भारताची स्टार धावपटू दुती चंद डोपिंगच्या जाळ्यात, थेट निलंबनाची कारवाई

Dutee Chand Provisionally suspended : भारताची स्टार महिला धावपटू दुती चंद (Dutee Chand) हिला एक मोठा धक्का बसला आहे. दुती चंदला प्रतिबंधित पदार्थांचे सेवन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. त्यानंतर तिच्यावर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दुतीच्या (Dutee Chand )डोपिंग चाचणीच्या (Doping Test) रिपोर्टमध्ये अनेक प्रतिबंधित पदार्थ आढळून आल्यानंतर तिच्यावर ही कारवाई झाली आहे.

दरम्यान या निलंबनानंतर दुतीने दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले की, ‘मला अद्याप याबद्दल कोणतीही माहिती नाही. मला कोणाकडूनही माझी डोपिंग चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळालेली नाही. हे जाणून घेतल्याशिवाय मी या संदर्भात कोणतंही पाऊल उचलू शकत नाही. याबद्दल नेमकी माहिती घेऊन त्यानुसार मला पुढील पाऊल उचलावे लागेल. धनलक्ष्मी आणि इतर अनेकांसोबत घडल्याप्रमाणे, त्यांना एक पत्र पाठवून त्यांच्या चुकीबाबत नेमकं कळवलं. मला अद्याप कोणतीही अधिकृत सूचना प्राप्त झालेली नाही. मी निलंबनाविरोधात अपील करणार आहे. दुती चंदचा नमुना ए चाचणीत पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर तिने अपील केल्यास नमुना बी चाचणी केली जाईल. तिच्या पॉझिटीव्ह आलेल्या चाचणीमध्ये निवडक एंड्रोजन रिसेप्टर मॉड्युलेटर (एसएआरएम) समाविष्ट असल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा :  भारत- श्रीलंका यांच्यातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

आशियाई क्रीडा स्पर्धेत जिंकले रौप्य पदक  

news reels New Reels

दुती चंद ही भारतातील स्टार महिला धावपटूंपैकी एक आहे. तिने आशियाई क्रीडा स्पर्धेत 100 मीटर आणि 200 मीटर प्रकारात रौप्यपदक जिंकले. त्याचबरोबर जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती भारताची पहिली महिला धावपटू आहे. दुती चंद तिच्या निलंबनाविरोधात अपील करण्याच्या तयारीत आहे. आता सॅम्पल बी चाचणीनंतर कळेल नक्की दुती दोषी आहे का? आणि तिच्यावरील निलंबनाची कारवाई नेमकी किती दिवसाची असणार आहे.

समलैंगिक पार्टनरसोबत दुती प्रेमसंबधात

दुती हिने आपण समलैंगिक असल्याचं याआधीच जाहीर केलं होतं. ज्यानंतर तिने तिची मैत्रिण मोनालिसासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचंही आपल्या सोशल मीडियावरुन सांगितलं होतं. ती कायम दोघींचे फोटोही शेअर करत असते. ज्यानंतर काही दिवसांपूर्वी दुती चंद आणि मोनालिसाचा एक फोटो व्हायरल झाला होता. हा फोटो पाहून या दोघींनी लग्न केलं की काय? अशी चर्चा सुरु होती. मात्र दोघींच्या लग्नाबाबत नेमकी अधिकृत माहिती समोर आली नाही. 

हे देखील वाचा-

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …