स्थानिक पातळीवर मोठा राजकीय भूकंप! अजित पवार गटात नाराज असलेले 137 जण शरद पवारांच्या भेटीला

Maharashtra Politics : अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी पक्षात उभी फुट पडली. निवडणुक आयोगाने  राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला दिले आहे. यामुळे शरद पवार गट नव्याने पक्ष उभारणी करत आहे. तर, अजित पवार गच पक्ष संघटना मजबुत करण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. मावळमध्ये अजित पवार गटात नाराज असलेले 137 जण शरद पवारांच्या भेटीला आले आहेत. 

शरद पवारांच्या मेळाव्यात तुतारी वाजवणार

मावळ मधील अजित पवार गटातील नाराज 137 जणांनी आपला राजीनामा काही दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्याकडे सोपवला होता. त्यानंतर मावळ मध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का बसला होता. मात्र, आता मावळ मधील अजित पवार गटातील नाराज 137 पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आज शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट घेतली. येत्या गुरुवारी शरद पवार हे मावळ तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा संवाद मेळावा घेणार आहेत. यावेळी मावळ तालुक्यातील अजित पवार गटातील नाराज 137 जण शरद पवार यांच्या उपस्थितीत शरद पवारांची राष्ट्रवादी यात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता गुरुवारी होणाऱ्या शरद पवारांच्या मेळाव्यात तुतारी वाजण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. गुरुवारी होणाऱ्या शरद पवारांच्या मेळाव्याकडे संपूर्ण मावळ तालुक्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :  Manoj Jarange Patil : झारीतले शुक्राचार्य कोण? मुख्यमंत्र्यांना कोण घालतंय खोडा? जरांगे पाटील स्पष्टच बोलले!

शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवार गटात प्रवेश करणार?

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरूरमध्ये एकाच वाहनातून प्रवास केला. उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्यात एक बैठकही झाली. आढळराव पाटलांनीच मंचरमध्ये अजित पवारांचं स्वागत केलं. अजित पवारांनी शिवाजी आढळरावांच्या शिक्षण संस्थेला भेटही दिली. आढळराव पाटील यांची शिरूर लोकसभेची उमेद्वारी जवळपास निश्चित मानली जातेय. आढळराव अजित पवार गटात प्रवेश करुन निवडणूक लढण्याची शक्यता आहे.
अजित पवार गटाची लोकसभा निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची उद्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची बैठक होणार आहे. मंगळवारी दुपारी अडीच बाजता मुंबईत महिला आर्थिक विकास महामंडळ हॉलमध्ये ही बैठक होतेय. दोन दिवस होणा-या बैठकीत मंत्री, आमदार, खासदार, जिल्हाध्यक्षांना बोलावण्यात आलंय. नाशिक, दिंडोरी, उत्तर पूर्व मुंबई, ईशान्य मुंबई, गोंदिया-भंडारा, हिंगोली, रायगड, धाराशिव या जागांचा आढावा घेतला जाणार आहे. तर, बुधवारी कोल्हापूर, बुलडाणा, माढा, सातारा, शिरूर, बारामती, परभणी, अहमदनगर, गडचिरोली मतदारसंघाचा आढावा घेतला जाईल. 

हेही वाचा :  जगप्रसिद्ध क्रिकेटर सराह टेलरने केली जोडीदार डायनाच्या प्रेग्नन्सीची घोषणा, प्रवास नव्हता सोपा कशी झाली प्रक्रिया



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …

देवीच्या जागरणात अघटित घडलं! काली मातेच्या भूमिकेतील मुलाकडून चुकून 11 वर्षांच्या मुलाची हत्या

Crime News Today: उत्तर प्रदेशच्या देवी जागरणचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात …