हे वाचा-नेहा-यश होणार आईबाबा? ‘माझी तुझी रेशीमगाठ’च्या जोडप्याने घेतला महत्त्वाचा निर्णय
हृदयी प्रीत जागते या मालिकेमध्ये सिद्धार्थ खिरीड आणि पूजा कातुर्डे ही फ्रेश जोडी दिसणार आहे. पूजाची ही पहिलीच मालिका असून सिद्धार्थने ‘फ्रेशर्स’, ‘मुलगी झाली हो’ या मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. त्याने ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत सिद्धार्थ भोसले याा पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती, त्यावर प्रेक्षकांनी विशेष प्रेम केले. दरम्याच गेल्याच महिन्यात त्याने ही मालिका सोडली. आता सिद्धार्थ एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
हे वाचा-पैठणीची गोष्ट सांगितल्यानंतर सायली संजीव साकारणार ऐतिहासिक भूमिका
या मालिकेच्या प्रोमोवरुन यामध्ये भारतीय संगीत आणि पाश्चिमात्य संगीत यांचा मेळ पाहायला मिळणार आहे. झी मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये म्हटलं आहे की, ‘तो रिदमचा बादशाह ती सुरांची राणी कशी असेल यांची प्रेम कहाणी?’ या मालिकेत सिद्धार्थ आणि पूजा यांच्या पात्रांची नावं अद्याप गुलदस्त्यात असली तरी सिद्धार्थ पाश्चिमात्य संगाीतात तरबेज दाखवण्यात आला आहे तर पारंपरिक संगीत जोपासताना पूजा दिसते आहे. आता या दोघांची लव्ह स्टोरी किती सुरेल असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
दरम्यान प्रेक्षकांनी हा प्रोमो समोर येताच मालिकेचे कौतुक केले आहे. अशाच विषयासाठी उत्सुक होतो, अशा प्रतिक्रिया चाहते देत आहेत. मात्र आता ०८ वाजता ही मालिका दिसणार असल्याने कोणती मालिका बंद होणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या वेळेत सध्या ‘तू तेव्हा तशी’ ही मालिका प्रेक्षक पाहतात. त्यामुळे आता स्वप्निल जोशी आणि शिल्पा तुळसकर यांची ही मालिका बंद होणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या