मनोज तिवारी तिसऱ्यांदा होणार बाबा, पत्नीच्या बेबी शॉवरचा व्हिडीओ केला शेअर

Manoj Tiwari: भोजपूरी चित्रपटसृष्टीतील अभिनेते, गायक आणि भाजप नेते मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. मनोज तिवारी हे तिसऱ्यांदा बाबा होणार आहेत. नुकताच मनोज तिवारी यांनी पत्नी सुरभी  (Surbhi Tiwari) यांच्या बेबी शॉवरचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या फोटो आणि व्हिडीओला कमेंट करुन सुरभी आणि मनोज यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

मनोज तिवारी यांनी पत्नी सुरभीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, ‘काही वेळा आनंद हा आपण शब्दांमध्ये मांडू शकत नाही. फक्त आपण फक्त तो अनुभवू शकतो.’ या व्हिडीओला कमेंट करुन अनेक सेलिब्रिटींनी तसेच नेटकऱ्यांनी मनोज यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओमध्ये सुरभी या रेड कलरचा ट्रेडिशनल आऊटफिट आणि स्टोनची ज्वेलरी अशा लूकमध्ये दिसत आहेत. 

पाहा व्हिडीओ:


मनोज तिवारी यांनी दोनवेळा संसार थाटला. त्यांचे पहिले लग्न हे राणी यांच्यासोबत 1999 मध्ये झाले. लग्नानंतर 13 वर्षांनी मनोज आणि राणी यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मनोज आणि राणी यांना जिया नावाची मुलगी आहे. जिया ही तिच्या आईसोबत मुंबईमध्ये राहते. मनोज यांनी 2020 मध्ये सुरभी यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. सुरभी आणि मनोज यांना एक मुलगी आहे. आता सुरभी आणि मनोज यांच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन मनोज तिवारी यांचे चाहते त्यांना शुभेच्छा देत आहेत. 

हेही वाचा :  Tunisha Sharma : अभिनेत्री तुनिषा शर्मावर आज अंत्यसंस्कार

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

अभिनेते खासदार मनोज तिवारींना कन्यारत्न, मुलीच्या जन्मानंतर म्हणाले ‘जय जगदंब’



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …