कोरियन मुलींसारखी ग्लॉसी स्किन व त्यावर चमचमतं ब्लश, नोरा फतेहीचा हा चार्मिंग लुक बघून म्हणाल, ‘जपानी गुडियॉं’

बॉलीवूडची डान्सिंग क्वीन नोरा फतेहीने तिच्या डान्सने संपूर्ण जगभर आपली ओळख निर्माण केली आहे. तिला बॉलीवूडमध्ये एंट्री मिळवून देण्यात विशेषत: जरी तिच्या डान्स स्किल्सचा मोठा हातभार असला तरी तिला तिच्या फॅशन सेन्सने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यास मदत केली हे सुद्धा खरे आहे. तिचा प्रत्येक लुक हा पहिल्यापासूनच ग्लॅमरने परिपूर्ण असतो. तिचा हा फॅशन सेन्स तरुणाईला भुरळ घालणारा ठरला आणि आज या मॉडेल डान्सरचे एखाद्या बॉलीवूड अभिनेत्रीपेक्षाही जास्त चाहते आहेत.

पण जर तुम्हाला वाटत असेल की नोरा केवळ फॅन्सी व मॉर्डन कपड्यांमध्येच सुंदर दिसते वा तेच कपडे तिला सूट होतात तर थांबा, तिचे हे लेटेस्ट फोटोशूट तुमचा हा समज सहज दूर करेल. नोराचा हा समोर आलेला एथिनीक लुक तुम्हाला सुद्धा नव्याने तिच्या प्रेमात पाडेल. (फोटो सौजन्य – इंस्टाग्राम @ritikamirchandani)

या डिजाईनचे आउटफिट केले होते परिधान

या डिजाईनचे आउटफिट केले होते परिधान

नोरा फतेहीचे काही लेटेस्ट आणि खास फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये तिने पांढर्या शॉर्ट कुर्त्यासोबत सुंदर लाँग स्कर्ट परिधान केलेला दिसत आहे. फॅशन डिझायनर रितिका मीरचंदानी यांच्या कलेक्शनमधून नोराने हे अत्यंत मोहक असे आउटफिट निवडले होते. नोराला स्वत:ला फॅशन आणि स्टाईलचा सेन्स असल्याने आपल्यावर काय सूट होईल याची तिला योग्य जाणीव आहे आणि हिक गोष्ट पुन्हा एकदा दिसून आली.

हेही वाचा :  Covid 19 : कोरोनाचे पुन्हा थैमान! अंत्यसंस्कारासाठी लांबच लांब रांगा

(वाचा :- KL Rahul Athiya Shetty: अखेर सुनिल शेट्टीची लेक बनली नवरीबाई, लग्नाआधीच लाल भरजरी लेहंगा घालून केलं मंत्रमुग्ध)

इंटीक्रेट एम्ब्रॉयडरीने सजलेला कुर्ता

इंटीक्रेट एम्ब्रॉयडरीने सजलेला कुर्ता

नोरा फतेहीने पांढऱ्या रंगाचा स्लीव्हलेस शॉर्ट कुर्ता घातला होता, ज्यावर सिल्व्हर कलरची इंटीक्रेट एम्ब्रॉयडरी दिसत होती. या कुर्त्यासोबत तिने ए-लाइन मॅचिंग स्कर्ट सुद्धा परिधान केला होता.
(वाचा :- साऊथच्या ‘या’ अभिनेत्रीने लग्नातही जपली संस्कृती व परंपरा, 150 वर्ष जुन्या हवेलीमध्ये रचला राजेशाही विवाहसोहळा)

असा केला लुक कम्प्लीट

असा केला लुक कम्प्लीट

नोराच्या स्कर्टवरही कुर्त्यासारखीच एम्ब्रॉयडरी दिसत होती. तिने आपला लुक कम्प्लीट करण्यासाठी, नोराने हलका दुपट्टा कॅरी केला होता, ज्याच्या काठावर जरी वर्कने सजलेली एक पट्टी जोडली होती.

(वाचा :- नीता अंबानींपेक्षाही सुंदर आहे त्यांची विहीणबाई, राधिकाच्या मेहंदीत रॉयल अंदाज दाखवत केली थेट अंबानींशी बरोबरी)

मेकअप होता लाईट

मेकअप होता लाईट

डायमंड इअररिंग्स आणि फिगर रिंग्ससह नोराचा लूक अगदी परफेक्ट दिसत होता. न्यूड आयशॅडो, आयलायनर, मस्करा, कॉन्टोर चीक्स आणि न्यूड लिप शेड शेडसह केस मोकळे सोडले होते. एकंदर नोराचा हा लुक खूप जास्त परफेक्ट झाला होता आणि पाहणाऱ्या प्रत्येकाची नजर केवळ तिच्यावरच खिळली होती.

हेही वाचा :  नोरा फतेहीच्या सिझलिंग गाऊन लुक्सने वाढवले इंटरनेटचे तापमान, 'हाय गर्मी' अशी चाहत्यांची अवस्था

(वाचा :- अनंत अंबानी व राधिकाच्या साखरपुड्यात अवतरल्या दोन प-या, झगमगत्या लेहंग्यातील अनन्या-जान्हवीला बघून हरपेल शुद्ध)

फ्लॉंट केला सडपातळ बांधा

फ्लॉंट केला सडपातळ बांधा

नोरा अशीही एखाद्या डॉलसारखीच गोड आहे पण या टाइट फिटिंग स्कर्टमध्ये तिने सडपातळ बांधा अगदी मनसोक्त फ्लॉंट करत नवनवीन पोझेस दिल्या. कोरियन मुलींसारखी काचेसारखी निचळ त्वचा अन् गोरी गोरी काया, त्यावर पिंक पिंक मेकअप, चमचमता ब्लश लावलेल्या नोराला पाहून तुम्हीही नक्कीच म्हणाल की, “जापानी गुडियॉंच”

(वाचा :- पिंक ड्रेसमधील ईशा अंबानी ठरली नवरीबाई राधिकावर भारी, अंबानींच्या लेकीपुढे बॉलीवूडच्या अप्सराही पडल्या फिक्या)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …