सिम पोर्ट कसं कराल?, नंबर न बदलता कंपनी होणार चेंज, या ठिकाणी पाहा सोपी ट्रिक

नवी दिल्लीः टेलिकॉम कंपनीचे नेटवर्क, इंटरनेट आणि अन्य सर्विसमुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. परंतु, रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया सह बीएसएनएल मधील ग्राहक एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत जात असतात. काही कंपन्यांच्या सेवेला त्रासून यूजर्स आपला नंबर दुसऱ्या कंपनी सोबत जोडू शकतो. याला Mobile Number Portability म्हणजेच MNP असे म्हटले जाते. तुम्हाला यासंबंधी माहिती नसेल तर आम्ही तुम्हाला या ठिकाणी यासंबंधीची सोपी ट्रिक सांगणार आहोत. तुम्ही घरी बसू आपला नंबर दुसऱ्या नेटवर्कवर पोर्ट करू शकता. जाणून घ्या डिटेल्स.

असं करा मोबाइल नंबर पोर्ट
स्टेप 1. आपल्या फोनच्या एसएमएस बॉक्स मध्ये जावून नवीन मेसेज लिहिण्याचा ऑप्शन ओपन करा.
स्टेप 2. या ठिकाणी PORTआणि एक स्पेस देऊन आपला मोबाइल नंबर टाइप करा. उदाहरणासाठी PORT 901#####88
स्टेप 3. मेसेज टाइप केल्यानंतर याला 1900 नंबरवर पाठवा.
स्टेप 4. मेसेज सेंड होताच तुम्हाला एक नवीन मेसेज प्राप्त होईल. ज्यावेळी फोनचे बिल पूर्णपणे पेड होईल.
स्टेप 5. तुम्हाला हे पोर्टिंग कोड ज्यावेळी मिळेल.
स्टेप 6. 1901 नंबर वरून प्राप्त झालेल्या मेसेज मध्ये ८ अंकाचा यूनिक कोड असेल. याला पोर्टिंग कोड किंवा UPC म्हटले जाते.
स्टेप 7. या ८ अंकाच्या कोडपासून सुरू होऊन दोन इंग्लिशचे अल्फाबेट असतील. बाकीचे ६ डिजिट असतील.
स्टेप 8. हे पोर्टिंग कोड काही दिवसासाठी मान्य असते. या दिवसात या कोडला यूज केले जावू शकते.
स्टेप 9. या यूनिक पोर्टिंग कोडला त्या कंपनीच्या आउटलेट किंवा स्टोरवर जावे लागते. ज्या कंपनीचे नेटवर्कवर तुम्हाला नंबर बदलायचा आहे.
स्टेप 10. आउटलेटवर अॅप्लिकेशन फॉर्म भरला जाईल. यानंतर नवीन सीम दिला जाईल. सध्या काही कंपन्या डिलिव्हरी सुद्धा करतात.

MNP चा फायदा

मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीची सर्वात खास बाब म्हणजे यात यूजरला आपला मोबाइल नंबर बदलावा लागत नाही. म्हणजेच तुमचा जो नंबर आहे. तोच कायम राहतो. फक्त कंपनी बदलते. एमएनपी मुळे आपल्या मर्जीनुसार आपण कंपनी निवडू शकतो.

हेही वाचा :  दहावी-बारावी निकालाबाबत महत्वाची बातमी, पाहा Results कधी लागणार?

वाचाः Window आणि Split AC चा खेळ खल्लास, आला नवीन एसी, खरेदीसाठी उडाली झुंबड

पोस्टपेड नंबर सुद्धा करू शकता पोर्ट
प्रीपेड यूजर्स प्रमाणे पोस्टपेड यूजर्स सुद्धा एमएनपीच्या सर्विसचा लाभ घेऊ शकतात. जे ग्राहक आपल्या टेलिकॉम नेटवर्कला सोडून दुसऱ्या कंपनीशी जोडण्याची योजना बनवत असेल त्या लोकांसाठी ही माहिती आहे. एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत जाता येते.

भारतातील टेलिकॉम कंपन्या
रिलायन्स जिओ
वोडाफोन आयडिया
भारत संचार निगम लिमिटेड
महानगर टेलिकॉम निगम लिमिटेड

वाचाः Apple घेवून येतोय सर्वात स्वस्त iPhone , बाकीच्या फोनचे वाढणार टेन्शन

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharashtra Board Result 2024: दहावी आणि बारावीचा निकालाबाबत मोठी बातमी, अपडेट जाणून घ्या

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत मोठी बातमी समोर …

अपयशाला कोणीच साथी नसतो पण..’ संकटकाळात केएल राहुलला मिळाली ‘या’ व्यक्तीची साथ

IPL 2024 KL Rahul: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चा 17 वा हंगामा वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत राहिला. …