Maharashtra Politics : फडतूस बोलण्यामागचा माझा उद्देश काय होता? भर सभेत उद्धव ठाकरे यांचा जाहीर खुलासा

Uddhav Thackeray At Mhavikas Aghadi Sabha : फडणवीस हे फडतूस गृहमंत्री, तर मुख्यमंत्री नव्हे गुंडमंत्री अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. यावरुन चांगलाच वाद पेटला होता. भाजप नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांच्यावर तुटून पडले होते. फडतूस नही काडतूस हूँ मैं, झुकेंगा नही घुसेगा…उद्धव ठाकरेंच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर दिले होते. मात्र, फडतूस बोलण्यामागचा उद्देश काय होता? हे उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या वरज्रमुठ (Mhavikas Aghadi Sabha) सभेत याबाबत जाहीर खुलासा केला आहे. 

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

फडतूस गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, फडणवीसांना झेपत नसेल तर राजीनामा द्यावा अशी  टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. तर, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री की गुंडमंत्री? असा जोरदार घणाघातही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर केला. यानंतर भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे च्यांच्यावर जोरदार टीका केली होती. 

…म्हणून मी फडतूस म्हणालो

अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात आहे. अद्याप शेतकऱ्यांना मदत जाहीर झालेली नाही. हे सरकार फक्त सत्तेसाठी सत्तेत आले आहे. अशा सरकारला फडतूस नाही तर काय म्हणणार?  सत्तेची नशा व्यसनासारखी असते;  अनेकांना दारुचे व्यसन असते. दारुचे व्यन घरं उद्धवस्त करतं.   त्याचप्रमाणे सत्तेची नशा देश उद्धवस्त करते. ज्या बाबासाहेबांनी देशाला घटना दिली संविधान दिले. संविधानाचे रक्षण केले पाहिजे. 

हेही वाचा :  Maharashtra Politics: संजय राऊत नागपूरात राजकीय बॉम्ब फोडणार, ट्विट केलेला फोटो चर्चेत

बाबरी पाडायला तुमचे काका गेले होते का. अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी नागपुरच्या वज्रमूठ सभेतून घणाघात केला. तुम्ही बाळासाहेबांचं योगदान नाकारता, शिवसेनाप्रमुखांचा अपमान करता का असा सवालही ठाकरेंनी विचारला.

शिंदे सरकार निवडणूक घ्यायला घाबरतं असा घणाघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी नागपुरच्या वज्रमूठ सभेतून केला जे आमदार ठाकरेंना सोडून गेले त्यांची नस दाबली असावी असं विधानही जयंत पाटलांनी केले.

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपुर मध्ये महाविकास आघडीची वज्रमूठ सभा पार पडली. या सभेसाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, अनिल देशमुख, काँग्रेस नेते नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी नेते उपस्थित होते. 

वज्रमुठ सभेपूर्वी नागपुरात उद्धव ठाकरेंच्या विरोधात भाजप युवा मोर्चानं निदर्शनं केली. वज्रमुठ सभेत उद्धव ठाकरे सावरकरांचा अवमान करणा-यांच्या मांडीला मांडी लावून बसणार असल्यानं, नागपूरच्या हेडगेवार चौकात हे आंदोलन करण्यात आले होते. 

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …