आता पार्टीत आहे, उद्या ऑफिसला येऊ शकत नाही; कर्मचाऱ्याच्या मेसेजवर बॉसने दिला भन्नाट रिप्लाय

Boss Viral Reply On Leave Application: नवीन वर्षांची सुरुवात झाली आहे. नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिकांनी अनेक प्लान्स केले होते. अनेकांनी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी देशातील व देशाबाहेर साजरे केले. यंदा ३१ डिसेंबर रविवारी आल्याने व सलग सुट्ट्या आल्याने अनेक जण मोठी सुट्टी टाकून फिरायला गेले होते तर काही पार्टी आणि मजा करण्यासाठी बाहेरगावी केले होते. अशातच कर्मचाऱ्याच्या सुट्टीचा एक मेसेज व्हायरल होत आहे. दिल्लीतील एका कंपनीचा सीईओ आणि कर्मचारी यांच्यात सुट्टीबाबत झालेले व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे. यात कर्मचारी अनोख्या पद्धतीने सुट्टी मागत आहे तर बॉसनेही त्याची मज्जा घेत त्याच्या लीव्ह अॅपलीकेशनवर उत्तर दिलं आहे. 

अनस्टॉपचे फाउंडर आणि सीईओ अंकित अग्रवाल यांनी एक जानेवारी रोजी लिंक्डइनवर वर स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यासोबतच त्यावर कॅप्शनदेखील लिहलं आहे. या मेसेजमध्ये लिहलं आहे की, एका मोठ्या कालावधीनंतर मी पार्टीत जाण्यासाठी सुट्टीसाठी विनंती करत आहे. मी एका कॉन्सर्टमध्ये आलोय आणि अजूनही पार्टी सुरू आहे. त्यामुळं मी शुक्रवारी ऑफिसमध्ये येईन. दुपारी सर्व टीमसोबत बोलून घेईन. 

हेही वाचा :  19 व्या वर्षी सैन्यात भरती, 6 जणांच्या कुटुंबाची जबाबदारी.... कर्तव्य बजावताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला आलं वीरमरण

जेव्हा कर्मचारी रात्रभर पार्टी करत होता आणि त्यानंतरही आफ्टर पार्टीसाठी त्याने सीईओकडे सुट्टी मागितली तेव्हा सीईओने मेसेजमध्ये लिहलं की, आशा आहे की कॉन्सर्ट खूप चांगली चालु असेल. कधी तरी आम्हालादेखील सोबत घेऊन चल, असा रिप्लाय सीईओने कर्मचाऱ्याला दिला. या घटनेचा स्क्रीनशॉट कंपनीच्या सीईओनेच शेअर केला आहे. त्यासोबत एक कॅप्शनदेखील लिहलं आहे. 

सीईओने कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, कोणत्याही टीममध्ये अशी मोकळीक असणे गरजेचे आहे. तुमच्या टीमवर तुमचा विश्वास असावा आणि तुम्ही त्यांच्यासोबत कायम उभे राहाल. जेव्हा सहकारी एकमेकांसोबत उभे असाल आणि प्रमाणिक असतील तर हा विश्वास प्राप्त होतो. ज्यामुळं योग्य सहयोग आणि यशस्वी होतात. कंपनी आणि सीईओ यांच्यातील हा संवाद हेल्दी वर्कप्लेस म्हणून पाहिला जात आहे. 

इंटरनेट युजर्सनी यावर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका बॉसच्या तुमच्या कर्मचाऱ्यांप्रती कसं वागणं हवं याचे उत्तम उदाहरण आहे. लोक या पोस्टवर कमेंट करत आहेत. तसंच, दहा हजारांवर अधिक रिअॅक्शन आले आहेत. एका युजरने म्हटलं आहे, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अशा प्रकारच्या पोस्टने करायला हवी. एका अन्य युजरने म्हटलं आहे की, यालाच खरी टीम बिल्डिंग, टीम लीडर आणि लीडरशीप असं म्हणतात.  

हेही वाचा :  नोकरीचा राजीनामा दिल्यावर तरुणाचा आनंद गगनात मावेना, चेहऱ्यावरचं सुख लोकांच्या काळजाला भिडलं; पाहा Video



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राज ठाकरे खरंच दुपारी झोपेतून उठतात का? स्वत: खुलासा करत म्हणाले, ‘माझ्याबद्दल…’

Raj Thackeray Morning Wake Up Time: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या त्यांनी लोकसभा …

लोकांना हसवून करा ‘इतकी’ कमाई! स्टॅंडअप कॉमेडीमध्ये करिअरची सर्व माहिती

Career in Standup Comedy: तुम्हाला लोकांना हसवायला आवडतं? तुम्ही लोकांना हसवू शकता? तुम्हाला लाफ्टर शो …