Weather Update Today: उकाड्यापासून दिलासा! गारठा वाढला, पाहा किती आहे तुमच्या शहराचं तापमान?

Weather Forecast : राज्यात सध्या निरभ्र आकाश असल्याने उन्हाचे चटके बसत होते, तर बुधवारी (21 डिसेंबर) किमान तापमानात मोठी घट झाल्याने गारठा वाढला आहे. तसेच हवामान खात्याने यापूर्वी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पुणे आणि इतर राज्यात गारवा वाढला आहे. पुण्याप्रमाणेच उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातही तापमानात घट झाली आहे. राजधानी मुंबई शहराच्या (mumbai weather update) तापमानातही काल (20 डिसेंबर) घट झाली असून आजपासून (21 डिसेंबर) संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) पहाटेच्या किमान तापमानात घट होवून ते 10 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात पुन्हा गारठा वाढणार 

हवामान विभागाच्या (Department of Meteorology) अंदाजानुसार, आजपासून राज्यात पुन्हा गारठा वाढला आहे. परिणामी डिसेंबर महिन्यातील उर्वरित 10 दिवसात थंडीत चांगलीच वाढ होणार आहे. ही थंडी कदाचित शनिवार (31 डिसेंबर) पर्यंतही टिकून राहण्याची हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला तामिळनाडूच्या किनारपट्टीवर आलेल्या मंदोस चक्रीवादळाचा परिणाम वातावरणावर झाला होता. आता मात्र, मंदोस चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळं पुन्हा राज्यात थंडी जाणवू शकते. 

हेही वाचा :  देशातील पहिल्या 'अंडरवॉटर मेट्रो' मार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, तिकीटाचे दर काय?

वाचा : समृद्धी महामार्गावर आता गाडी चालवण्यासाठी स्पीड लिमिट निश्चित, अन्यथा कारवाई 

महाराष्ट्रासारखीच थंडीचा परिणाम दक्षिण गुजरातमधील (द्वारका ते बडोदा तसेच राजकोट ते सोमनाथ व बडोदा ते बलसाडपर्यंतच्या) 20 जिल्ह्यात तसेच  दक्षिण मध्य प्रदेशातीलही (झाबुआ ते दिंडोरी व सेहोर ते बेतुल पर्यंतच्या) 20 जिल्ह्यात जाणवू शकतो, असा अंदाजही खुळे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या बदलत्या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम (Impact on health) होताना दिसत आहे. नागरिकांना सर्दी, ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवत आहे.

कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम नाही

तापमानात आणखी घसरण होऊन थंडी पुन्हा जाणवण्याची शक्यता आहे. केवळ किमानच नाही, तर कोकण विभाग वगळता उर्वरित राज्यात कमाल तापमानातही घट होऊ शकते. बंगालच्या उपसागरातील तमिळनाडूच्या दिशेने प्रवास करणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राचा राज्यातील थंडीवर विशेष परिणाम जाणवणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

हेही वाचा :  युक्रेन बॅकफूटवर; नाटोच्या सदस्यत्वाचा आग्रह सोडणार, रशियाची मागणी झेलेन्स्कींना मान्य

देशभरात असेच हवामान राहील

पूर्व-मध्य अरबी समुद्रातील कमी दाब प्रणाली निवळून गेली आहे. तर दक्षिण-मध्य बंगालच्या उपसागरात विषूववृत्ताजवळ असलेले कमी दाब क्षेत्र हळूहळू वायव्येकडे सरकत आहे. उद्यापर्यंत ही प्रणाली श्रीलंकेच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मराठी माणूस यांची चड्डीपण..’, ‘बिनशर्ट’वरुन मनसेचा ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, ‘हिरव्या..’

Uddhav Thackeray Vs Raj Thackeray: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त दिलेल्या …

Video : ‘श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी…’ सी सेक्शन डिलीव्हरीदरम्यान महिलेनं गायलं डोळ्यात अश्रू आणणारं भजन

C section delivery Viral Video : आई… या शब्दाची फोड करताना आ म्हणजे आत्मा आणि …