Pakistan Crisis : इम्रान खान यांना मोठा दिलासा; अटक बेकायदा, तात्काळ सुटका करण्याचे आदेश

Pakistan Crisis : पाकिस्तानात राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. आता पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने माजी पंतप्रधान इम्रान खान ( Imran Khan ) यांची तुरुंगातून मुक्तता करण्याचे आदेश दिलेत. पाकिस्तानातील सर्वोच्च न्यायालयाने त्यांची अटक बेकायदेशीर असल्याचं सांगितले आहे. इम्रान खान सुनावणीसाठी इस्लामाबाद न्यायालयात हजर झाले होते. याचवेळी पोलिसांनी त्यांना अटक केली होती. दरम्यान आज त्यांना हायकोर्टात हजर केले जाणार आहे. इम्रान खान यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन अटक करण्यात आली होती. इम्रान यांच्या अटकेच्या निषेधार्थ पाकिस्तानमध्ये त्यांच्या पक्षाकडून ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली. अनेक ठिकाणी दगडफेक, जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या.

कालचा दिवस पाकिस्तान सरकार आणि लष्कर या दोघांसाठी तणावाचा होता. दरम्यान, माजी पंतप्रधान इम्रान खान यांची सर्वोच्च न्यायालयाने सुटका झाल्यानंतर पाकिस्तानच्या माहिती मंत्री मरियम औरंगजेब यांनी पत्रकार परिषदेत सर्वोच्च न्यायालयाला धमकी दिली आणि तुम्ही निर्णय घेतल्यास कोणाचेही घर वाचणार नाही, असे म्हटले.

इम्रान खान यांना आज सकाळी 11 वाजता उच्च न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, त्यांची अटक बेकायदा असल्याचा निर्णय न्यायालयालाने दिल्यानंतर आज त्यांची सुटका करण्यात येणार आहे. ते घरी जाऊ शकणार आहेत. त्यांना फक्त 10 लोकांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने त्यांची अटक बेकायदेशीर ठरवून त्यांची सुटका केली. न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान हा नियम बनवत न्यायमूर्ती म्हणाले की, न्यायालयाच्या आवारातून कोणालाही अशा प्रकारे अटक करता येणार नाही.

हेही वाचा :  सैनिक की सुपरहिरो? अवघ्या 13 जवानांनी केली 250 इस्रायलींची सुटका, थरारक व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, पाकिस्तानातील सत्ताधारी पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीगच्या नेत्या मरियम नवाज यांनी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत पाकिस्तानच्या सरन्यायाधीशांवर टीका केली आहे. त्यांनी मुख्य न्यायमूर्तींवर निशाणा साधताना म्हटले की, सरन्यायाधीश यांनी आपल्या सासूप्रमाणे इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयमध्ये सहभागी व्हावे. आज 60 अब्ज रुपयांचा खंडणी घोटाळा पाहून सरन्यायाधीशांना नक्कीच आनंद झाला असेल, असेही त्या म्हणाल्या. देशातील महत्त्वाच्या आणि संवेदनशील संस्थांवरील हल्ल्यांना सर्वाधिक जबाबदार सरन्यायाधीश, गुन्हेगाराची ढाल बनून आगीत इंधन भरत आहेत.

तर दुसरीकडे इम्रान खान यांना 12 मे रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयातून जामीन न मिळाल्यास आम्ही त्यांना पुन्हा अटक करु, असे पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्ला यांनी म्हटले आहे. देशात दहशतवाद पसरवणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, असेही ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाल्यानंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी रात्रभर पोलीस लाइन्सच्या गेस्ट हाऊसमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली मुक्काम केला. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची…’, CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या निधनानंतर मी उद्धव ठाकरेंना …

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …