सकाळी पुजारी आणि रात्री बाईक रेसिंग, आवड जोपासण्यासाठी भरपगारी IT नोकरीवर लाथ; अनोख्या गुरुजींची चर्चा

अनेकदा कर्तव्य आणि आपला छंद यांची सांगड घालणं फार कठीण असतं. यामुळेच अनेक तरुण आपली आवड किंवा पॅशन न जोपासता कर्तव्यापोटी इतर कामं करत असतात. हे ध्येय, इच्छा कायमच्या अपूर्ण राहिल्यानंतर मनातील ती खदखद आयुष्यभर सतावत राहते. पण केरळमधील 34 वर्षीय उन्नीकृष्णन यांनी मात्र योग्य समतोल राखत तरुणांसमोर एक उदाहरण ठेवलं आहे.  उन्नीकृष्णन मंदिरात पंडित असून, रोज सकाळी देवाची सेवा केल्यानंतर संध्याकाळी मात्र ते डर्ट बायकिंगची आवड जोपासत जुन्या परंपरांना छेद देत आहे. उन्नीकृष्णन सकाळी देवीची पूजा करतात आणि संध्याकाळी डर्ट ट्रॅक रायडर असतात. 

उन्नीकृष्णन (Unnikrishnan) यांचा दिवस पहाटे 5.30 वाजता सुरु होतो. पंडिताच्या वेषात ते रोज पहाटे पुड्डुक्कुलमर्गा देवी मंदिराचा (Pudhukkulmarga Devi Temple) दरवाजा उघडतात. कोट्टयम जिल्ह्यातील मंजूर गावात हे मंदिर आहे. 

मंदिर उघडल्यानंतर ते फक्त देवाच्या सेवेतच तल्लीन असतात. सकाळी 9.30 वाजेपर्यंत ते मंदिरातील सर्व विधी, पूजा पार पडतात. यानंतर मात्र त्यांच्यात पूर्णणणे बदल होतो. हा बदल इतका असतो, की कोणीही पाहिलं तर हे तेच पंडित आहेत यावर विश्वास बसणार नाही. याचं कारण उन्नीकृष्णन तिथेच मंदिराच्या एका कोपऱ्यात ठेवलेल्या बॅगमधील कपडे काढतात आणि त्यानंतर बाईक रायडर होतात. यावेळी त्यांच्या अंगावरील धोतर, उपरणं यावेळी गायब झालेलं असतं.  

हेही वाचा :  Stocks to Buy: वर्षभरातच तुमचा खिसा भरायची सुवर्णसंधी! 'हे' 5 Stocks देतील छप्परफाड Returns

“मी माझं रायडिंग गेअर, ग्लोव्ह्ज, बूट आणि हेल्मेट बाहेर काढून घालतो. यानंतर Xpulse 200 बाईक घेऊन निघतो. आधी भक्तांना, स्थानिकांना माझा हा अवतार पाहून आश्चर्य वाटायचं. पण आता त्यांना सवय झाली आहे,” असं उन्नीकृष्णन यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं.

बायकर आणि पुजारी उन्नीकृष्णन यांचा प्रवास

उन्नीकृष्णन कोट्टयमचे रहिवासी असून, कॉम्प्यूटर सायन्समध्ये पदवीधर आहेत. 2007 मध्ये त्यांना दुचाकीचा परवाना मिळाल्यानंतर मोटरसायकल आणि रेसिंग यांची आवड निर्माण झाली. यानंतर ते कोचीमधील रेसिंग क्लबमध्ये सहभागी झाले. 2011 पर्यंत त्यांनी प्रोफेशनल स्टंट रायडर होण्यावर मेहनत घेतली. 

कॉम्प्यूटर सायन्सची पार्श्वभूमी असतानाही आणि कोची येथे चांगली नोकरी असतानाही उन्नीकृष्णन यांना मात्र त्यांचं पॅशन खुणावत होतं. नोकरीमुळे त्यांना त्यांची आवड जोपासण्याची संधी मिळत नव्हती. “2010 ते 2013 दरम्यान ऑफिसच्या वेळा आणि नाईट शिफ्ट यामुळे मी फार व्यग्र असायचो. यानंतर मी माझा मित्र अमजेठसह भारत आणि नेपाळमध्ये बाईक ट्रिपवर गेलो. माझा हा निर्णय फार स्वातंत्र्य देणारा होता,” असं उन्नीकृष्णन यांनी सांगितलं.

2019 मध्ये उन्नीकृष्णन यांचे वडील नारायण नंबूथिरी यांचं निधन झालं. त्यांचे वडील पुजारी होते. यामुळे उन्नीकृष्णन यांच्यावर वडिलांनंतर पुजारी होण्याची जबाबदारी आली. याआधी उन्नीकृष्णन यांनी काही क्षणांसाठी मंदिरांमध्ये पुजाऱ्याचं काम केलं होतं. पण 2011 मध्ये पुड्डुक्कुलमर्गा देवी मंदिराचा त्यांनी पूर्णवेळ पुजारी होण्याची जबाबदारी घेतली. 

हेही वाचा :  गुंतवणूकदार एका झटक्यात करोडपती; या स्टॉकने दिला 1.12 कोटीचा परतावा

बंगळुरुतील डर्ट ट्रॅक रेसमध्ये होणार सहभागी

उन्नीकृष्णन यांच्यावर कुटुंबाचा पुजाऱ्याची जबाबदारी पाडण्याचा दबाव होता. तर दुसरीकडे त्यांचं मोटरसायकल प्रेम त्यांना सतावत होतं. पण उन्नीकृष्णन यांनी सुवर्णमध्य शोधला. कोईम्बतूर येथे पार पडलेल्या इंडियन नॅशनल रॅली चॅम्पियनशिपमध्ये उन्नीकृष्णन सहभागी झाले होते. यावेळी त्यांना यशस्वीपणे 200cc मोटरसायकल स्पर्धा पूर्ण केली. 

सध्या उन्नीकृष्णन बंगळुरुत नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या डर्ट ट्रॅक रेससाठी तयारी करत आहेत. पण यावेळी त्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. याचं कारण उन्नीकृष्णन यांच्या कमाईसाठी मंदिर हे एकमेव साधन आहे. पण यानंतरही सर्व परिस्थितींवर मात करत आपण यश मिळवू असा विश्वास ते व्यक्त करत आहेत. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘पत्नीसोबत अनैसर्गिक शरीर संबंध गुन्हा नाही’, कोणत्या प्रकरणात हायकोर्टाने दिला निर्णय?

Unnatural Intercourse: पती पत्नीमध्ये अनेक कारणांवरुन वाद होत असतात. हे वाद टोकाला गेले की कोर्टाची …

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …