जिओ एअरटेलच्या धमाकेदार प्लॅनबरोबर मिळवा डिस्ने + हॉटस्टारसह १५ ओटीटी प्लॅटफॉर्म


आजकाल प्रत्येकजण इंटरनेटवर अवलंबून आहे. त्यात प्रत्येकजण अशा योजना घेण्याचा प्रयत्न करतात की ज्यामध्ये हाय-स्पीड इंटरनेट मिळेल, तसेच इतर अनेक फायदे देखील दिले जातात.

आजकाल प्रत्येकजण इंटरनेटवर अवलंबून आहे. त्यात प्रत्येकजण अशा योजना घेण्याचा प्रयत्न करतात की ज्यामध्ये हाय-स्पीड इंटरनेट मिळेल, तसेच इतर अनेक फायदे देखील दिले जातात. दरम्यान आज तुम्हाला रिलायंस जिओ आणि एअरटेल यांच्‍या टॉप टेलीकॉम कंपन्यांच्‍या टॉप प्‍लॅनबद्दल सांगणार आहोत, जे खरेदी केल्‍याने तुम्‍हाला हाय-स्पीड डेटा तसेच अनेक ओटीटी (OTT) प्‍लॅटफॉर्मचे सब्‍सक्रिप्शन मिळू शकते.

जिओ ९९९ रुपयांमध्ये १५ ओटीटी सबस्क्रिप्शन देत आहे

जिओचा सर्वात स्वस्त OTT ब्रॉडबँड प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये ९९९ रुपयांऐवजी तुम्ही १५०Mbps स्पीडवर ३, ३०० जिबी (GB) किंवा ३.३ TB इंटरनेट देत आहेत. हा प्लॅन लोकप्रिय मानला जातो कारण यामध्ये तुम्हाला Amazon Prime Video, Disney + Hotstar आणि Eros Now यासह १५ ओटीटी प्लॅटफॉर्मचे एक वर्षाचे सबस्क्रिप्शन दिले जात आहे.

हेही वाचा :  5 तासांत फक्त 40 रुपये मिळाले, रिक्षाचालकाला अश्रू अनावर; VIDEO तुफान व्हायरल

एअरटेल एंटरटेनमेंट प्लॅन

एअरटेलचा ‘एंटरटेनमेंट’ ब्रॉडबँड प्लॅनही ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये, तुम्हाला ३.३ TB किंवा एअरटेल कडून ३,३०० जिबी इंटरनेट दिले जाईल, जे २००Mbps च्या डाउनलोडिंग स्पीडने उपलब्ध करण्यात आले आहे. एअरटेलच्या या सर्वाधिक विक्री होणाऱ्या प्लॅनमध्ये तुम्हाला Amazon Prime Video आणि Disney + Hotstar च्या सबस्क्रिप्शनसह विंक म्युझिकमध्ये एक्सेस मिळेल.

बीएसएनएलचा ब्रॉडबँड प्लॅन

देशातील सरकारी टेलिकॉम कंपनी, बीएसएनएल (BSNL) देखील ब्रॉडबँड प्लॅन ऑफर करते, ज्याची किंमत ७४९ रुपये आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला १००Mbps स्पीडने १ TB किंवा १००० जिबी (GB) इंटरनेट दिले जाते. जर तुमचा मासिक डेटा संपला असेल तर इंटरनेटचा वेग ५ Mbps पर्यंत कमी होईल.

नेटप्लस ब्रॉडबँड प्लॅन

नेटप्लसच्या ९९९ रुपयांच्या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये तुम्हाला २००Mbps स्पीडने इंटरनेट सुविधा मिळेल. या प्लॅनची खासियत म्हणजे यामध्ये तुम्ही अनलिमिटेड डेटाचा फायदा घेऊ शकता. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना कॉलिंगचे फायदेही दिले जात आहेत. OTT फायद्यांबद्दल सांगायचे झाले तर, हा प्लॅन घेताना, तुम्ही एकतर फक्त Amazon Prime Video चे सदस्यत्व घेऊ शकता किंवा जी५ प्रीमियम, Voot Select आणि ErosNow च्या एकत्रित सदस्यतांचा लाभ घेऊ शकता.

हेही वाचा :  शिंदे, फडणवीस, मुंडे, शाह, राणे अन्... घराणेशाहीवरुन डिवचल्याने ठाकरेंनी यादीच काढली

या अशा चार ब्रॉडबँड प्लॅन आहेत ज्यात तुम्हाला हाय-स्पीड डेटा तसेच कमी किमतीत टॉप OTT प्लॅटफॉर्म्सची सदस्यता दिली जात आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …