तिनं फक्त अरबी लिहिलेला कुर्ता घातला अन् जमाव भडकला; महिला पोलिसाने वेळीच…

Woman Dress With Arabic Text: पाकिस्तानमधील लाहोर येथील एका महिलेने अरबी प्रिंट असलेले पोशाख परिधान केला होता. मात्र, याच पोशाखामुळं तिच्यावर भयानक प्रसंग ओढावला होता. पण तिथे उपस्थित असलेल्या एका महिला पोलिस कर्मचाऱ्यामुळं ती सुखरुप बचावली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ( Pakistan Woman Quran)

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेने अरबी प्रिंट असलेला ड्रेस परिधान केला होता. मात्र, तिथे असलेल्या काही लोकांना तिच्या ड्रेसवर असलेले प्रिंटही कुराणातील आयतें असल्याचा गैरसमज झाला. यावरुन काही नागरिकांनी तिला घेरले. पण सुदैवाने तिथे आलेल्या महिला पोलिसांनी लगेचच परिस्थिती नियंत्रणात आणली आणि महिलेला सुरक्षित तिथून बाहेर काढले. 

व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की यात महिला पाकिस्तानातील एका रेस्तराँमध्ये बसली आहे. या महिलेने हाताने तिचा चेहरा झाकून घेतला आहे. तर, तिच्या बचावासाठी एका महिला पोलिस अधिकारी जमावाला कोणत्याही प्रकारची हिंसा न करण्याचे अवाहन करत आहेत. त्यानंतर सुरक्षितपणे त्या महिलेला हॉटेलमध्ये बाहेर काढले. या घटनेत सुदैवाने महिलेला कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही.

हेही वाचा :  Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोप

तर, पाकिस्तानच्या पंजाब पोलिसांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत गुलबर्ग लाहोरची धडाकेबाज एसडीओपी एसीपी सैयदा शहरबानो नकवीचे कौतुक केले आहेत. तिच्या नावाची शिफारस प्रतिष्ठित कायद – ए- आजम पोलिस पदक (क्यूपीएम)साठी केली आहे. हा पुरस्कार पाकिस्तानातील सर्वोच्च वीरता पुरस्कार आहे.

महिला पोलिस अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत म्हटलं आहे की, मी माझ्या पतीसोबत खरेदीसाठी गेली होती. तिथे एका महिलेने कुर्ता परिधान केला होता. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी तिला हा कुर्ता काढण्यास सांगितले. त्यांना काहीतरी गैरसमज झाला होता. तर, पीडित महिला वारंवार माफीदेखील मागत होती. तिने ऑनलाइन हा कुर्ता मागवला होता. कुर्ताची डिझाइन छान होती म्हणून ऑनलाइन ऑर्डर केला होता. मात्र मी कधीच हा विचार केला नव्हता की लोक या पद्धतीने विचार करतील. माझा कुराणचा अपमान करण्याचा कोणताच विचार नव्हता. या घटनेसाठी मी माफी मागते, असं ती वारंवार सांगत होती. पण त्याचवेळी आलेल्या महिला पोलिस अधिकाऱ्यामुळं महिलेची सुखरुप सुटका झाली आहे. 

लाहोरच्या या घटनेमुळं पाकिस्तानातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एका तरुणाने हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, लाहोर आणि अजून एक ड्रामा. महिलेला जमावाने घेरले आहे. कारण तिच्या ड्रेसवर अरबीमध्ये नाव लिहले आहे. काही लोक याला कुराणमधील आयते समजत आहेत. मात्र, असं नाहीये तो एक साधारण अरबी शब्द आहे. याचा धर्माशी काहीएक संबंध नाहीये, असं एकाने म्हटलं आहे. 

हेही वाचा :  गुटखा खाल्ला आणि जीव गेला, तरुणाच्या मृत्यूचं हे ठरलं कारण



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं ‘या’ स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रक

Konkan Railway News : मे महिन्याची सुट्टी, शिमगा आणि गणेशोत्सव यादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या …