दीपिका की सलमान…पठाण चित्रपटाच्या यशाचे श्रेय कोणाला? किंग खानने स्पष्टच सांगितले

Shah Rukh Khan Tweet : बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असलेला शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या ‘पठाण’ (Pathan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. दरम्यान लाडक्या शाहरुखने ‘आस्क एसआरके’ (Ask SRK) या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांच्या प्रश्नांची मजेशीर पद्धतीने उत्तरं दिले आहेत. 

‘आस्क एसआरके’ या सेशनमध्ये एका चाहत्याने शाहरुखचं कौतुक करत लिहिलं आहे, “पठाण’ या सिनेमाच्या माध्यमातून प्रेम हे जात, धर्म, भाषा, प्रदेश या सर्वांपेक्षा वरचढ आहे हे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या सिनेमाचं यश हे तुमचं आहे. तुम्ही सर्व भारतीयांना एकत्र आणण्याचं काम करत आहात. जय हिंद”. यावर प्रतिक्रिया देत शाहरुखने लिहिलं आहे,”आपण सर्व भारतमातेची मुले आहोत. हेच सत्य आहे. जय हिंद”.  

शाहरुखच्या एका चाहत्याने त्याला विचारलं आहे,”मुलगी पटकवण्याचा काहीतरी सल्ला द्या सर”. चाहत्याच्या प्रश्नावर उत्तर देत शाहरुख म्हणाला,”सल्ला देण्याची ही योग्य वेळ नाही. आता देशाचा प्रश्न आहे”. ‘पठाण’च्या यशाबद्दल तुम्हाला कसं वाटतं?”. यावर उत्तर देत शाहरुख म्हणाला,”आता परत गावी जाऊ वाटत आहे”. 

‘आस्क एसआरके’दरम्यान एक चाहता म्हणाला,”पठाण’ आणि ‘झिरो’ दोन्ही सिनेमे मी पाहिले असून मला असं वाटतं ती ‘पठाण’पेक्षा ‘झिरो’ (Zero) चांगला होता. यावर प्रतिक्रिया देत बादशाह म्हणाला,”ही आनंदाची बाब आहे. पण दुर्दैवाने तुमच्या सारख्या चाहत्यांची संख्या शून्य ते लाखापर्यंतच आहे”. “शाहरुख तू एवढा सेक्सी का आहेस?” चाहत्याच्या या प्रश्नावर उत्तर देत शाहरुख म्हणाला,”हा..हा.. काय करणार… सवय झाली आहे… प्रामाणिकता फक्त पाहणाऱ्यांच्या नजरेत असते”.

संबंधित बातम्या

हेही वाचा :  एमसी स्क्वेअरला विराट कोहलीनं केला खास मेसेज; म्हणाला...

Shah Rukh Khan Tweet: ‘वाट पाहत होतो, आला का नाहीस?’ मन्नत समोरील सेल्फी शेअर करत चाहत्याचा प्रश्न, शाहरुखच्या उत्तरानं वेधलं लक्ष



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …