Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात मुंबईसह ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा; काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने थोडीशी उसंत घेतलेली दिसत आहे. मुंबईतही तुफान हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केल्यानंतर आता मात्र पाऊस गायबच झाला आहे. मुंबईसह अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. दरम्यान हवामान विभागाने पुढील 5 दिवसात मुंबईसह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच संपूर्ण विदर्भासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. 

मुंबईत गेल्या आठवड्यात जोरदार पाऊस पडला होता. यामुळे सखल भागात पाणी साचल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतूक मंदावली होती. यासह पावसामुळे आजारांमध्येही वाढ झाल्याने मुंबईकर पावसाने थोडीशी उसंत घेण्याची वाट पाहत होते. दरम्यान गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पाऊस गायबच झाला आहे. दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये मंगळवारपर्यंत हलक्या ते मध्यम सरी पडू शकतील. तसंच बुधवारी, गुरुवारी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. 

हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील वातावरण कसं असेल यासंबंधी अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात गुरुवारपर्यंत तुरळक पाऊस पडेल. तसंच मुंबईत मंगळवारपर्यंत हलक्या ते मध्यम सरी कोसळतील. बुधवार, गुरुवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यातही मंगळवारपर्यंत मध्यम सरींची शक्यता आहे. बुधवार आणि गुरुवारी येथेही मुसळधार पाऊस हजेरी लावू शकतो. ठाणे जिल्ह्यात मंगळवार ते गुरुवार मुसळधार पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा :  रेड अलर्ट! थर्टी फर्स्टसाठी बाहेर पडताय खरं, आधी पाहून घ्या हवामानाचा अंदाज

काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, दुसरीकडे संपूर्ण विदर्भालाच यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांतील नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणांत 74 टक्के पाणीसाठा

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा वाढला आहे. रविवारी या धरणांमध्ये एकूण 74 टक्के पाणीसाठा जमा झाला. दरम्यान पाणीसाठा वाढलेला असला तरी मुंबईकरांना पाणीकपात रद्द होण्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. सध्या मुंबईकरांना 10 टक्के पाणी कपात सहन करावी लागत आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात आढावा घेऊन पाणी कपातीबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही धरणात मिळून 10 हजार 70 हजार दशलक्ष लीटर पाणी साठा जमा झाला आहे. 

धरणात किती पाणीसाठा? 

उर्ध्व वैतरणा  – 49.79 टक्के

मोडक सागर – 100 टक्के

हेही वाचा :  Weather Update Today: उकाड्यापासून दिलासा! गारठा वाढला, पाहा किती आहे तुमच्या शहराचं तापमान?

तानसा – 100 टक्के

मध्य वैतरणा – 89.51 टक्के

भातसा – 66.38 टक्के

विहार – 100 टक्के

तुलसी – 100 टक्क



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …