लढेंगे-जितेंगे!! सुप्रिया सुळेंची बाबा शरद पवार यांच्या वाढदिवसासाठी खास पोस्ट, बाप-लेकीचं हळुवार फुलणारं नातं

Sharad Pawar And Supriya Sule Relationship : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचा आज 83 वा वाढदिवस. या वयातही तरुणाला लाजवेल असा शरद पवार यांचा उत्साह आहे. शरद पावर या वयातही नाशिकमध्ये कांदा प्रश्नावर रस्त्त्यावर उतरले. आजही शरद पवार यांचा उत्साह आणि समाजसेवेचे व्रत वाखाण्याजोगे आहे. शरद पवार यांच्यासाठी लेक आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी खास पोस्ट लिहिली आहे. अतिशय भावूक आणि बाप-लेकीचं नातं उलघडणारी ही पोस्ट आहे. लेकीचा कायमच बाबांना खंबीर आधार असतो. 

सुप्रिया सुळे यांची खास पोस्ट 

सुप्रिया सुळे यांनी वडिलांची खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ‘लोक तुमचे सांगाती आणि तुम्ही लोकांचे सांगाती’… या आशयाची ही पोस्ट अतिशय लक्षवेधी आहे. मुलगी आणि वडील यांच कायमच खास नातं असतं. हे नातं सुप्रिया सुळे अनेकदा जपताना दिसतात. या पोस्टमधूनही ते अधोरेखित होत आहे. 

(हे पण वाचा – राजकारणातील प्रभावी व्यक्तिमत्त्व शरद पवार यांचे विचार )

हेही वाचा :  शरद पवारांच्या संमतीनेच पहाटेचा शपथविधी? फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर BJP प्रदेशाध्यक्षांचं मोठं विधान, म्हणाले "ते खोटं..."

सुप्रिया सुळेंची पोस्ट 

बाप-लेकीचा जिव्हाळा 

शदर पवार लातूर दौऱ्यावर होते. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचा जिव्हाळा पाहायला मिळाला. सुप्रिया सुळे यांनी स्वत:च्या हाताने शरद पवार यांच्या पायात चप्पल घातली. यापूर्वी लता मंगेशकर यांच्या अंत्ययात्रेवेळीही हेच चित्र पाहायला मिळालं होतं. बाप-लेकीचं नातं असंच खास असतं. कारण बापाला काय हवं, नको ते किंवा त्याच्या मनात कोणता विचार येतो हे लेकीला सर्वात अगोदर कळतं. 

एकच मुलगी का? 

शरद पवारांना अनेकांना वारसदार म्हणून मुलगा नाही, असा प्रश्न विचारला. यावेळी त्यांनी दिलेलं उत्तर डोळ्यात अंजन घालणार आहे. मला असं वाटतं अग्नी देण्यासाठी कोण असणार याची चिंता करायची की जिवंत असताना नीट नेटकं वागणाऱ्याची चिंता करायची,”‘मुलगा की मुलगी याकडे पाहण्याचा समाजाचा जो दृष्टीकोन आहे तो बदलण्याची गरज आहे. मुलीला सुद्धा मुलासारखं वाढवून, समान वागणूक देऊन, आत्मविश्वास वाढवून तिच्याकडून उत्तम प्रकारचं काम करुन घेऊ शकतो. व्यक्तिमत्व फुलवू शकतो याची मला खात्री आहे’
शरद पवारांचं हे उत्तर प्रत्येक लेकीच्या बापाला पटणार आहे. कारण कायमच लेक आणि बापाचं नातं खास असतं. 

हेही वाचा :  Udayanraje Bhosale: "राजकारणी मुग गिळून गप्प बसतात, विचारांचा कडेलोट...", उदयनराजेंचं शिवरायांना भावनिक पत्र!

बाप-लेकीचं नातं 

बाप-लेकीचं नातं कायमच खास असतं. अनेकदा सुप्रिया सुळे यांच्या कृतीवरुन ते अधोरेखित झाली आहे. मुलीसाठी कायमच तिचा बाबा हा सुपरहिरो असतो. सुप्रिया सुळे यांनी अनेकदा हे सांगितलं आहे. शरद पवार यांच आतापर्यंतचा खडतर प्रवास हा सुप्रिया सुळे यांना देखील प्रेरणादायी आहे. त्यामुळे आज शरद पवार यांचा वाढदिवस असतानाही सुप्रिया सुळे समाजसेवेचे कार्य करत आहे. वडिलांनी मुलींना दिलेली प्रत्येक शिकवण ही खास असते. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रीयन नवरा आणि गुजराती नवरी, डेस्टिनेशन वेडींगमध्ये ‘असं’ काही झालं की वऱ्हाडाचा उडाला गोंधळ

Destination Wedding: महाराष्ट्रीयन नवरा आणि गुजराती नवरी…यांच्या लग्नात उडाला गोंधळ…असंकाही तरी हेडींग वाचून तुम्ही याचा …

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …