Covid 19 : कोरोनाचे पुन्हा थैमान! अंत्यसंस्कारासाठी लांबच लांब रांगा

COVID outbreak in Beijing : जगभरात कोरोनाचा (coronavirus) हाहाकार पाहायला मिळाला आहे. वाढत्या रुग्णसंख्येने अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र अजूनही अशी परिस्थिती पुन्हा चीनमध्ये दिसून आली आहे. चीनमध्ये कोरोनाने (corona news marathi) पुन्हा थैमान घातले असून चीनमधील निर्बंध हटवल्यानं अनेक ठिकाणी मोठी गर्दी झाली. त्याचाच फटका चीनला बसलाय आहे. परिणामी मृतांचा आकडा हा धडकी भरवणारा आहे. धक्कादाय बाब म्हणजे अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत लांबच्या लांब रांगा लागत आहे. या ठिकाणी मृतदेहांचा खच पडलेला पाहायला मिळत आहे.

गेल्या दोन वर्षांपासून चीनमध्ये कोरोनाचं थैमान सुरुच आहे. चीनमधल्या सरकारनं निर्बंध जैसे ठेवल्यानं तिथल्या जनतेनं मोठं आंदोलन केलं.. जनतेच्या विरोधा पुढे सरकार झुकलं आणि सरकारनं निर्बंध हटवलं. निर्बंध हटवल्यानं चीनमध्ये अनेक ठिकाणी मोठी गर्दी झाली.. आणि आता त्याचाच परिणाम म्हणून चीनच्या बिजिंगमध्ये कोरोनाच्या (Corona in Beijing, China) समूह संसर्गाला सुरुवात झाली.  बीजिंगमध्ये कोविडच्या रुग्णांत झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी बीजिंगच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी रांगा लागल्यात. इतकेच नाही तर मंगळवारपासून चीन सरकारने कोरोना प्रकरणांची घोषणा करणेही बंद केले आहे.  मृतांच्या आकड्यात मोठी वाढ झाल असून वेगाने कोरोनाचा प्रसार होत आहे. बीजिंगमध्ये कोरनाचे थैमान पाहायला मिळत असून अत्यंत भीषण परिस्थिती आहे. 

हेही वाचा :  MRVC Job: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये भरती, पदवीधरांनी 'येथे' पाठवा अर्ज

वाचा: पेट्रोल-डिझेल दराबाबत मोठी अपडेट, ‘या’ जिल्ह्यात ग्राहकांना झटका? 

चीनमध्ये आठवड्यापूर्वी झिरो कोविड पॉलिसी (Zero Covid Policy) शिथिल करण्यात आली होती, त्यानंतर आता प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे, चीनची आरोग्य यंत्रणा रुळावरून घसरत आहे, ज्यामुळे 10 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो असे तज्ञांचे मत आहे. कोरोनाबाबत एक संशोधन समोर आलं आहे. रिसर्चचे सह-लेखक आणि हाँगकाँग विद्यापीठातील मेडिसिन विभागाचे माजी डीन ग्रेब्रियल लेउंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, “चीन सरकारने कोणत्याही बूस्टर लसीशिवाय कोरोनाचे नियम शिथिल केले आहेत. यामुळे सुमारे 10 लाख लोकांपैकी 684 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होणार आहे.” असल्याचे त्यांनी सांगितले.

 एका अहवालानुसार असा अंदाज आहे की चीनमध्ये 964,400 लोकांचा व्हायरसमुळे मृत्यू होऊ शकतो. रिपोर्टनुसार, संशोधकांनी लिहिले की, “आमचे निकाल असे सूचित करतात की डिसेंबर 2022-जानेवारी 2023 पर्यंत कोरोना नियम शिथिल केल्याने प्रकरणांमध्ये वाढ होईल. कोरोना रुग्णांच्या संख्येत इतकी मोठी वाढ होईल की सर्व प्रांतातील रुग्णालयांना प्रकरणे हाताळणे कठीण होईल.” असंही म्हटलं आहे. दरम्यान, चीनमध्ये कोरोना प्रकरणांमध्ये घट होत आहे, याचे कारण चीनने अनिवार्य पीसीआर चाचणी रद्द केली आहे.

हेही वाचा :  Optical Illusion: 'या' फोटोत लपलेला चोर शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

MAHARERA: बिल्डिंगमध्ये अपुऱ्या जागेच्या अभावी पार्किंग करण्यास अडचणी येतात. हल्ली काही बिल्डर घर खरेदी केल्यानंतरच …

Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोप

Pune Job News : सरकारी नोकरीवर (Government Jobs) असणाऱ्या अनेकांचाच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना हेवा …