करीना कपूरने चमचमत्या स्लिट कट ड्रेसमध्ये केला न्यू ईयर धमाका

करीना कपूर खान म्हणजे बॉलीवूडला पडलेलं एक सुंदर स्वप्नच म्हणावे लागेल. ती बी-टाऊनमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जिच्यासमोरअगदी विशीतल्या वा तिशीतल्या सुंदर ललना सुद्धा फिक्या पडतात. कारण करीनाची फॅशन कधीच कमी होत नाही. ती डोक्याच्या केसांपासून ते पायांच्या नखांपर्यंत अशी स्टाईल करते की सगळ्यांच्या नजरा बॉलीवूडच्या या मिसेस खानवर खिळल्या जातात. आता ती 42 वर्षांची आहे आणि दोन मुलांची आई आहे. पण आजही जेव्हा ती स्वत:ला ज्या पद्धतीने स्टाईलं करते आणि प्रेझेन्ट करते ते पाहता तिच्या स्किल्सची दाद दिलीच पाहिजे.

हेच कारण आहे की करीनाने बजेट-फ्रेंडली कपडे घातलेले असोत किंवा एखाद्या लक्झरी ब्रँडचा ड्रेस तिच्या शरीरावर असो, तिच्या प्रत्येक लुकचे कौतुक होणार हे ठरलेलेच असते. नवीन वर्षाच्या निमित्ताने सुद्धा बेबोची हीच गोष्ट पुन्हा एकदा दिसून आली. खरं तर, जेव्हा संपूर्ण जग नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये मग्न होते, तेव्हा ही 42 वर्षांची बेबो तिच्या किलर लूकने इंटरनेटचा पारा वाढवण्यात बिझी होती. यावेळी तिने असा आउटफिट कॅरी केला होता की तिचे फोटो समोर येताच सोशल मीडियावर लगेच ट्रेंड होऊ लागले. (सर्व फोटोज – @kareenakapoorkhan इंस्टाग्राम)

फॅमिली सोबत साजरा केला न्यू इयर

नवीन वर्ष साजरे करण्यासाठी करीना कपूर खान तिच्या आवडत्या डेस्टिनेशन स्वित्झर्लंडला पोहोचली, जिथे तिची दोन्ही मुले आणि पती सैफ अली खान देखील तिच्यासोबत होते. ही फॅमिली ट्रीप अविस्मरणीय व्हावी म्हणून बेबोने कोणतीही कसर सोडली नाही. या दरम्यान, तिने फक्त चांगले कपडेच घातले नव्हते तर ती इतकी गॉर्जियस दिसत होती की पाहणाऱ्या प्रत्येकाची नजर केवळ तिच्यावरच खिळून राहत होती. बेबोने स्वतःसाठी एक ब्लिंग आउटफिट निवडला होता, जो तिच्या लूकमध्ये हॉटनेसचा तडका मारत होता. या ड्रेसची फिटिंग इतकी मस्त होती की ती तिच्या फिगरला पार्टी रेडी लुक देत होती.

हेही वाचा :  वहिणी अनिशाच्या डोहाळे जेवणाला अगदी नवाबी थाटात गेली करीना, पण भरजरी साडीतील आईसमोर पडली फिकी

(वाचा :- नीता अंबानींनी थाटामाटात केलं लाडक्या सुनबाईचं स्वागत, हिरवी साडी व केसांत गजरा घालून दिली नवरीलाही तगडी टक्कर)

स्लिट कट ग्रीन गाऊनमध्ये दिसली करीना

करीना कपूरने यावेळी प्रसिद्ध लेबनीज फॅशन डिझायनर एली साब यांच्या कलेक्शनमधून गडद हिरव्या रंगाचा चमकदार गाऊन निवडला, ज्याची प्रत्येक डिटेलिंग बेबोची ब्युटी अजून खुलवत होती. डीप एमरल्ड कलरच्या डिझायनर गाउनची फिटिंग फिगर-हगिंग ठेवण्यात आली होती, ज्यामध्ये करीनाची टोन्ड फिगर जबरदस्तपणे हायलाइट होत होती. या आउटफिटमध्ये लो-कट नेकलाइन देण्यात आली होती, ज्यामध्ये स्लीव्हज बेल पॅटर्नमध्ये डिझाइन केले होते.

(वाचा :- क्रॉप शर्टमधील उर्वशीचे थेट चाहत्यांच्या काळजावर वार, लुकपेक्षा केसातल्या त्या दोन क्लिप्सचीच झाली तुफान चर्चा)

आकर्षक स्लीटचा जलवा

करिनाच्या ड्रेसचे वैशिष्ट्य म्हणजे लेग पार्टवरील आकर्षक स्लिट कट, जो मुव्हमेंटसाठी परफेक्ट होता. शिवाय सर्व डीटेल्स एकंदर लुकमध्ये सुपर स्टनिंग इफेक्ट अॅड करत होते. ज्यामुळे तिचा ओव्हरऑलं लुक कॉपी करण्यायोग्य झाला. इतकंच नाही तर समोर दिलेली स्लीट कंबरेपासून खाली पायाच्या बोटांपर्यंत होती, जी एक टीजिंग इफेक्ट सुद्धा क्रिएट करत होती. हेच एक मोठे कारण आहे की बेबोच्या या ड्रेसमध्ये आणि लुकमध्ये दोष काढावे असे काहीच नव्हते हे देखील एक मोठे कारण आहे की या जबरदस्त गाऊनमध्ये एकही गोष्ट नाही ज्यामध्ये दोष असू शकतो. शेवटी दोष असणार तरी कसा ना..! कारण हा लूक तान्या घावरीने बेबोसाठी स्टाईल केला होता.

हेही वाचा :  “मी आज एक वर्षांचा…”, वाढदिवसाच्या निमित्ताने करीना कपूरने शेअर केला जेहचा खास फोटो

(वाचा :- रेड ड्रेस व पायावरील स्लिट कट ठरला आकर्षण, श्रद्धाच्या कातील अदा बघून चाहतेच नाही तर पती राहुलचीही गेली विकेट)

ज्वेलरीची कमाल

करिनाने या आउटफिटसह मेकअप न्यूड टोन ठेवला, ज्यामुळे तिचे शार्प फीचर्स चांगलेच हायलाइट होत होते. अभिनेत्रीने तिच्या मानेचा भाग फ्लॉंट केला होता आणि ज्यासाठी तिने तिचे केस बनमध्ये स्टाईल केले. तिने तिच्या डोळ्यांना स्मोकी टच दिला, सोबतच ग्लॉसी लीप कलरचा वापर केला होता. ज्वेलरी म्हणून तिने तिच्या गळ्यात स्नॅक पॅटर्न ज्वेलरी घातली, ज्यामुळे तिचा अटायर एनहान्स झाला आणि त्याला ग्लॅम टच मिळत होता. सोबतच तिच्या कानात हलक्या वजनाचे झुमके दिसा होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण करिनाने या आउटफिटवर 2,35,831 रुपये खर्च केले होते.

(वाचा :- अनिल कपूरच्या बर्थ डेला बॅकलेस जान्हवी व शनायास बघून फुटला लोकांना घाम, बर्थडे काकाचा पण भाव खाल्ला या ललनांनी)

आणखी एक वेड लावणारा लुक

काही दिवसांपूर्वी करीनाने असाच एक ब्लू कलरचा नेट असलेला आकर्षक गाऊन परिधान केला होता. ज्यावरील मेकअप, ज्वेलरी, हेअरस्टाईल सारंच अगदी साधंसं होतं पण तरीही तिचा हा लुक तब्बल 6 लाख चाहत्यांना वेड लावणारा ठरला. अनेक चाहत्यांनी म्हटलं की, “बेबो, आम्ही तर तुला ओळखलंच नाही आम्हाला वाटलं कोणी 24 वर्षांची मुलगीच समोर उभी आहे.” या झिरमिरीत गाऊनवर तिने एक सिंपल पोनी बांधली होती, हातांत डायमंडची रिंग होती तर कानात काहीच न घालता चेह-यावर मिनिमल न्यूड मेकअप अन् ओठांवर लाईट लिपस्टिक लावली होती. गाऊनला V नेक देण्यात आला होता तर त्यावर तिने बलून स्टाईल कोट परिधान केला होता.

हेही वाचा :  अमरावतीत संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल; काँग्रेसने केली होती तक्रार

(वाचा :- मिनी स्कर्ट व को-आर्ड सेट घालून घरी गेली मलायका अरोरा, मलायकापेक्षा मरून साडीतील आईनेच जिंकलं नेटक-यांचं काळीज)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार? राज्यात पेटलं राजकारण!

Shiv Jayanti: शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार? हा वाद वर्षानुवर्ष सुरु आहे. आता सरकारने …

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ कसा घेता येणार? अर्ज कुठे आणि कसा भरायचा? जाणून घ्या सर्व काही

Seema Adhye, Zee 24 Taas : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे फडणवीस सरकारने आज आपला अर्थसंकल्प …