Onion Issue : कांदाप्रश्नी शेतकऱ्यांसह महाविकास आघाडीचे नेते आक्रमक

Onion Issue : कांदाप्रश्नी (Onion ) शेतकऱ्यांसह महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi)  नेते आक्रमक झाले आहेत. संगमनेरमध्ये माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. नाशिक पुणे महामार्गावर रास्ता रोको करत आंदोलनाला सुरूवात झाली आहे. (Mahavikas Aghadi Leader aggressive onion issue farmers) दरम्यान, कांद्यानं शेतकऱ्यांना अक्षरश: रडवले आहे. कांद्याच्या निर्यातीवर वारंवार निर्बंध लादले जात असल्यानं त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय व्यापारावर होत आहे.दहा वर्षानंतरही कांद्याची अपेक्षित निर्यातवाढ झालेली नाही. तर दुसरीकडे भाव मिळत नसल्याने एका शेतकऱ्यांने आपल्या तीन एकराच्या कांदा विकावर नांगर फिरवला आहे.

 शेतकऱ्यांना शिंदे – फडणवीस सरकारचे केवळ आश्वासन – पवार

कांद्याचे भाव गडगडल्याने विरोधकांनी विधानसभेत मागणी करूनही सरकारने अद्यापही शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही. त्यामुळे मविआचे नेते शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. संगमनेर बस स्थानकासमोर कांदा आणि वीज प्रश्नाबाबत आंदोलन केलं जाते आहे. कांदाप्रश्न राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शिंदे फडणवीस सरकार केवळ आश्वासनं देत आहेत पण करत काही नाहीत अशी टीका शरद पवारांनी केली. 

हेही वाचा :  डायबिटिस रूग्णांना AIIMSकडून ५ जबरदस्त उपाय, ब्लड शुगरचा आकडा जरा पण वाढणार नाही

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात भारती कांद्याची मागणी कमी होऊ लागलीये. त्यामुळे देशातही कांद्याचे भाव कोसळू लागलेत.  एकीकडे देशात कांद्याचे उत्पादन वाढत असताना भाव मिळत नसल्यानं शेतक-यांवर कांदा फेकून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने कांदा निर्यातीमधील हस्तक्षेप थांबवावा अशी मागणी जोर धरु लागली. 

 शेतकऱ्यानं तीन एकराच्या कांदा विकावर नांगर फिरवला 

कांद्यानं शेतक-यांना रडवले आहे. तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा गावात एका शेतकऱ्यानं आपल्या तीन एकराच्या कांदा विकावर नांगर फिरवलाय. अपसिंगा गाव कांद्यासाठी प्रसिद्ध आहे. 2 हजार 500 हेक्टर पैकी 1 हजार 480 हेक्टर जागेवर यंदा कांद्याची लागवड झालीये. मात्र बाजारात कांद्याला भाव मिळत नाहीये. काढणीचा खर्चही निघत नसल्यानं श्रीहरी भाकरे या शेतकऱ्यानं कांद्याच्या पिकावर नांगर फिरवला आहे.

राज्यात पावसाची शक्यता, शेतकऱ्यासाठी आवाहन

दरम्यान, राज्यातील काही भागात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजपासून ते 6 मार्च दरम्यान कोकण, उत्तर महाराष्ट्र,विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. काही भागात तुरळक तर काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळेल असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. त्यामुळे शेतक-यांनी आपला शेतमाल झाकून ठेवावा असं आवाहन हवामान खात्यानं केले आहे.

हेही वाचा :  Loksabha 2024 : पुण्यात कोणाचा झेंडा फडकणार, महायुतीला साथ की मविआला हात

 फेब्रुवारी महिन्यात पारा चाळीशी जवळ पोहोचला होता. त्यामुळे यंदा उष्णतेची लाट येईल, असा अंदाज होता. पण उन्हाळा सुरु होण्याआधीच पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यानं महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …