कपिल शर्मा का वळलाय या मार्गाला,जगाला हसवणारा व्यक्तीच का आणतोय बायकोच्या डोळ्यांत पाणी

Kapil Sharma म्हणे लोकांना वेगवेगळ्या प्रकारे हसवण्यात तरबेज आहे, पण त्याची स्वतःची पत्नी मात्र त्याच्यावर सतत रागावलेली असते. ‘द कपिल शर्मा शो’च्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये खुद्द कपिल शर्मानेच याचा खुलासा केला आहे. या The Kapil Sharma Show च्या एका एपिसोडमध्ये हिंदी न्यूज चॅनलच्या Shweta Singh, Anjana Om Kashyap आणि Chitra Tripathi यासारख्या मोठमोठ्या अँकर्सनी हजेरी लावली होती. जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, स्टुडिओतून बाहेर आल्यानंतर तुम्हाला कोणासोबत बोलावेसे वाटते का? तर त्यावर उत्तर देताना अंजना म्हणाल्या की, ‘स्टुडिओतून बाहेर आल्यानंतर मी काही वेळ गप्प बसते आणि मला कुणाशीही बोलावेसे वाटत नाही.’ यावर कपिल शर्माने अजंना यांना विनंती केली की त्यांनी ही गोष्ट त्याची पत्नी गिन्नीला समजावून सांगावी.

कारण कपिल सुद्धा शूटिंगवरून परतल्यानंतर घरी काहीही न बोलणे पसंत करतो. त्याच्या याच गोष्टीमुळे त्याची पत्नी नेहमी त्याच्यावर रागावते. मंडळी, अशा वागण्याला सायलेंट ट्रिटमेंट म्हणतात. तुम्हाला ही गोष्ट कदाचित फारशी गंभीर वाटणार नाही, पण नात्यातल्या जोडीदाराकडून मिळणारी Silent Treatment In Relationship कधी कधी नात्यात अंतर आणते. अशा परिस्थितीत त्याला कसे सामोरे जायचे, हे नेहमी दुसऱ्या जोडीदाराला कळायला हवे. जर तुमचा जोडीदार तुमच्याशी बोलत नसेल किंवा तुम्हाला काय म्हणायचे आहे ते ऐकून घेत नसेल, तर तुम्ही सायलेंट ट्रिटमेंटला बळी पडू शकता. यासाठीच आम्ही तुम्हाला काही टिप्स आज देत आहोत. (फोटो सौजन्य :- कपिल शर्मा इंस्टाग्राम आणि iStock – फोटो प्रातिनिधिक आहेत )

हेही वाचा :  K Pop प्रसिद्ध गायिका हेसूचा हॉटेलमध्ये आढळला संशयास्पद मृतदेह, चाहत्यांना धक्का

काय असते सायलेंट ट्रिटमेंट?

काय असते सायलेंट ट्रिटमेंट?

सायलेंट ट्रिटमेंट म्हणजे कशावरही प्रतिक्रिया न देणे. नातेसंबंधांमध्ये, एखाद्या व्यक्तीला शिक्षा देण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी याचा वापर केला जातो. जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराचा अनादर करता तेव्हा तो तुमच्याकडे दुर्लक्ष करू लागतो. तुम्ही काहीही बोलता त्यावर कोणताही प्रतिसाद तो देत नाही. यामुळे त्याला काही काळ मानसिक शांतता मिळू शकते. परंतु तुम्हाला त्याचा त्रास होऊ लागतो. म्हणजे वाद संपण्याऐवजी तो धिक वाढू लागतो.
(वाचा :- 4 वर्ष प्रेमात आहे, सेटल आहे पण 35 पर्यंत लग्न करायचं नाही पण प्रेयसीची विचित्र अट ऐकून पायाखालची जमीन सरकलीये)​

सायलेंट ट्रिटमेंट धोकादायक आहे का?

सायलेंट ट्रिटमेंट धोकादायक आहे का?

सायलेंट ट्रिटमेंट हा कधीकधी स्वतःला शांत आणि नियंत्रणात ठेवण्याचा एक मार्ग असतो. परंतु उगाचच प्रत्येक वेळी सायलेंट ट्रिटमेंट अप्लाय करणे म्हणजे एखाद्याचे मानसिक शोषण करणे होय. यातून तुम्ही समोरच्याच्या भावनांना काडीची किंमत देत नाही असे प्रतीत होते. जे लोक नियमितपणे सायलेंट ट्रिटमेंटचा मार्ग वापरतात किंवा अनुभवतात त्यांनी आपली ही सवय सुधारण्यासाठी त्वरीत काहीतरी केले पाहिजे. कारण अनेकवेळा यामुळे नाती तुटतात.
(वाचा :- अस्से लग्न अवघडच बाई! लग्न करून फसलो असे वाटणा-या प्रत्येकास माहितच हव्या या गोष्टी,घटस्फोटाची वेळच येणार नाही)​

हेही वाचा :  नणंद आणि भावजयीचे नाते होईल अधिक मैत्रीचे, ईशा-श्लोका अंबानीच्या नात्यातून घ्या प्रेरणा

नात्यात का येतो दुरावा?

नात्यात का येतो दुरावा?

काही काळ सायलेंट ट्रिटमेंट तुम्ही वापरत असाल तर त्याचे जास्त वाईट परिणाम दिसणार नाही. परंतु जर तुम्ही हीच सायलेंट ट्रिटमेंट काही दिवस, काही आठवडे किंवा काही महिने सुरूच ठेवत असाल तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. सर्वसाधारणपणे, एखाद्या गंभीर विषयावर बोलणे आणि निर्णय घेणे टाळण्यासाठी जोडीदाराकडून सायलेंट ट्रिटमेंट दिली जाते. असे सतत केल्याने तुमचा जोडीदार या वागणुकीला कंटाळतो आणि हळूहळू तुमच्यापासून दूर जाऊ लागतो.
(वाचा :- त्या मुलीच्या भूतकाळाची काळी बाजू माहीत असूनही मी तिला प्रपोज करण्याचं धाडस केलं, पण पुढे जे झालं ते धक्कादायक)​

कसे करावे डील?

कसे करावे डील?

कधीकधी सायलेंट ट्रिटमेंट कारण जोडीदाराच्या वैयक्तिक समस्या असू शकतात. अशा परिस्थितीत, तुम्ही त्यना बोलते करणे आवश्यक आहे. स्वतः बोलण्यापेक्षा त्यांना बोलण्याची संधी द्या. त्यांच्याशी बोलण्याची तुमची इच्छा व्यक्त करा. रोमँटिकपणे त्यांच्या सोबत वेळ घालवा कोणत्याही प्रकारचे टोमणे किंवा कडू बोलणे टाळा. जेव्हा आपली चूक असेल तेव्हा माफी मागण्यासाठी नेहमी तयार रहा. यामुळे वाद चिघळणार नाही आणि तुमच्या नात्यावर परिणाम होणार नाही.
(वाचा :- प्रेमात केलेली ‘ही’ एक चूक येऊ शकते चांगलीच अंगलट, ढसाढसा रडल्यानंतरही पार्टनर करणार नाही भावनांचा आदर व किंमत)​

हेही वाचा :  प्रिती अदानीला अजिबात आवडले नव्हते गौतम अदानी, मग असं फुललं नातं आणि झाला 36 वर्षांचा सुखाचा संसार

सहसा पुरुषांना जास्त असते ही सवय

सहसा पुरुषांना जास्त असते ही सवय

भावना व्यक्त करण्यात पुरुष स्त्रियांपेक्षा खूपच मागे असतात. बहुतेक पुरूष आपल्या भावना लपविण्याचा प्रयत्न करतात आणि ही ते स्वत:ची कमजोरी मानतात. अशा स्थितीत नात्यातील गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यासाठी पुरुष अनेकदा आपल्या स्त्री जोडीदाराशी बोलणे टाळतात. पराभवाच्या भावनेतून सुटण्याचाही हा एक मार्ग असल्याचे अनेक पुरुषांना वाटते. त्यामुळे तुमच्या पतीला वा बॉयफ्रेंडला अशी सवय असेल तर ती बदलण्यांसाठी तुम्ही प्रयत्न करायला हवे.
(वाचा :- ‘मी दिया मिर्झा शपथ घेते’ ओठांवर ओठ टेकून प्रेम व्यक्त करत मराठमोळ्या शब्दांत पतीचा स्वीकार,चाहत्यांकडून कौतुक)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …