पुढील सुचना मिळेपर्यंत McDonald’s बंद; अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात

Mcdonald’s : जगभरात आर्थिक मंदीची (Recession) चाहूल लागलेली असतानाच मोठमोठ्या कंपन्यांमधून कर्मचारी कपात करण्यात येत आहे. असं असतानाच आता या यादीत दर दिवशी नव्यानं काही कंपन्यांच्या नावांचा समावेश होताना दिसत आहे. या कंपन्यांमध्ये जगातील सर्वात मोठी Fast Food Chain अशी ओळख असणाऱ्या Mcdonald’s चाही समावेश होणार आहे. कारण, या आठवड्यापासून Mcdonald’s त्यांची अमेरिकेतील कार्यालयं पुढील सुचना मिळेपर्यंत बंद करणार आहे. 

कंपनीचं चाललंय काय? 

‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या माहितीनुसार येत्या काळात कंपनीकडून कॉर्पोरेट विभागांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात केली जाऊ शकते, त्यांना यासंबंधीच्या सूचना देण्याच्या विचारात कंपनी असल्याचं म्हटलं जात आहे. याआधी कंपनीकडून कर्मचाऱ्यांना सोमवार ते बुधवार यादरम्यान घरूनच काम करण्यासंबंधीचा Email करण्यात आला होता. 

कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकरीसंदर्भातील माहिती व्हर्चुअली देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. असं असलं तरीही Mcdonald’s मधून नेमके किती कर्मचारी त्यांची नोकरी गमावणार हा आकडा मात्र अद्यापही समोर आलेला नाही. शिवाय एप्रिल महिन्यातील पहिल्या आठवड्यात होणाऱ्या सर्व बैठका रद्द करण्याचे निर्देशही कंपनीकडून कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. 

हेही वाचा :  सुका मेवा लगेच होतो खराब? मग 'या' टिप्स करा फॉलो

2023 च्या सुरुवातीलाच दिली होती कर्मचारी कपातीची कल्पना… 

व्यवसायातील काही अद्ययावत आणि प्रगत तत्त्वांवर आधारित रणनितीची अंमलबजावणी करत असताना कंपनीकडून कॉर्पेरेट विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामाचा पुन्हा एकदा आढावा घेतला जाणार असल्याचं म्हणत काही विभागांत कर्मचारी कपात केली जाऊ शकते, तर काही विभागांमध्ये नव्यानं नोकरभरती होऊ शकते याची कल्पना मॅकडॉनल्ड्सकडून कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती. सदरील घोषणा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील बुधवारपर्यंत होऊ शकते असं म्हटलं जात आहे. 

नोकरकपातीचं संकट टळेना… 

दरम्यान, फक्त मॅकडॉनल्ड्सच या निर्णयावर पोहोचलं आहे असं नाही. तर, याआधी आर्थिक मंदी आणि वाढत्या महागाईचा आलेख पाहता परिस्थितीला तोंड देण्यासाठी Google, Amazon, आणि Facebook यांसारख्या कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …

‘आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची…’, CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या निधनानंतर मी उद्धव ठाकरेंना …