खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या पोरांची कमाल!पुरुष खो-खो संघ सलग पाचव्यांदा चॅम्पियन

Khelo India Youth Games  : युवा कर्णधार नरेंद्र कातकडे, आदित्य कुडाळे आणि निखिल यांनी सर्वोत्तम अष्टपैलू कामगिरी करत सोनेरी यशाची घोडदौड कायम ठेवली. नरेंद्रच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा खो-खो संघ पाचव्या सत्रातील खेलो इंडिया मध्ये सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. यासह महाराष्ट्र संघाने आपले निर्विवाद वर्चस्व राखत सलग पाचव्यांदा चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला आहे. महाराष्ट्र संघाने फायनल मध्ये शुक्रवारी दिल्ली संघाला धूळ चारली. महाराष्ट्र संघाने 38-28 असा दहा गुणांच्या आघाडीने अंतिम सामना जिंकला. यासह महाराष्ट्राचा पुरुष खोखो संघ सलग पाचव्यांदा सुवर्णपदक विजेता ठरला. यादरम्यान महाराष्ट्र महिला खो-खो संघ रौप्य पदकाचा मानकरी ठरला. महाराष्ट्र संघाला अंतिम फेरीत ओडीसा विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.ओडिसा संघाने शुक्रवारी महाराष्ट्र महिला खो-खो संघाची खेलो इंडिया युथ गेम्स मधील सुवर्ण यशाची मोहीम रोखली. ओडिसा संघाने अवघ्या तीन गुणांच्या आघाडीने फायनल मध्ये चार वेळच्या सुवर्णपदक विजेत्या महाराष्ट्र संघाचा १६-१३ ने पराभव केला. त्यामुळे जानवी पेठेच्या नेतृत्वात महाराष्ट्र संघ रौप्य पदकाचा मानकरी ठरला. ओडिसा संघाने पहिल्यांदा खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला आहे.

हेही वाचा :  'खराब फॉर्मचा अनुष्का आणि कुटुंबियांवरही वाईट परिणाम', Virat Kohli ने व्यक्त केल्या भावना

सलग पाचव्यांदा चॅम्पियन होण्याच्या इराद्याने मैदानावर उतरलेल्या महाराष्ट्र संघाने दमदार सुरुवात केली. त्यामुळे संघाला पहिल्या डावामध्ये आघाडी घेता आली. नरेंद्र याच्या नेतृत्वात खेळाडूंनी स्वरूप कामगिरी करत पहिल्या डावात १८-१७ अशी आघाडी मिळवली होती. आपले वर्चस्व राखून ठेवत महाराष्ट्राने दुसऱ्या डावातही दिल्ली संघाचा विजयाचा प्रयत्न हाणून पाडला. यादरम्यान महाराष्ट्र संघाने २०-१८ असा स्कोर करत अंतिम सामना आपल्या नावे केला. यादरम्यान करणार नरेंद्र ने चार गडी बात करत १:३० मिनिटे पळतीचा खेळ केला. तसेच निखिलने संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्याने चार गडी बाद केले.

कुटील डावपेच दिल्लीच्या अंगलट; कलेक्टर आयुक्तांच्या उपस्थितीत रंगला सामना

किताब जिंकण्याच्या इराद्याने दिल्ली संघाने कुटील डावपेच करत उपांत्य सामना जिंकला. यादरम्यान पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा मोठा फटका पश्चिम बंगाल संघाला बसला मात्र याच कुटील डावपेचातून दिल्ली संघाने उपांत्य सामना जिंकत फायनल मध्ये धडक मारली होती. दिल्ली संघाचे हे कुटील राजकारण हाणून पाडण्यासाठी अंतिम सामन्या दरम्यान महाराष्ट्र संघाने स्थानिक कलेक्टर आणि आयुक्तांना खास निमंत्रित केले होते. त्यांच्या उपस्थितीत हा अंतिम सामना रंगला. यादरम्यान महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खो-खोच्या खेळातील आपले वर्चस्व सिद्ध करत सामन्यात दणदणीत विजय संपादन केला.

हेही वाचा :  '...तर Burnol लाव', वसीम जाफरच्या रिप्लायनं मायकल वॉनची बोलतीच बंद

महाराष्ट्र खो-खो  संघाची गौरवशाली कामगिरी: दिवसे

मध्यप्रदेश येथील खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये महाराष्ट्राच्या महिला व पुरुष खो खो संघांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. महाराष्ट्राच्या पुरुष खो-खो संघाने मिळवलेले सोनेरी यश गौरवशाली आहे. महिला संघाने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे खूप खूप या खेळ प्रकारात महाराष्ट्राला आपले वर्चस्व गाजवतात, अशा शब्दात क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांनी महाराष्ट्राच्या संघावर कौतुकाचा वर्षाव केला.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …