पुरूषांनो निप्पल शेजारील त्वचेचा रंग बदललाय? तुम्हालाही होऊ शकतो स्तनांचा कर्करोग! जाणून घ्या लक्षणं

Breast cancer in men : ‘ब्रेस्ट कॅन्सर रिसर्च’ या ओपन-एक्सेस जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, पुरुषांमध्ये स्तनाचा कर्करोग (breast cancer in men) होत असल्याचे आढळून आले आहे. रिपोर्टनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंड आणि वेल्समध्ये स्तनाच्या कर्करोगाचे निदान झालेल्या 1,998 पुरुषांची मुलाखत घेतली असता, त्यामध्ये 112 ( 5.6 टक्के ) स्वत: वंध्यत्वाची तक्रार (hirlwind brawl ) करतात आणि 383 ( 19.2 टक्के ) लोकांना मूल झाले नसल्याची नोंद आहे. पुरुषांच्या स्तनाच्या कर्करोगाचे (Cancer) नेमके कारण माहित नाही. पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या जोखीम घटकांमध्ये तरुण पुरुषांना स्तनाचा कर्करोग होऊ शकतो, परंतु वयानुसार धोका वाढतो. निदान करताना पुरुषांचे सरासरी वय 60 ते 70 वर्षांच्या दरम्यान असते. अंडकोषांची जळजळ, ज्याला ऑर्किटिस म्हणतात ज्यामुळे धोका अधिक वाढू शकतो. याबाबत कर्करोगतज्ञ डॉ दत्तात्रय अंदुरे यांनी दिलेली माहिती अतिशय महत्वाची आहे.
(फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

​ही आहेत कारणे

जर एखाद्या पुरुषाने त्याच्या छातीजवळ रेडिएशन थेरपी घेतली असेल तर त्याला स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. याशिवाय जर एखाद्याच्या कुटुंबात ब्रेस्ट कॅन्सरचा इतिहास असेल तर या आजाराची शक्यता वाढते.

हेही वाचा :  वाईन कलर साडी, सोन्याचे भरगच्च दागिने, 53 वर्षांच्या भाग्यश्रीचं विशीतल्या मुलीला लाजवणारं तारूण्य करतंय अवाक्

(वाचा – High Blood Sugar आणि Weight Loss पाठोपाठ ‘हा’ जीवघेणा कॅन्सर दार ठोठावतोय! या दोन लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका)

​अशी आहेत लक्षणे

पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची बहुतेक प्रकरणे 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांमध्ये आढळून आली आहेत. लक्षणांच्या कमतरतेमुळे, त्याची गंभीर स्थिती पुरुषांमध्ये दिसून येते.

– एका स्तनाची वाढ

– स्तनाग्रातील वेदना

– स्तनाग्रातून स्त्राव

– स्तनाग्र किंवा अरेओला वर फोड येणे

– अंडरआर्म लिम्फ नोड्स वाढणे

(वाचा -Weight Loss Drink: पोटावरची लटकणारी चरबी एका झटक्यात करेल कमी ‘हे’ ड्रिंक्स, केस गळणे डायबिटीज कंट्रोलमध्ये))

​छातीवरली गाठीकडे दुर्लक्ष करू नका

तुमच्या छातीवर गाठ निर्माण होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. ही गाठ स्तनाग्रभोवती स्तनाजवळच उद्भवते. सहसा या गुठळ्या दुखत नाहीत. परंतु स्पर्श केल्यावर त्या कडक लागतात. कर्करोग जसजसा वाढत जातो तसतशी त्याची सूज मानेपर्यंत पसरते. जरी बहुतेक गाठी हे कर्करोगाचे लक्षण नसले तरी तरीही तुम्हाला अशी काही तक्रार असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.

(वाचा – इन्सुलिन सारखंच काम करतात भिजवलेले अक्रोड, हाय शुगर आणि घाणेरड कोलेस्ट्रॉल एका झटक्यात करतं कमी)

हेही वाचा :  नैसर्गिकरित्या शरीर डिटॉक्स करण्यासाठी वापरा या सोप्या २ पद्धती, घरगुती उपाय

​इतर लक्षणे कोणती?

या लक्षणांसोबत थकवा, हाडे दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि त्वचेवर सतत खाज येणे यासारख्या लक्षणांसह असू शकते. तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास, तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

(वाचा – ऑपरेशनशिवाय होणार मुळव्याधावर उपचार, आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं ही भाजी पाइल्सला मुळापासून उपटून टाकेल)

​कॅन्सरचे निदान कसे कराल

पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे दिसून आल्यानंतर त्यांची बायोप्सी केली जाते. यामध्ये छातीतील गाठीतून एक तुकडा काढून प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवला जातो. ही गाठ कॅन्सरमुळे आहे की नाही हे चाचणीवरून कळते. याशिवाय कॅन्सरच्या आणखी काही चाचण्या केल्या जातात ज्यामुळे त्याचा टप्पा ओळखता येतो.

(वाचा – Control Low BP without Medicine : वर्षानुवर्षांचा बीपी या ५ सवयींने होईल एकदम गायब,औषधंही फेकून द्यावी लागतील)

​काय आहेत उपचार

स्तनाच्या कर्करोगावर बहुतेकदा पुरुष आणि स्त्रियांमध्ये समान उपचार केले जातात. स्तनाच्या कर्करोगावर तीन प्रकारे उपचार केले जातात. पहिल्या उपचारात रुग्णावर शस्त्रक्रिया करून छातीतून गाठ काढली जाते. दुसर्‍या पद्धतीत, रुग्णावर केमोथेरपी केली जाते, ज्यामध्ये औषधांद्वारे कर्करोगाच्या पेशी नष्ट केल्या जातात. तिसरा उपचार रेडिएशन थेरपीद्वारे केला जातो. .तसेच हर्मोनल थेरपी , टार्गेटेड थेरपी देखील वापरली जाते.

हेही वाचा :  मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; ठाकरेंना टक्कर देणार ठाकरे

(वाचा – Breast Cancer च्या लास्ट स्टेजमध्ये किती दिवस जगतात महिला? भारतातील अवस्था अतिशय बेकार))

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘लोकसभेत कमी जागांवर लढलो, आता विधानसभेच्या…’, शरद पवारांचं मोठं विधान, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला संकेत

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील (NCP) …

रवींद्र वायकर यांच्या खासदारकीच्या वादात मोठा ट्विस्ट! उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालाविरोधात हायकोर्टात याचिका

Ravindra Waikar : उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात, मुंबई उच्च न्यायालयात याचिका …