Job News : नोकरीच्या शोधात आहात, तर तुमच्यासाठी खुशखबर!

मुंबई : जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर ही बातमी खास, तुमच्यासाठी. कारण, नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वेनं विविध पदांसाठी नोकरीची संधी तुमच्या भेटीला आणली आहे. त्यासाठीची जाहिरातही रेल्वेनं प्रसिद्ध केली आहे. 

सदर नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुनपर्यंत असल्याचं सांगण्यात येत आहे. नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वेमध्ये यावेळी तब्बल 5636 रिक् पदांवर नोकरीची संधी आहे. नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणं मात्र गरजेचं आहे. (Job News north east frontier railway recruitment vacancies)

या नोकरीसाठी तुमचं शिक्षण 10 वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. शिवाय ITI ची पदवी असणंही गरजेचं असेल. 15 ते 24 वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज दाखल करु शकतात. 

मेरिट लिस्टनुसार या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. कोणत्याही परीक्षेशिवाय ही नोकरी मिळू शकणार आहे.  

नोकरीसाठी अर्ज कसा करावा? 
नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी nfr.indianrailways.gov.in या संकेतस्थळावर लॉगईन करावं लागणार आहे. यानंतर जनरल इन्फो या सेक्शनमध्ये जाऊन ‘रेल्वे रिक्रुटमेंट सेल’वर क्लिक करा. यानंतर अप्लाय करण्यासाठीच्या लिंकवर क्लिक करुन आपली माहिती आणि आवश्यक कागदपत्र जोडा. 

कुठे आहे नोकरीची संधी
कटिहार (केआईआर) आणि टीडीएच कार्यशाळा : 919
अलीपुरद्वार (एपीडीजे): 522
रंगिया (आरएनवाई): 551
लुमडिंग (एलएमजी), एस एंड टी / वर्कशॉप / एमएलजी (पीएनओ) आणि ट्रैक मशीन
/ एमएलजी: 1140
तिनसुकिया (TSK): 547
नवी बोंगाईगांव कार्यशाळा (एनबीक्यूएस) आणि  ईडब्ल्यूएस / बीएनजीएन: 1110
डिब्रूगढ़ कार्यशाळा (डीबीडब्ल्यूएस): 847Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Gold Price : सोने-चांदी दरात घसरण, खरेदीची मोठी संधी

मुंबई : Gold Rate Update : आता बातमी आहे सर्वसामान्यांना दिलासा देणारी. कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये …

Rakesh Jhunjhunwala | फक्त 5000 रुपयांनी सुरू केली शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक; जाणून घ्या बिंग बुलच्या 5 भन्नाट गोष्टी

Rakesh Jhunjhunwala Birthday : शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला आज (5 जुलै) 61 वर्षांचे …