Malaika Arora : मलायका अरोराच्या शॉर्ट कपड्यांवर अरबाजने दिले होते ‘असे’ उत्तर

Malaika Arora : अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अरबाज खानची एकेकाळी इंडस्ट्रीतील सर्वात चर्चेत असलेली जोडी म्हणून ओळख होती. मलायका आणि अरबाज आज एकत्र नाहित. परंतु, आजही या जोडीचे  चाहते आहेत. मलायका आणि अरबाज खान एका फोटोशूटदरम्यान भेटले होते. असे म्हटले जाते की ते पहिल्या नजरेतच एकमेकांच्या प्रेमात पडले होते. काही वर्षे डेटिंग केल्यानंतर 1998 मध्ये त्यांनी लग्न केले. या लग्नापासून मलायका आणि अरबाजला अरहान खान हा मुलगा आहे. 

मलायका आणि अरबाज खान यांनी लग्नाच्या 19 वर्षानंतर 2017 मध्ये घटस्फोट घेतला आणि त्यांच्या सर्व चाहत्यांना धक्का बसला. हे दोघे नात्यात असताना एकमेकांबद्दल खूप आदर करत असत. एका मुलाखतीत अजबाजने दिलेल्या उत्तरातूनच ही गोष्ट अधोरेखीत झाली आहे.    

मलायका आणि अरबाज एका चॅट शोमध्ये सहभागी झाले होते. येवळी होस्टने अरबाज खानला मलायकाबाबत प्रश्न विचारला. मलायका ग्लॅमरस आहे आणि ती अनेकदा शॉर्ट कपड्यांमध्ये दिसते, लोक विचारतात की, हे सर्व पाहून अरबाज खानला कधी राग येत नाही का?’ या प्रश्नाला उत्तर देताना अरबाज खान म्हणाला होता ही, ‘यामध्ये काय वाईट आहे? मलाइकाला चांगलेच माहित आहे की तिने काय करावे आणि काय नाही. त्याचवेळी मलायकाने असेही म्हटले होते की, ती असे कोणतेही काम करत नाही ज्यामुळे लोकांना तिच्याकडे बोट दाखवण्याची संधी मिळेल.

हेही वाचा :  Malaika Arora : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या गाडीला अपघात, रुग्णालयात दाखल

आज मलायका आणि अरबाज एकमेकांपासून वेगळे झाले असले तरी आपापल्या आयुष्यात आनंदी आहेत. अरबाज इटालियन मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे. तर मलायका अभिनेता अर्जुन कपूरसोबतही नात्यात आहे.

महत्वाच्य बातम्या

 

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …