MPSC Result: पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर

MPSC Result: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (Maharashtra Public Service Commission, MPSC) पोलीस उपनिरीक्षक पदाच्या (Sub-Inspector of Police)परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला सविस्तर निकाल पाहू शकतात. एमपीएससी बोर्डातर्फे अधिकृत वेबसाइट आणि ट्विटरवर यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर यशस्वी झालेल्या उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. उत्तीर्ण उमेदवारांचे ढोल-ताशांच्या गजरात अभिनंदन केले जात आहे. पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा २०१९ ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आली आहे.

Sub-Inspector of Police: गुणवत्ता यादी पाहण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा
सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट https://mpsc.gov.in/ वर जा.
Latest Update सेक्शनवर जा.
‘Advt.No.08/2019-Police Sub Inspector-General Merit List’ या लिंकवर क्लिक करा
पीडीएफ खुली होईल.
यादी तपासा. डाऊनलोड करा.
भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढा.

निकालाची नोटीस पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पोलीस उपनिरीक्षक पदाचा निकाल आणि गुणवत्ता यादी तपासण्यासोबतच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी वेबलींक सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. ही गुणवत्ता यादी तात्पुरत्या स्वरुपाची आहे. या निकालानंतर उमेदवारांनी नोंदवलेल्या आक्षेपांचा विचार करुन त्यानंतर बदल करुन अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्र आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.

हेही वाचा :  SSC MTS टियर १ चा निकाल जाहीर, जाणून घ्या तपशील

मुंबई पालिकेच्या विद्युतपुरवठा आणि परिवहन विभागात भरती, दीड लाखापर्यंत मिळेल पगार

इस्टर्न कोलफिल्डमध्ये बारावी उत्तीर्णांना संधी, ३१ हजारपर्यंत मिळेल पगार
भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा
या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय अधिकृत वेबसाइटवर देण्यात आला आहे. यासाठी अधिकृत वेबसाइट https://mpsc.gov.in/ वर जा.
‘ONLINE FACILITIES’ वर क्लिक करा. एक नवीन पेज उघडेल.
‘Post Preference/Opting Out’ या लिंकवर क्लिक करा.
ही लिंक ९ मार्च दुपारी ५ वाजल्यापासून १६ मार्च रात्री ११.५९ पर्यंत उपलब्ध असेल.

ऑनलाइन माध्यमातून केलेल्या अर्जांचा विचार केला जाईल. या व्यतिरिक्त कोणत्याही माध्यमातून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी अर्ज करता येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्या.

अर्ज सादर करण्यास मुदतवाढ
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२१ करीता अर्ज सादर करण्यास दिनांक १२ मार्च २०२२ रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

कंपनीत प्रमोशन हवे असेल तर ‘या’ प्रभावी टिप्स करा फॉलो
RBI Recruitment: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …