माझी कहाणी : कशी नशिबाने थट्टा मांडली, ज्या व्यक्तीचा मी प्रचंड तिरस्कार केला, त्याचाच सोबत लग्न माझं होणार आहे

ज्या व्यक्तीचा तुम्ही सर्वात जास्त तिरस्कार करता, ती व्यक्ती एक दिवस तुमच्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा भाग बनली तर ? अशा कथा तुम्ही अनेकदा वाचल्या आणि ऐकल्या असतील. माझ्यासोबतही असंच काहीसं घडलं. ज्याची मला कधीच अपेक्षा नव्हती. खरं तर ही गोष्ट माझ्या कॉलेजच्या दिवसांची आहे. मी माझ्या वर्गात टॉपर होते. माझ्या सोबतच एक मुलगा शिकत होता. तो देखील माझ्या बॅचचा टॉपर होता.तो प्रत्येक गोष्टीत अष्टपैलू होता. शैक्षणिक असो वा कोणताही खेळ, प्रत्येक विषयावर तो सर्वांच्या पुढे असायचा. कदाचित मला त्याचा हेवा वाटण्यामागेच हेच कारण असावे. तो मला अजिबात आवडायचा नाही. पण आमच्या वर्गातील काही लोकांनी असं वाटायचं की त्याला माझ्या बद्दल खूप काही वाटतं. लोक म्हणायचे की दोन प्रतिस्पर्धी एकमेकांना कसे आवडू शकतात. मात्र, मी या गोष्टींकडे कधीच लक्ष दिले नाही. याचे मुख्य कारण म्हणजे आमच्यात काहीच साम्य नव्हते. मला तो कधीच आवडला नाही. एका वर्गात असूनही आम्ही एकमेकांशी बोललो सुद्धा नाही. पण त्यापुढे असं काही झालं की माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. (सर्व फोटो सूचक आहेत, आम्ही वापरकर्त्यांनी शेअर केलेल्या कथांमध्ये त्यांची ओळख गुप्त ठेवतो)

हेही वाचा :  माझ्याइतकी वाईट पत्नी कोणीच नसेल.. मीच माझ्या नव-याला धोका द्यायाला पाडलं भाग.. कारण

​एकाच कंपनीत नोकरी मिळाली

पदवीपर्यंत माझे आयुष्य खूप चांगले होते, मला कधीही कोणत्याही प्रकारची समस्या आली नाही. पण कॉलेज संपल्यावर आम्ही दोघेही एकाच कंपनीत नोकरी लागल्याचे कळल्यावर मी जरा घाबरलेच. कारण मला माझ्या कामात कॉलेजची स्पर्धा अजिबात नको होती. पण मला नोकरीची संधी देखील गमावायची नव्हती, म्हणून मी त्याच्याशी मैत्री करण्याचा निर्णय घेतला. कदाचित तो एक चांगला निर्णय होता. कारण इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कॉलेजच्या सोबत्यासोबत ऑफिसमध्ये काम करणे सोपे झालं.

(वाचा :- 14 वर्षांनी शरद केळकरने मान्य केले बायकोच देते खर्चाला पैसे,लव्हस्टोरी वाचून तुम्ही ही म्हणाल जोडी नंबर 1)

​मी त्याच्या प्रेमात पडले

एकत्र काम करत असताना आम्ही काही वेळात चांगले मित्र झालो. मला माझे काम आवडू लागले होते. त्याच्या कामाच्या पद्धतीमुळे मीही खूप प्रभावित झाले होते. कारण तो मला प्रत्येक गोष्टीत मदत करायचा. मलाही त्याच्याबद्दल भावना निर्माण होऊ लागल्या. मला नेहमी वाटायचे माझं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्या व्यक्तीसोबत माझं लग्न व्हावं. पण तो पूर्णपणे वेगळा आहे. जसा वेळ गेला आम्ही दोघे एकमेकांच्या जवळ येत गेलो. तसंच आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो.

हेही वाचा :  Smartphone वापरताना निष्काळजीपणा केल्यास होऊ शकतो Blast, पाहा सुरक्षा टिप्स

(वाचा :- त्या रात्री रडून मला श्वास घेणं ही कठीण झालं होतं, दुसऱ्या मुलीसाठी त्याने मला सोडलं, जे झालं ते ऐकून हादरुन जाल)

​आम्ही लग्न करत आहोत

दोन वर्षे एकत्र राहिल्यानंतर आम्ही दोघांनी एकमेकांना प्रपोज केले. आज तो माझा सोलमेट बनला आहे.जेव्हापासून आम्ही एकत्र आहोत आमच्या आयुष्यात खूप आनंद आहोत. यात सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आम्ही पुढच्या वर्षी लग्न करणार आहोत. मी आता खूपच आनंदी आहे.

(वाचा :- कोण होती Sanjay Duttची पहिली पत्नी Richa Sharma? कसा झाला या प्रेम कथेचा अंत)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …

बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का पुसण्यासाठी अजितदादांचा मास्टर प्लान

NCP Ajit Pawar On Baramati: बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का कायमस्वरूपी पुसण्यासाठी अजितदादांचा ॲक्शन प्लॅन तयार …