कार्तिक आर्यनचा ‘Bhool Bhulaiyaa 3’ प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार?

Kartik Aaryan Bhool Bhulaiyaa 3 Teaser Released : बॉलिवूडचा सुपरस्टार कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) पुन्हा एकदा रुह बाबाच्या (Rooh Baba) माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. ‘भूल भुलैया 2’ नंतर चाहते या सिनेमाच्या पुढल्या भागाची प्रतीक्षा करत आहेत. दरम्यान कार्तिकने ‘भूल भुलैया 3’चा (Bhool Bhulaiyaa 3) टीझर शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘भूल भुलैया 3’ची घोषणा केली आहे. 

‘भूल भुलैया 3’चा टीझर आऊट! (Bhool Bhulaiyaa 3 Teaser Out)

कार्तिक आर्यनने ‘भूल भुलैया 3’चा टीझर (Bhool Bhulaiyaa 3 Teaser) शेअर केला आहे. या टीझरमध्ये कार्तिक रुह बाबाच्या भूमिकेत दिसत आहे. कार्तिक म्हणतो आहे,”गोष्ट अजून संपलेली नाही….दरवाजे बंद केले आहेत जेणेकरुन ते पुन्हा उघडता येतील. मी फक्त आत्म्यांशी बोलत नाही तर आत्मे माझ्या आत येतात”. कार्तिकचे चाहते आता ‘भुल भूलैया 3’ची आतुरतेने वाट पाहत आहेत.


‘भूल भुलैया 3’ कधी रिलीज होणार? (Bhool Bhulaiyaa 3 Resease Date)

कार्तिक आर्यनने ‘भूल भुलैया 3’ या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यासोबत या सिनेमाची रिलीज डेटदेखील जाहीर केली आहे. टीझर शेअर करण्यासोबत त्याने लिहिलं आहे,”रुह बाबा परत येतोय 2024  च्या दिवाळीत”. त्यामुळे 2024 च्या दिवळीत पुन्हा एकदा कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया’ची (Bhool Bhulaiyaa 3) जादू पाहायला मिळणार आहे. 

हेही वाचा :  Mhorkya : काय म्हणता! अनिल कुंबळे 'म्होरक्या' सिनेमात?

कार्तिकच्या ‘भूल भुलैया 2’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगलाच धुमाकूळ घातला होता. या सिनेमाच्या यशानंतर निर्मात्यांनी या सिनेमाच्या पुढच्या भागाच्या तयारीला सुरुवात केली आहे. कोरोनामुळे सिनेसृष्टीला वाईट दिवस आले होते. प्रेक्षक ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा पाहायला पसंती दर्शवत होते. त्यामुळे अनेक बिग बजेट सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले. दरम्यान कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया 2’ या सिनेमाने सिने-प्रेक्षकांना वेड लावलं. या सिनेमामुळे प्रेक्षकांची पाऊले पुन्हा एकदा सिनेमागृहाकडे वळाली. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली. या ब्लॉकबस्टर सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 185 कोटींची कमाई केली होती. 

संबंधित बातम्या

Bhool Bhulaiyaa 2 : ‘भूल भुलैया 2’चे बॉक्स ऑफिसवर 50 दिवस पूर्ण; लवकरच पार करणार 250 कोटींचा टप्पा



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …