‘पठाणची एका दिवसाची कमाई तुझ्या आयुष्यभरातील कमाईपेक्षा जास्त’ युजरच्या टीकेला कंगनाचे उत्तर

Kangana Ranaut Tweet : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अलीकडेच कंगनाने शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाचे कौतुक करत  असे चित्रपट चालले पाहिजेत असे म्हटले आहे. दरम्यान, एका ट्विटर युजरने शाहरुखच्या ‘पठाण’ या कलेक्शनवर कंगना राणौतला टोमणा मारला आहे. त्या युजरला कंगनाने चोख प्रत्युत्तर दिले आहे.   

डॉ. निमो यादव नावाच्या युजरने कंगनाच्या एका पोस्टला उत्तर देताना म्हटले की, ‘पठाणची एका दिवसाची कमाई तुमच्या आयुष्यभराच्या कमाईपेक्षा जास्त आहे. यावर प्रतिक्रिया देताना कंगना रणौतने म्हटले की, ‘निमो भाई, मला माझ्या आर्थिक परिस्थितीची फारशी चिंता नाही.  फक्त एक चित्रपट बनवण्यासाठी मी माझे घर, माझे कार्यालय, सर्व काही गहाण ठेवले आहे. प्रत्येकजण पैसे कमावतो. असा कोण आहे  जो असे पैसे उडवू शकतो. 

 
पठाण चित्रपटाचे कौतुक 

कंगना रणौतने तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या रॅप-अप पार्टीदरम्यान ‘पठाण’ चित्रपटाचे कौतुक केले. यावेळी तिने शाहरुख खानच्या चित्रपटाची स्तुती करताना बालगीतांचे पठण केले. कंगना म्हणाली, ‘पठान चांगली कामगिरी करत आहे. असा चित्रपट चालायला हवा. मला वाटतं की आपली हिंदी सिनेसृष्टी मागे राहिली आह, प्रत्येक व्यक्ती आपापल्या पातळीवर प्रयत्न करत आहे’.

हेही वाचा :  'तो कसा दिसतो, त्याचा धर्म काय?'; शाहरुखवर टीका करणाऱ्यांसाठी हेमांगी कवीची खास पोस्ट

 यावेळी कंगना राणौतने इमर्जन्सी चित्रपटासाठी तिची मालमत्ता गहाण ठेवल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, ‘मी ठरवेल ते काम करत राहते. माझ्यासाठी ही फार मोठी गोष्ट नाही. मी एका मिनिटात कोणताही निर्णय घेते. पण ते (मालमत्ता गहाण ठेवणे) माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. कारण शूटिंगच्या वेळी बँकेत चकरा मारणे, त्याकाळात आमचे शूटिंग देखील बंद झाले होते. माझ्यासाठी हे थोडे अवघड होते, पण काहीही धोका पत्करणे हा माझ्यासाठी मोठा निर्णय नव्हता.

 गेल्या काही दिवसांपासून कंगना राणौत तिच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री असण्यासोबतच ती निर्माती आणि दिग्दर्शक देखील आहे. या चित्रपटात कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. इमर्जन्सी हा चित्रपट 20 ऑक्टोबर 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. याच चित्रपटाच्या शूटिंगममध्ये कंगना रणौत सध्या व्यस्त आहे. 
 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …