लहान वयातच मासिक पाळी थांबविण्याची मेन्स्ट्रूअल सप्रेशन प्रक्रिया नक्की काय आहे, कोणासाठी आहे ही ट्रीटमेंट

साधारण वयाच्या ४० पर्यंत महिलांना दर महिन्याला नियमित मासिक पाळी यायला हवी. शरीराच्या आरोग्यासाठी हे महत्त्वाचे आहे. या दरम्यान रिप्रॉडक्टिव्ह हार्मोन्स वरखाली होत असतात, ज्याचा सर्वात जास्त परिमाण हा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होत असतो. काही महिलांना पोटात कळा येतात, तर काही महिलांना कंबरेतील कळांमुळे बसणंही असह्य होतं. यावेळी काम करणे सोपे नसते. यासाठी अनेक महिला आता Menstrual Suppression चा आधार घेत आहेत, पण ही प्रक्रिया नक्की काय आहे आणि याचे नुकसान होऊ शकते का जाणून घ्या. (फोटो सौजन्य – Freepik.com)

​मेन्स्ट्रूअल सप्रेशन म्हणजे काय?​

​मेन्स्ट्रूअल सप्रेशन म्हणजे काय?​

मासिक पाळीची प्रक्रिया साधारणतः बंद करणे म्हणजे मेन्स्ट्रूअल सप्रेशन प्रक्रिया. मासिक पाळीची प्रक्रिया थांबवणे अथवा कमी करण्याच्या प्रक्रियेला मेन्स्ट्रूअल सप्रेशन असे म्हणतात. गोळ्यांच्या मदतीने या उपचारात पाळी थांबवली जाते अथवा पाळी येण्याची Frequency कमी करण्यात येते. रक्ताचा प्रवाह कमी करण्यासाठीही या उपचाराचा उपयोग केला जातो. डॉक्टरांच्या योग्य मार्गदर्शनाखालीच ही प्रक्रिया करण्यात येते.

हेही वाचा :  भूमाफियांचा चक्क देवालाच गंडा, 25 एकर जमीन हडपली

​कधी आणि कोणासाठी सुरू झाली ही प्रक्रिया​

​कधी आणि कोणासाठी सुरू झाली ही प्रक्रिया​

सर्वात पहिल्यांदा ही मेन्स्ट्रूअल सप्रेशन प्रक्रिया मानसिक अथवा शारीरिक दिव्यांग असणाऱ्या महिलांसाठी सुरू करण्यात आली होती. ज्या महिलांना मासिक पाळी दरम्यान स्वतःकडे लक्ष देता येत नाही, त्याची जाणीव त्यांना होत नाही अशा महिलांसाठी हा उपचार सुरू करण्यात आला. यानंतर ज्या महिला आर्मीमध्ये कार्यरत आहेत आणि अशावेळी मासिक पाळीचा त्रास सहन करणे त्यांना शक्य होत नाही त्यांच्यासाठी हे उपचार करण्यात आले.

(वाचा – Fact Check: मासिक पाळीनंतर चेहऱ्यावर येते चमक, काय वाटते तुम्हाला)

​कोणासाठी ही मेन्स्ट्रूअल सप्रेशन प्रक्रिया?​

​कोणासाठी ही मेन्स्ट्रूअल सप्रेशन प्रक्रिया?​

ज्या महिलांना डॉक्टरांकडून सल्ला देण्यात येतो त्यांनाच ही मेन्स्ट्रूअल सप्रेशन प्रक्रिया करता येते. ज्या महिलांना मासिक पाळीच्या दिवसात जास्त रक्तप्रवाहाचा त्रास होतो, अथवा ज्या मुलींना पोटात आणि कंबरेतून येणाऱ्या असह्य कळा सहन करणे कठीण होते तेव्हाच ही मेन्स्ट्रूअल सप्रेशन करण्याचा सल्ला देण्यात येतो.

(वाचा – ब्ल्यू बेबी सिंड्रोम आणि जन्मजात हृदयरोग यांच्यातील संबंध नक्की काय, तज्ज्ञांकडून माहिती)

​सप्रेशनपूर्वी करतात डॉक्टर चाचणी​

​सप्रेशनपूर्वी करतात डॉक्टर चाचणी​

मेन्स्ट्रूअल सप्रेशन करण्यापूर्वी कोणतीही मेडिकल हिस्ट्री नाही ना याची तपासणी करण्यात येते. तसंच ऑर्गनसंबंधित कोणतीही समस्या असेल तर अथवा गंभीर आजार असेल तर त्याची लक्षणे पाहून ही प्रक्रिया करण्यात येते. सामान्य चाचणी केल्यानंतर डॉक्टर यावर योग्य मार्गदर्शन करू शकतात.

हेही वाचा :  दिवसाची कमाई 50 लाख रुपये! 'या' भारतीयाने परदेशात संपूर्ण बेटच विकत घेतलं अन्...

(वाचा – जमिनीवर बसून जेवण्याचे आहेत Weight loss सह जबरदस्त फायदे, डायनिंग टेबलजवळ बसणं ठरतंय घातक)

​कशी आहे मेन्स्ट्रूअल सप्रेशनची मेथड?​

​कशी आहे मेन्स्ट्रूअल सप्रेशनची मेथड?​
  • यामध्ये सर्वात पहिले कंट्रोल पिल्स दिली जाते. यामध्ये मासिक पाळी पूर्ण थांबत नाही तर रक्तप्रवाह कमी होण्यास मदत मिळते. तसंच मासिक पाळीचा त्रास तुम्ही सहन करू शकता इतका कमी होतो
  • एक पद्धत आहे स्किन पॅच. या प्रक्रियेनंतर ४ महिन्याने मासिक पाळी येते
  • डेपो – प्रोवरा ही पण अजून एक पद्धत आहे, ज्यामध्ये ३ महिन्यात एक शॉट घ्यावा लागतो. ज्या महिलांना मासिक पाळी बंदच करायची आहे त्या महिला याचा अवलंब करतात
  • प्रोजेस्टिन IUD मेथडद्वारे डॉक्टर महिला रूग्णांमध्ये इंट्रायुटेराईन डिव्हाईस पाच वर्षांसाठी इन्सर्ट करतात

या सर्व पद्धतीत एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे यामुळे प्रोजेस्टिन हार्मोन तयार होते, जे युट्रस लायनिंग पातळ करते आणि मासिक पाळीतील रक्तप्रवाह हळूहळू कमी होत बंद होतो

​का वाढतेय ही प्रक्रिया?​

​का वाढतेय ही प्रक्रिया?​

महिलांमध्ये मासिक पाळीच्या त्रासाबद्दल बोलण्याचा बिनधास्तपणा अजूनही आलेला नाही. पण या त्रासातून एका काळानंतर सुटण्यासाठीही महिलांना गरज असते. कारण यामुळे चिडचिडेपणात वाढ आणि सतत मूड स्विंग्ज होणे हे प्रकार अधिक होऊ लागतात. त्यामुळे वेळीच मेन्स्ट्रूअल सप्रेशन करून घेऊन हा ताण कमी करण्यासाठी हीच प्रक्रिया करून घेण्यासाठी महिला पुढे येत आहे.

हेही वाचा :  मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारचा मास्टर प्लान! जरांगे यांचा विरोध

टीप – सदर माहिती ही अभ्यासानुसार घेण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून घेऊ शकता.

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …