूरची आजी होतेय अधिक तरूण, फॅशनच्या बाबतीत सून आलियाही देतेय तगडी टक्कर नीतू कपूर)

​मेस्सी बन हेअरस्टाईल​

​मेस्सी बन हेअरस्टाईल​

पूजाने या ड्रेससह मेस्सी बन हेअरस्टाईल केली आहे. यासह तिने चेहऱ्याच्या दोन्ही बाजूने बटा काढल्याने तिच्या चेहऱ्यावरील सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे. तसंच मेस्सी बन हेअरस्टाईल करताना उभ्या चेहऱ्यासाठी थोडासा पफही ठेवला आहे.

(वाचा – अंबांनीची सून राधिका मर्चंटची स्टायलिश एंट्री, गुलाबी रफल साडी आणि चेहऱ्यावर मिलियन डॉलर स्माईल)

हेही वाचा :  1 ऑगस्टपासून मेट्रो पुणेकरांच्या सेवेत, 'या' प्रवाशांना तिकिट दरात मिळणार 30 % सूट, अशी असतील स्थानके

​मिनिमल मेकअप​

​मिनिमल मेकअप​

शिमरी ड्रेससह पूजाने मिनिमल मेकअप केला आहे. ड्युई बेसिक मेकअप आणि त्यासह न्यूड लिपस्टिकचा वापर केला आहे. आयलॅशेससह मस्कारा लावत आपला मेकअप लुक पूर्ण केला आहे. शिमरी ड्रेस आणि मिनिमल मेकअप हे समीकरण उत्तम जमून आले आहे.

एखाद्या पार्टीसाठी तुम्हीही असा लुक करू शकता. डिझाईनर कपडे नसले तरीही तुम्ही असे कॉम्बिनेशन नक्कीच ट्राय करू शकता.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची…’, CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या निधनानंतर मी उद्धव ठाकरेंना …

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …