PM मोदींनी G20 देशाच्या प्रमुखांना दिल्या खास भेटवस्तू, ऋषी सुनक यांची भेटवस्तू होती खास

बाली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 दिवसीय G20 परिषदेत सहभाग घेतला. यावेळी जगभरातील अनेक मोठे नेते उपस्थित होते. इंडोनेशियातील बाली येथे जी20 शिखर संमेलनाचे यंदा आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी जगभरातील देशांच्या प्रमुखांना भारताकडून अनोखी भेट दिली. पंतप्रधानांनी जागतिक नेत्यांना भेटवस्तू देऊन भारताच्या समृद्ध आणि प्राचीन कला आणि हस्तकला सादर केल्या.

पंतप्रधान मोदी यांनी गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या समृद्ध वारशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कलाकृती आणि पारंपारिक वस्तूंची यासाठी निवड केली होती. मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना कांगड्याचे लघुचित्र (लघु चित्रे) सादर केले, ज्यात शृंगार रासचे चित्रण आहे.

पंतप्रधान मोदींनी ऋषी सुनक यांना गुजरातीमधील प्रसिद्ध ‘माता नी पछेडी’ भेट दिली. जे देवीच्या मंदिरात अर्पण करतात.

पंतप्रधान मोदींनी ऑस्ट्रेलियाचे नेते अँथनी अल्बानीज यांना पिथोरा भेट दिला. गुजरातमधील छोटा नागपूर भागातील राठवा कलाकारांनी बनवलेले ‘पिथोरा’ हे पारंपरिक आदिवासी लोकचित्र भेट म्हणून दिले.

पंतप्रधान मोदींनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना ‘पाटन पटोला’ स्कार्फ भेट दिला. जी उत्तर गुजरातच्या पाटण भागात साळवी कुटुंबाने तयार केली होती.

पंतप्रधान मोदींनी फ्रान्स, जर्मनी आणि सिंगापूरच्या नेत्यांना ‘अगेट’ भेट दिली. गुजरातच्या कच्छ प्रदेशाशी संबंधित पारंपरिक हस्तकला ‘अगेट’ (गोमेड) कप भेट दिला.

पंतप्रधान मोदींनी सुरतच्या कलाकारांनी बनवलेली चांदीची वाटी आणि किन्नौरच्या कारागिरांनी बनवलेली शाल यजमान देश इंडोनेशियाच्या नेत्याला भेट दिली.



Source link

हेही वाचा :  Gujarat Election 2022 : गुजरात विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्याचं आज मतदान; PM Modi सह अनेक VVIP करणार मतदान

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …

पत्नीचं हॉस्पिटलचं बिल पाहून पतीचं धक्कादायक कृत्य, थेट ICU मध्ये गेला अन्…

पतीने रुग्णालयातच पत्नीची गळा दाबून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेत हा …