नारायण राणेंचा पत्ता कट, अशोक चव्हाणांसह भाजपकडून ‘या’ तीन नेत्यांची उमेदवारी जाहीर

Rajya sabha Election : आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पुन्हा धक्कातंत्राचा अवलंब केला असून अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना वेलकम गिफ्ट भाजपने दिलंय. राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता नारायण राणे यांना मोठा धक्का बसलाय, असं म्हटंल तर वावगं ठरणार नाही. तर शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे आता राज्यसभेची निवडणूक (Rajya Sabha Elections 2024) बिनविरोध होणार का? असा सवाल विचारला जातोय. 

काँग्रेसकडून देखील राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.  महाराष्ट्र काँग्रेसकडून (Maharashtra Congress) चंद्रकांत हांडोरे (Chandrakant Handore) यांना राज्यसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलंय. तर अजित पवार गट, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट कोणाला उमेदवारी देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. एवढंच नाही तर निवडणूक बिनविरोध होण्यासाठी बैठकांचा सपाटा देखील लागू शकतो. तर भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा गुजरात मधून राज्यसभेवर जातील.

कसं असेल राज्यसभेचं समीकरण?

हेही वाचा :  सत्तेसाठी हापापलेले म्हणणाऱ्या शरद पवारांना फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले "आपल्याच पुतण्याची विकेट...."

काँग्रेसकडे 45 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यानुसार काँग्रेसची एक जागा निवडून येण्यास काहीही अडचण येणार नाही. तर भाजपकडे 104 आणि अन्य 13 अपक्ष आमदारांची मतं आहेत.त्यानुसार भाजपच्या 3 जागा सहजपणे निवडून येऊ शकतात. त्याचबरोबर शिंदे गटाकडे 39 आमदार आहेत. त्यामुळे त्यांचा एक उमेदवार निश्चित येऊ शकतो. तर ठाकरे गट आणि शरद पवार गट मिळून एक उमेदवार देण्याची शक्यता आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी आहे. 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून मतदानानंतर त्याच दिवशी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यसभेच्या एकूण 56 जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यातील महाराष्ट्रातील कुमार केतकर (काँग्रेस), वंदना चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार), अनिल देसाई (ठाकरे गट), प्रकाश जावडेकर (भाजप), नारायण राणे (भाजप), व्ही. मुरलीधरन (भाजपा) यांच्या 6 जागांचाही समावेश आहे.

दरम्यान, देशभरात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, गुजरात, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, हरियाणा, हिमाचल, राजस्थान, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यसभेच्या निवडणुका आहेत.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं ‘या’ स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रक

Konkan Railway News : मे महिन्याची सुट्टी, शिमगा आणि गणेशोत्सव यादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या …

भारतात लवकरच आपोआप दुरुस्त होणारे रस्ते? NHAI ने सुरु केलं काम; खड्ड्यांची समस्या कायमची संपणार

Self Healing National Highways In India: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या नेतृत्वाखालील रस्ते वाहतूक मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या …