Legislative on Sanjay Raut: संजय राऊतांना शिक्षा होणार? विधिमंडळाचा मोठा निर्णय

Legislative on Sanjay Raut: हक्कभंग नोटीसप्रकरणी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र विधिमंडळाने (Maharashtra Legislature)  हक्कभंगाच्या नोटीसला उत्तर देण्यासाठी संजय राऊत यांना मुदतवाढ दिली आहे. संजय राऊत यांनी पत्र लिहून आपल्याला मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली होती. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी संजय राऊत यांना मुदतवाढ देत असल्याचं जाहीर केलं आहे. 

संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचं विधिमंडळ हे ‘चोर’मंडळ आहे असं विधान केलं होतं. यानंतर भाजपा नेत्यांनी सभागृहांमध्ये गदारोळ घालत कारवाईची मागणी केली होती. संजय राऊतांविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला होता. यानंतर संजय राऊत यांना उत्तर देण्यासाठी 3 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. नंतर ही मुदत वाढवून देण्यात आली होती. दरम्यान, संजय राऊतांनी आज पुन्हा पत्र लिहून मुदतवाढ वाढवून द्या अशी मागणी केली होती. 

Sanjay Raut on Legislature Notice: विधिमंडळाच्या हक्कभंग नोटीसला संजय राऊतांचं उत्तर, आता मुदतवाढ मिळणार की थेट शिक्षा…

 

संजय राऊतांनी पत्रात माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असल्याचा दावा केला होता. विधिमंडळाला चोर म्हटलं नाही, एका विशिष्ट गटाला चोर म्हटलं असाही दावा त्यांनी पत्रात केला होता. तसंच विधिमंडळाच्या भावना दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता आणि नसणार असंही ते म्हणाले आहेत. 

हेही वाचा :  Sanjay Raut : 'त्यांच्या'वर गद्दारीचा शिक्का बसलाय; कोणताही आमदार, खासदार निवडून येणार नाही - राऊत

संजय राऊतांनी पत्रात काय म्हटलं होतं?

मा. प्रधान सचिव
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय
जय महाराष्ट्र! 

कोल्हापुरातील एका कार्यक्रमात विधान मंडळाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत काही सदस्यांनी आक्षेप घेतला व विशेषाधिकार भंग व अवमानाची सूचना मांडली. याबाबत खुलासा करण्यासाठी आपण मला 3 मार्च 2023 पर्यंत सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत मुदत दिली. 

1) मी आपणास नम्रपणे नमूद करु इच्छितो की, मी 4 मार्चपर्यंत पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होतो व कर्नाटकच्या सीमेवरील भागात असल्याने मुंबईशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे दिलेल्या मुदतीत खुलासा करणं शक्य झालं नाही. तरी कृपया सविस्तर खुलासा  करण्यासाठी आणखी मुदतवाढ मिळावी. 

2) महाराष्ट्र विधान मंडळाचा व सदस्यांचा मी नेहमीच आदर करतो. प्रत्येक नागरिकाचे ते कर्तव्य आहे. मी स्वत: अनेक वर्ष राज्यसभेचा सदस्य असल्याने मला अशा संसदीय मंडळांचे महत्त्व माहित आहे. मी संपूर्ण विधान मंडळाबाबत कोणतंही आक्षेपार्ह वक्तव्य केलं नसून माझे वक्तव्य एका विशिष्ट गटापुरतेच मर्यादित आहे, हे लक्षात घ्यावे. 

तरीही या प्रकरणाबाबत सविस्तर खुलासा करण्यासाठी मुदतवाढ द्यावी. 

दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावेळी संजय राऊतांना मुदतवाढ देताना तारीख सांगितलेली नाही. मात्र संजय राऊतांना दिलासा मिळणार की कारवाई होणार हे आता पाहावं लागणार आहे. 

हेही वाचा :  'अयोध्येतील कार्यक्रम भाजपाचा, श्रीरामांना एकाप्रकारे किडनॅप...'; राऊतांची कठोर शब्दांत टीका

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharashtra Weather: राज्यातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा; पाहा मुंबईत कसं असेल हवामान?

Maharashtra Weather : सध्या देशभरात नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागतोय. याशिवाय राज्यात उन्हाचा चटका …

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …