मौनी रॉयचा साडीतील रॉयल अंदाज, चाहत्यांची नजरच हटेना अदांनी केले घायाळ

मौनी रॉयने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वांनाचे वेडे केले आहे. ब्रम्हास्त्र चित्रपटातून अमिताभ बच्चन, शाहरूख खान यांच्यासारख्या दिग्गज कलाराकांसमोर मौनीचा अभिनयही वाखाणला गेला. मौनी आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो पोस्ट करत असते. नुकतेच मौनीने ऑर्गेंझा साडीत अत्यंत सुंदर फोटो पोस्ट केले असून तिच्या या फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत. जाणून घ्या मौनीचा रॉयचा हा लुक (फोटो सौजन्य – @imouniroy Instagram)

​ऑर्गेंझा साडीतील रॉयल लुक​

​ऑर्गेंझा साडीतील रॉयल लुक​

मौनी रॉयने नेसलेली ही ऑर्गेंझा साडी अत्यंत सुंदर दिसत आहे. अबोली रंगाची पेस्टल साडी आणि त्यावर करण्यात आलेले वर्क लक्ष वेधून घेत आहे. लाल आणि हिरव्या बुट्ट्यांचे यावर वर्क करण्यात आले असून या साडीवरून आणि मौनीवरून लक्षच दूर जात नाहीये.

​डिझाईनर ब्लाऊज केला मॅच​

​डिझाईनर ब्लाऊज केला मॅच​

यासह क्रिम रंगाचा ब्लाऊज आणि त्यावर संपूर्ण एम्ब्रॉयडरी करण्यात आली आहे. ऑर्गेंझा साडीसह हा ब्लाऊज अधिकच आकर्षक दिसत असून मौनीच्या सौंदर्यात भर घालत आहे. या साडीसह तिने हातात धरलेली फुलांची टोपरी अधिक सुंदर दिसत असून फुलांचा रंगही साडीला मॅच झाला आहे.

हेही वाचा :  कोणावर चढला प्रेमाचा लाल रंग तर कोणी पेस्टल कलरने वेधले सर्वांचे लक्ष, या आहेत २०२२च्या 'नववधू'

(वाचा – आलियाच्या प्लंजिंग नेकलाईन ऑलिव्ह ग्रीन ड्रेसची किंमत ऐकाल, तर चाटच पडाल)

​चाँदबालीने लावले चार चाँद​

​चाँदबालीने लावले चार चाँद​

मौनीने या ऑर्गेंझा साडीसह मॅच करणाऱ्या मोठ्या चाँदबाली कानात घातल्या असून साडीला मॅच होणारे रंग यामध्ये आहे. सोनेरी आणि गुलाबी असा हा कानातल्यांचा रंग लक्ष वेधून घेतोय. तर साडीतील मौनीच्या अदा या घायाळ करणाऱ्या दिसून येत आहेत.

(वाचा – वीणा जगतापचा मराठमोळा साज, सौंदर्य पाहून हरखून जाल)

​पोनीटेल हेअरस्टाईल​

​पोनीटेल हेअरस्टाईल​

मौनीने साडीसह पोनीटेल हेअरस्टाईल केली असून कपाळावर बटा सोडल्या आहेत. मौनीच्या सुंदर लांबसडक केसांची ही वेणी परफेक्ट भारतीय नारी लुक देतेय. तसंच मौनीची परफेक्ट फिगर या साडीमध्ये अधिक आकर्षक दिसून येत आहे.

(वाचा – मितालीने शेअर केला आंघोळीचा फोटो, स्टाईलच्या बाबतीत देतेय बॉलीवूड अभिनेत्रींनाही टक्कर)

​दागिन्यांची गरजच नाही​

​दागिन्यांची गरजच नाही​

मौनीने या साडीसह हातात केवळ अंगठी आणि कानातले घातले आहेत. बांगड्या, नेकलेस अशा कोणत्याही अन्य दागिन्यांच्या फॅशनची यासह गरजच भासत नाहीये. साडी आणि मौनीच्या सौंदर्यावरूनच नजर हटत नाहीये.

​स्मोकी आईज नॅचरल लुक​

​स्मोकी आईज नॅचरल लुक​

मौनीने यासह बेसिक मेकअप आणि नॅचरल लुक ठेवला आहे. काजळ, स्मोकी आईज आणि त्यासह न्यूड लिपस्टिक शेड मौनीने लावली आहे. तर हायलायटर आणि आयलॅशेसदेखील लावले आहे. आयब्रो पेन्सिलने जाड आयब्रो केल्या असून मौनीचा लुक अत्यंत देखणा दिसत आहे.

हेही वाचा :  थंडीत मौनी रॉयने वाढवले इंटरनेटचे तापमान, चैनने बनवलेला ड्रेस परिधान करुन चाहत्यांच्या हृदयावर केले थेट वार

मौनीचा हा साडी लुक तुम्ही कोणत्याही कार्यक्रमाला अथवा पार्टी रिसेप्शनसाठी कॅरी करू शकता. एलिगंट आणि कम्फर्टेबल असा हा लुक दिसून येत आहे.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …