जगप्रसिद्ध क्रिकेटर सराह टेलरने केली जोडीदार डायनाच्या प्रेग्नन्सीची घोषणा, प्रवास नव्हता सोपा कशी झाली प्रक्रिया

आई होणं यापेक्षा मोठं काहीच असू शकत नाही असं बरेचदा म्हटलं जातं. महिला क्रिकेट संघात जगभरात प्रसिद्ध असणारी इंग्लंडची माजी विकेटकीपर आणि बॅट्समन सारा टेलरने आपली जोडीदार डायना गरोदर असल्याचे सोशल मीडियाद्वारे सांगितले. ‘आई होण्याचे कायम माझ्या जोडीदाराचे स्वप्न होतं, हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता, पण डायनाने कधीच हार मानली नाही. मला माहीत आहे की ती सर्वात चांगली आई होईल आणि मी याचा एक भाग असून खूप आनंदी आहे, मला तुझ्यावर अभिमान आहे’ असं म्हणत तिने आनंद व्यक्त केला. १९ आठवड्यानंतर डायना आई होणार असल्याचेही सांगितले आहे. पण नक्की लेस्बियन कपल्ससाठी हा प्रवास कसा असतो याबाबत घ्या अधिक जाणून. https://ccrmivf.com/ यांच्या संकेतस्थळावरून आम्ही ही माहिती प्राप्त केली आहे. (फोटो सौजन्य – @sjtaylor30 Instagram, iStock)

​लेस्बियन जोडप्यांसाठी प्रेग्नन्सी पर्याय​

​लेस्बियन जोडप्यांसाठी प्रेग्नन्सी पर्याय​

ज्या लेस्बियन जोडप्यांना मूल हवं आहे त्यांच्यासाठी काही प्राथमिक उपचारांचे पर्याय उपलब्ध असतात. एखाद्या अज्ञात वा ज्ञात अशा दात्याच्या शुक्राणूंचा अर्थात Sperms चा वापर करून इंट्रायुट्रीन इन्सेमिनेशन (IUI) हा पर्याय निवडण्यात येतो, ज्याला कृत्रिम गर्भाधान असंही म्हटलं जातं. तर इन विट्रो फर्टिलायझेशन अर्थात IVF हा पर्यायदेखील उपलब्ध असतो.

हेही वाचा :  Oil For Kidney : खराब झालेल्या दोन्ही किडन्या होतील मजबूत व स्वच्छ, रोज जेवणात फक्त इतके चमचे वापरा हा पदार्थ

​कशी आहे प्रक्रिया?​

​कशी आहे प्रक्रिया?​

Reciprocal IVF Treatment: गरोदर राहण्यासाठी लेस्बियन जोडपे एका जोडीदाराची अंडी वापरून गर्भधारणा करू शकतात. या परिस्थितीत एक जोडीदार हा ओव्हरीयन स्टिम्युलेशन आणि आयव्हीएफकरिता तिची अंडी शस्त्रक्रियेद्वारे प्राप्त करून दुसऱ्या जोडीदाराच्या मासिक पाळीच्या योग्य ओव्ह्युलेशननुसार युट्रसमध्ये ट्रान्सफर केली जातात.

(वाचा – गरोदरपणादरम्यान पोटावर येणारी काळी रेषा म्हणजे नेमके काय? जाणून घ्या Linea Nigra विषयी)

​कोण ठरवतं आई व्हायचं?​

​कोण ठरवतं आई व्हायचं?​

दोघांपैकी कोणत्या जोडीदाराला गर्भात मूल वाढवायचं आहे हे जोडपं ठरवतं आणि त्याप्रमाणे पुढील प्रक्रिया करण्यात येते. युट्रस आणि फॅलोपाईन्स ट्यूब्सचे आरोग्य कसे आहे हे निर्धारित करण्यासाठी हार्मोन्सच्या विविध तपासणी कराव्या लागतात. ज्या महिलेला आई व्हायचं आहे तिच्या मासिक पाळीच्या तिसऱ्या दिवशी रक्ताच्या तपासणीसह प्रजनन क्षमतेचीही तपासणी करण्यात येते.

(वाचा – नवजात बालकांमधील जन्मजात हृदयदोषांविषयी पालकांना कसे कळेल, तज्ज्ञांकडून माहिती)

​गुंतागुंत असल्यास​

​गुंतागुंत असल्यास​

आयव्हीएफ करण्याची गरज भासल्यास आणि अधिक गुंतागुंतीचे उपचार असल्यास, औषधोपचार करण्यात येतात. याशिवाय ज्या जोडीदाराची अंडी वापरण्यात येत असतील, मात्र गर्भधारणा होत नसेल त्यांनादेखील सर्जिकल एग रिट्रायव्हल प्रक्रियेद्वारे जावे लागते.

हेही वाचा :  गज कापून 4 कुख्यात कैदी जेल मधून पळाले; ड्युटीवर असलेल्या पोलिसांना कळालेच नाही

(वाचा – सोनम कपूरने दाखवली ६ महिन्याच्या वायुची पहिली झलक, नव्या आईने काय आहार सुरू करावा)

​एग डोनर असल्यास​

​एग डोनर असल्यास​

स्पर्मदाता असल्यास, त्याचे स्पर्म्स काढून बीजारोपण करण्यात येते आणि त्यानंतर परिपक्व झाल्यानंतर अंड्याचे बीजारोपण हे स्त्री च्या गर्भाशयात करण्यात येते. त्यानंतरच गर्भधारण होऊन बाळाला जन्म देता येऊ शकतो. काही वेळा लेस्बियन जोडप्यांना एग डोनर्सची गरज भासते, त्यासाठी कुटुंबातील व्यक्ती, बहिणी अथवा मित्रमैत्रिणींचा आधार घेता येतो.

​प्रश्नोत्तरे​

​प्रश्नोत्तरे​

१. बाळाला जन्म देताना काही कायदेशीर गुंतागुंत येऊ शकते का?

तुम्ही कोणत्या देशात राहाता आणि त्या देशाचे कायदे LGBTQ संदर्भात काय आहेत यानुसार बाळाला जन्म देताना कायदेशीर अडचणी येतील का ते ठरते.

२. गर्भधारणा झाल्यावर मेडिकल त्रास होतो का?

आई होणं हा एक अनुभव आहे आणि प्रत्येक आई होणाऱ्या स्त्री ला वेगवेगळे अनुभव येत असतात. लेस्बियन जोडप्यांमधील महिलेच्या बाबतीतही हेच घडते

३. यामध्ये काहीच अनैसर्गिक नाही ना?

दोन महिला वा दोन पुरूष एकत्र येणे यामध्ये काहीच अनैसर्गिक नाही. हे आता सिद्ध झाले आहे. बाळाला जन्म देणे हा सर्वस्वी प्रत्येकाचा स्वतःचा निर्णय आहे.

हेही वाचा :  Mumbai Crime : उल्हासनगर गोळीबार प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांना न्यायालयीन कोठडी; वकिलांनी केला खुलासा!

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

बारामतीमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट, मतदान सुरु असतानाच सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी

Loksabha 2024 Baramati : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडतंय. राज्यातील अकरा मतदारसंघात …

ईव्हीएमवर कमळ चिन्ह न दिसल्यामुळे पुणेकर आजोबांचा संताप; म्हणाले, मतदान करायचंय पण…

Lok Sabha Election 2024:  राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. बारामती मतदारसंघ गेल्या काही …