‘मी भिजून पुरी आता झाले ओली’…अश्विनी कासारचा वेड लावणारा लुक

‘कमला’, ‘कट्टी बट्टी’, ‘सावित्रीज्योती’ सारख्या मालिकेतून घराघरात आपल्या अभिनयाने सर्वांना आपलंसं करून घेणारी अभिनेत्री अश्विनी कासार खऱ्या आयुष्यात मात्र खूपच बिनधास्त आणि स्टायलिश आहे. नुकतेच अश्विनीने भिजलेल्या साडीतील काही फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले असून इंटरनेटचे वातावरण तापवले आहे.

अश्विनी कासारचे हे फोटो थोडे ऐश्वर्या नारकरच्या फोटोसह मिळतेजुळते असल्याचेही म्हटले जात आहे. मात्र अश्विनीचे सौंदर्य या साडीत खुलून आले आहे. हिरव्या गडद साडीतील अश्विनीच्या या रूपाने चाहत्यांना वेड लावले आहे. पाहूया अश्विनीचा हा लुक कसा आहे. (फोटो सौजन्य – @ashwinikasar18 Instagram)

हिरव्याकंच साडीतील अश्विनीच्या अदा

हिरव्याकंच साडीतील अश्विनीच्या अदा

हिरव्या गडद साडीत अश्विनीने हे फोटोशूट केले आहे. संध्याकाळचा रोमँटिक प्रकाश आणि त्यात ओल्या साडीतील अश्विनीच्या अदा या चाहत्यांना घायाळ करत आहेत. कुठेही वल्गरता नाही तर केवळ आर्ट असाच हा लुक दिसून येतोय. कॉटनच्या या साडीत अश्विनीने सर्वांच्या नजरा वेधून घेतल्या आहेत.

लुगडं पद्धतीतील साडीतील ग्लॅम

लुगडं पद्धतीतील साडीतील ग्लॅम

महाराष्ट्रात अनेक गावांमध्ये अशा कॉटनच्या साडीला लुगडं असं म्हटलं जातं. अश्विनीने नेसलेली ही साडी अशाच पद्धतीची असून त्यावर तिने बॉर्डरला मॅच असा निळा कॉटनचा ब्लाऊज घातला आहे. तर डोळे मिटत परफेक्ट फिगर साडीमध्ये फ्लाँट करत अश्विनीने सर्वांचे मन जिंकले आहे. बिनधास्त आणि सुंदर असे आगळेच समीकरण दिसून येतेय.

हेही वाचा :  मिरा भाईंदर पालिकेत बंपर भरती, बारावी उत्तीर्णांना मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

(वाचा – Exclusive: सुरभी हांडेचा मनमोहक लुक, नऊवारीतला साज आणि नथीचा नखरा करतोय घायाळ)

मोकळे केस आणि स्मितहास्य

मोकळे केस आणि स्मितहास्य

अश्विनीने या साडीसह कोणतीही इतर हेअरस्टाईल न करता केस मोकळे सोडले आहेत आणि स्मितहास्यासह फोटो पोस्ट केले आहेत. या एका स्मितहास्याने अनेक चाहते फिदा झाले असल्याचे दिसून येत आहे. तिच्या या फोटोंवर चाहतेच नाही तर सेलिब्रिटी मित्रमैत्रिणींच्याही कमेंट्स दिसून येत आहेत.

(वाचा – ‘चिंब भिजलेले रूप सजलेले’, ऐश्वर्या नारकरचे विशीतील तरूणींनाही लाजवेल असे रूप)

ओले केस आणि हिरव्या बांगड्या

ओले केस आणि हिरव्या बांगड्या

या साडीसह अश्विनीने गावाकडील महिला जशा साधारण असतात तशाच हातात अगदी माफक हिरव्या बांगड्या घातल्या असून गावरान लुकला प्राधान्य दिल्याचे दिसून येते. पाण्यात भिजलेले आणि ओले केस आणि अश्विनीच्या चेहऱ्यावरील नैसर्गिक निरागसता चाहत्यांना मोहून टाकत आहे.

(वाचा – ‘गुलाबाची कळी कशी…’ रिंकूच्या गुलाबी लुकवर चाहते फिदा, म्हणतायत ‘महाराष्ट्राची अप्सरा’ )

माफक मेकअप

माफक मेकअप

अत्यंत नैसर्गिक आणि फोटोग्राफीसाठी जितका गरजेचा आहे तितकाच मेकअप अश्विनीने केल्याचे दिसून येत आहे. आयशॅडो, हायलायटर आणि लिपस्टिक, अगदी मेकअपचा बेस वापरून तिने लुक पूर्ण केला आहे. मात्र हाच साधा पण आकर्षक दिसून येतोय.

हेही वाचा :  "देवेंद्रजी कुटुंब तुम्हालाही आहे हे लक्षात ठेवा, अन्यथा नुसतं शवासन..."; उद्धव ठाकरेंची जाहीर धमकी

साधेपणातही सौंदर्य आहे हेच अश्विनीने या फोटोवरून दाखवून दिले आहे. ओल्या भिजलेल्या फोटोंसाठी नेहमीच बिकिनीचीच गरज आहे असं नाही तर साडीतही तितकंच सुंदर दिसता येतं हेदेखील दिसून येतेय.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election 2024 : बारामतीत मतदानाला थंड प्रतिसाद; तिसऱ्या टप्प्यातील एकूण आकडेवारी नेमकं काय खुणावू पाहतेय?

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचं मतदान मंगळवारी पार पडलं. यावेळी देशातील 11 …

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …