फक्त चीन नाही तर रात्रभर ‘या’ देशांतील जमीन हलत होती; समुद्राचा तळही हादरला

Massive Earthquake: चीनला भूकंपाचा मोठा धक्का बसला आहे. या भूकंपामध्ये 110 हून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास चीनला भूकंपाचा धक्का बसला. त्यानंतर सकाळी पुन्हा भूकंपाचे धक्के चीनमध्या जाणवले. मात्र चीनच नाही तर अफगाणिस्तान, म्यानमारबरोबरच भारतामधील लडाखमधील कारगिल आणि अंदमानच्या सुमद्रामध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. या सर्व देशांमध्ये वेगवेगळ्या तिव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. चीनमध्ये भूकंपामुळे सर्वाधिक नुकसान झालं आहे. मध्यरात्री आलेल्या 6.2 रिस्टर स्केलच्या भूकंपामध्ये आतापर्यंत 111 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या भूकंपामध्ये 200 हून अधिक जण जखणी झाले आहे. चिनी राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी भूकंपाची तिव्रता लक्षात घेत ऑल आऊट मोहिमेची घोषणा केली आहे. नक्की कोणत्या देशांमध्ये भूकंपाचे धक्के बसले पाहूयात..

चीनमधील पहिला भूकंप

मध्यरात्री चीनला भूकंपाचा पहिला धक्का बसला. याची तिव्रता रिस्टर स्केलवर 6.2 इतकी होती. याच भूकंपामध्ये मोठ्या प्रमाणात जिवितहानी झाली. अनेक इमारती पडल्या, रस्त्यांना तडे गेले. गांसु आणि किंघई प्रांतातील या भूकंपाचा केंद्रबिंदू जमीपासून 10 किलोमीटर आत होता. या भूकंपात 111 जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक लोक जखमी झाले.

हेही वाचा :  या फोटोला का म्हटलं जातंय पृथ्वीचं भविष्य? महाकाय दुर्बिणीनं टीपलेला अवकाशातील भयंकर स्फोट पाहाच

चीनमधला दुसरा भूकंप

चीनला भूकंपाचा दुसरा धक्का मंगळवारी सकाळी बसला. मंगळवारी सकाळी 7.16 वाजता शिनजियांग प्रांताला हा धक्का बसला. याची रिस्टर स्केअलवर तिव्रता 4.8 इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 118 किमी आत होता.

अफगाणिस्तानही हादरला

अफगाणिस्तानमधील हिंदूकुश परिसरामध्ये भूकंपाचे सौम्य झटके जाणवले. अफगाणिस्तानमध्ये सकाळी 6 वाजून 44 मिनिटांनी हा धक्का बसला. याची तिव्रता रिस्टर स्केअलवर 3.8 इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 161 किमी आत होता. 

म्यानमार 

भारताचा शेजारी देश असलेल्या म्यानमारमध्येही आज पहाटे 5.13 मिनिटांनी 3.8 तिव्रतेचा धक्का बसला. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 116 किलोमीटरवर होता. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

भारतातही भूकंपाचे धक्के

भारतामधील लडाखमध्येही आज पहाटेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. कारगिलमध्ये पहाटे 3 वाजून 37 मिनिटांनी भूकंप झाला. त्याची तिव्रता 3 रिस्टर स्केअल इतकी होती. यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

अंदमानचा समुद्र

अंदमानच्या समुद्रामध्ये पहाटे 3 वाजून 51 मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तिव्रता 4.2 रिस्टर स्केअल इतकी होती. मात्र हा भूकंप फारच सौम्य असल्याने त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही.

हेही वाचा :  Interesting! दुसऱ्यांच्या पगाराची माहिती एका Click वर; कशी ते एकदा पाहाच



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का पुसण्यासाठी अजितदादांचा मास्टर प्लान

NCP Ajit Pawar On Baramati: बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का कायमस्वरूपी पुसण्यासाठी अजितदादांचा ॲक्शन प्लॅन तयार …

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …